आला जीआर - 2023-24 मध्ये मागेल त्याला शेततळे,पेरणी यंत्र, तुषार सिंचन, शेततळ्याचे अस्तरीकरण, शेडनेट,हरितगृह आणि ठिबक - आत्ताच मागणीचा अर्ज भरा | Shettale, Tushar Sinchan, Thibak, Shettalyache astarikaran |
नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्र सरकार मार्फत जून 2015 मध्ये चालू झालेल्या मागेल त्याला शेततळे यामध्ये
आता मोठ्या प्रमाणावर यावर्षी विस्तार केला असून आता “ मागेल त्याला सर्व सुविधा जसे की मागेल त्याला फळबाग, तसेच मागेल त्याला ठिबक/तुषार सिंचन , मागेल त्याला शेततळे, मागेल त्याला शेततळ्याचे अस्तरीकरण,
मागेल त्याला शेडनेट, मागेल त्याला नवीन आधुनिक पेरणीयंत्र आणि मागेल त्याला हरिगृह अश्या प्रकारे या वर्षी या योजनेचा विस्तार केला आहे.
मा. वित्तमंत्री / फडवणीस यांनी यावर्षीच्या अर्थसंकल्पीय भाषणात या योजनेच्या विस्तराबाबत विधानभवनात माहिती दिली होती.
यामध्ये मागेल त्याला सर्व सोयी दिल्या जाणार आहेत याची माहिती दिली होती.
त्यानुसार शासनाने नवीन जीआर ( शासन परिपत्रक क्र. मुशारसी 0323/प्र. क्र. 47/14- अ) ( दिनांक 25 एप्रिल 2023 जीआर नंबर किंवा संकेत क्रमांक नं – 202304251954050001 ) जारी केला आहे.
यामध्ये प्रमुख मागेल त्याला ( फळबाग, ठिबक, तुषार सिंचन, शेततळे, शेततळ्याचे अस्तरीकरण, शेडनेट, हरितगृह, आधुनिक पेरणीयंत्र ) याचा समावेश आहे.
वरील घटक जर पाहिजे असेल तर महा-डीबीटी या महाराष्ट्र सरकारच्या कृषी पोर्टलवर जाऊन अर्ज यावर्षी ( 2023-24 ) करावा लागणार आहे.
जे या वर्षी या योजनासाठी अर्ज करतील त्यांना हे अनुदान देण्या संदर्भात / वाटप करण्याची कार्यवाही सरकारने सांगितलेली आहे.
अनुदान हे डीबी टी मार्फत मिळणार :
या महा डीबीटी पोर्टल अर्ज करताना किंवा या कृषी योजनांचा फायदा घेताना संबंधित शेतकऱ्यांच्या आधार कार्ड क्रमांक शी संलग्न बँक खात्यावर DBT मार्फत ( सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन ) यामध्ये अनुदान पाठवणार आहे
हे या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या. यावर्षीच्या आधी जर या योजनांचा फायदा घेतला असेल तर याठिकाणी तुम्हाला पुन्हा अर्ज करता येणार नाही.
नवीन अर्ज करणार्यांना फायदा :
ज्या शेतकऱ्यांनी महा डीबीटी पोर्टल वर अजूनही जर अर्ज केला नसेल तर तुम्ही नवीन अर्ज या घटकासाठी करू शकता. तुमचे नाव नक्कीच या नवीन लॉटरी ला लागणार आहे.
महा डीबी टी वर अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
महा डीबी टी करण्यासाठी आवश्यक कागतपत्रे :
केशव.सटवाजी.मलारे