मुख्यमंत्री कृषी सोलर पंप योजना 2023
महाराष्ट्र सरकार मार्फत शेतकऱ्यांच्या फायदासाठी अनेक योजना येत आहेत. शेतकरी त्याचा नक्कीच फायदा घेत आहेत.( महाडीबीडी सारख्या ) पण याच योजना प्रमाणे महाराष्ट्र सरकार मार्फत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी शेतीला पाणी पुरवण्यासाठी एक योजना आहे तीचे नाव आहे ‘महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023’, या मार्फत शेतकऱ्याला सरकार कडून अनुदान ( 96% पर्यंत ) तत्वावर सौर कृषी पंप वितरण केले जाणार आहे, याचा महत्वाचा उद्देश असा आहे की जे जुने डिझेल पंप होते ते काढून टाकून त्या जागी हे नवीन सौर पंप लावणे. जे महाराष्ट्रातील शेतकरी या योजने साठी इच्छुक असतील किंवा ज्यांना हे सोलर पंप पाहिजे ते ऑनलाईन रेजिस्ट्रेशन करू शकतात आणि या योजनेचा फायदा घेऊ शकतात.
शासन निर्णय : 1. येथे क्लिक करा – २०१८
2. येथे क्लिक करा – २०१९
3. येथे क्लिक करा – ११ सप्टेंबर २०१९ ( महत्वाचा )
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023 प्रमुख उद्देश :
महाराष्ट्रातील शेतकरी शेतीला ( पिकाला ) पाणी देतात त्यासाठी एकत्र डिझेल पंप वापरतात किंवा इलेक्ट्रिसिटी वापरतात.. पण या साठी खर्च खूप येतो. आणि शिवाय पिकाला पाणी देण्यासाठी लाईट ची वाट पहावी लागते कधी असते किंवा कधी नसते.. याला पर्याय म्हणून महाराष्ट्र शासनाने ‘ महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना ‘ आणली आहे.
याचा फायदा असा आहे की याला 95% अनुदान आहे , शेतकऱ्याला फक्त 5% एवढी रक्कम भरायची आहे. ज्याद्वारे शेतकऱ्याचे उत्पन्न वाढणार आहे. सौर पंपा मुळे पर्यावरणाला काही धोका सुद्धा नाही.
Maharashtra Mukhyamantri Solar Pump Yojana 2023 | Maharashtra Saur Krushi Pamp Yojana 2023
योजनेचे नाव : महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023
योजना सुरू कोणी केली : महाराष्ट्र सरकार
योजनेचे लाभार्थी : महाराष्ट्र राज्यातील शेतकरी
योजना प्रक्रिया : ऑनलाईन पद्धतीने
ऑफिसीयल वेबसाईट : Search google below link
https://www.mahadiscom.in/solar/index.html#
मुख्यमंत्री सौर पंप योजना फायदा रक्कम :
– महाराष्ट्रातील शेतकरी याला पात्र असतील
– 5 एकर पेक्षा कमी क्षेत्र असणारे शेतकऱ्याला 3 HP आणि 5 एकर पेक्षा जास्त क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना 5HP असणारा पंप मिळेल.
OPEN Category ( लहान शेतकरी 3HP पंप साठी ) – ( 10% = 25500 )
(Open Category 5 एकर पेक्षा हजास्त असणारे शेतकरी यांना 5HP साठी 38500 ( 10% )
SC आणि ST
3HP साठी ( 12750) ( 5% ), 5HP साठी ( 19250 )( 5% )
Gr पहा : येथे क्लिक करा
मुख्यमंत्री कृषी सौर पंप 2023 योजनेसाठी कागदपत्रे :
1.आधार कार्ड
2. रहिवासी दाखला
3. 7/12 आणि 8 अ उतारे
4. मोबाईल नंबर
5. पासपोर्ट साईज फोटो
कृषी सोलर पंप कसा काम करतो हे पाहण्यासाठी : येथे क्लिक करा
मुख्यमंत्री कृषी सौर पंप 2023 अर्ज ऑनलाईन कसा करणार:
१.. सर्वप्रथम ऑफिसीयल वेबसाइट जावे लागणार लिंक : https://www.mahadiscom.in/solar/index.html
२. यानंतर Benificary Service ( marathi लाभार्थी सुविधा ) यावर क्लिक करा
या ठिकाणी सर्व माहिती व्यवस्थित भरायची आहे.
3. त्यानंतर तुम्हाला समोर एक tab दिसेल ( New Consumer ) तर हा विकल्प तुम्हाला निवडायचा आहे.
4. त्यांनतर तुम्हाला Application Form Open होईल तो भरायचा आहे यामध्ये ( Paid Pending AG connection, Consumer Details, Detail of Applicant and location, Nearest MSEDCL Consumer Number ( जेथे पंप installed करायचा तेथील ), Detail of Application Residential Address and location ) सर्व माहिती भरायची आहे.
5. सर्व माहिती भरल्या नंतर जे कागतपत्रे सांगितली आहेत ते Upload करा आणि सबमिट करा.
6. अश्या प्रकारे तुम्ही महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप 2023 साठी अर्ज करू शकता.
अर्जाची स्थिती ( महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषि पंप योजना ) पाहण्यासाठी :
1. सुरुवातीला website वर या. येथे क्लिक करा ( वेबसाईट साठी )
2. यामध्ये वरच्या साईडला Beneficiary Service दिसेल यावर क्लीक करा.
3. यांच्यामध्ये Drop Dawn Menu मध्ये Track Application Status हा विकल्प निवडून तुम्ही केलेल्या अर्जाची स्थिती पाहू शकता.यामध्ये तुम्हाला Beneficiary ID टाकून Search वर क्लीक करायचे आहे.
4. संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहायला मिळेल.
अधिक माहिती साठी Toll free Number
1800-102-3435 आणि 1800-233-3435
( यावर कॉल करून तुम्ही अधिक माहिती मिळवू शकता. किंवा अर्ज संदर्भात माहिती जाणून घेऊ शकता.