अहमदनगर मध्ये पिकाची चिंता वाढली, ज्वारीच्या पिकावर संकट वाढले !
Ahmednagar News : अहमदनगर जामखेड मधील क्षेत्र हे ज्वारीच्या पिकाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. मात्र काही काही दिवसात पाहिले असेल की हवामान बदलामुळे ज्वारीचे पीक हुरड्यात आलेलं असताना चिकटा, मावा आणि लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे आपला बळीराजा ( शेतकरी ) संकटात सापडलाय.
दरवर्षी ज्वारीचे हजारो क्विंटल उत्पादन घेणारे जामखेड परीसरातील शेतकरी आता घाबरून गेलाय.
अहमदनगर जामखेड ( मुख्यतः खर्डा परिसर ) ज्वारीचे माहेरघर म्हणून ओळख आहे. याच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ज्वारी या पिकाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. पण या वर्षी झालेल्या हवामान बदलामुळे ज्वारीवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. यावर्षी खर्डा कृषी मंडळाकडे 29 गावात जवजवळ ( 9 हजार 873 हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाली आहे. )
माघील काही दिवसात जे ढगाळ वातावरण या भागात निर्माण झाले होते त्यामुळे याचा परिणाम ज्वारी या पिकावर झाला आहे.