नवीन उपक्रम आणि नवीन योजना लगेच अर्ज भरा शासन आपल्या दारी नवीन योजना : जत्रा शासकीय योजनांची नवीन उपक्रम Shasan aplya Dari Jatra Shaskiy Yojanachi
नमस्कार शेतकरी बंधुनो, महाराष्ट्र शासन नेहमी नवीन – नवीन योजना तसेच नवीन उपक्रम प्रत्येक वर्षी राबवत आहे. असे अनेक उपक्रम आहेत ज्या मार्फत आपल्या बळीराजाला फायदा होत आहे. महाराष्ट शासनाने यावर्षी म्हणजे 13 एप्रिल 2023 ला एक नवीन जीआर काढला त्यात शीर्षक होते ‘जत्रा शासकीय योजनांची ‘ सर्व सामन्यांच्या विकासाची ‘ ( नाव बदलले नवीन जीआर 04 मे 2023 नवीन नाव ‘शासन आपल्या दारी ). या योजने मार्फत महाराष्ट्रातील जनतेला शासकीय उपक्रमाची माहिती देणे हा उद्देश होता या संदर्भात आपण खाली माहिती पाहणार आहोत
महत्वाची माहिती : जत्रा शासकीय योजनांची : शासन आपल्या दारी Shasan aplya Dari Yojana
मंडळींनो शासन आपल्या कल्याणकारी राजव्यवस्थेच्या ( कामकाजातून ) महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना आर्थिक तसेच सामाजिक कल्याण – सुरक्षा या गोष्टीला प्राधान्य देते. हा उद्देश महाराष्ट्र शासन घेऊन जनकल्याणकारी अनेक योजना नागरिकांना राबवितात, याची तरतूद प्रत्येक वर्षीच्या अर्थसंकल्प ( budget ) मध्ये सुद्धा होते. शासन या संदर्भात जनजागृती सुद्धा करते, तुम्ही पाहिले असेल की बऱ्याचदा सरकारी कार्यालय तसेच ग्रामपंचायत किंबहुना एस टी महामंडळ च्या साईड च्या बाजूने तुम्हाला योजनांचे फलक सुद्धा पाहिले असेल यामध्ये सरकार कोट्यवधी रुपये खर्च करते या योजना लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी, पण जेव्हा नागरिक या योजना संदर्भात माहिती घेण्यासाठी शासकीय कार्यालय मध्ये येतात त्यावेळी तेथे योजनांची माहिती घेणे , कागदपत्रे जमा करणे/ सादर करणे यासाठी त्या संबंधित होणाऱ्या लाभार्थी / व्यक्तीला अनेक विविध प्रक्रियेतून जावे लागते. जर यात काही अडचणी आल्या किंवा त्रुटी आल्या तर त्या अडचणी किव्हा त्रुटी दूर करण्यासाठी वारंवार शासकीय कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात यातच बराच वेळ त्यांचा यामध्ये निघून जातो आणि शेवटी ती योजना काही भ्रष्टाचारा अभावी किंवा त्रुटी अभावी ती त्या संबंधित व्यक्तीला मिळत नाही. तसेच या योजना ची माहिती गरजू व्यक्तींना मिळत नाही किंवा त्यांना ती माहीत होतं नाही त्यामुळे सरकारचा जो उद्देश असतो की या योजना गरजू व्यक्तींना मिळावी तो उद्देश या मुळे पूर्ण होत नाही. या कारणास्तव सरकारने ही सफल योजना सुरू केली. सुरुवातीला काही भागामध्ये जसे की कल्याण, जामनेर, मुरबाड आणि चाळीसगाव या भागात योजना राबवली आणि ती यशस्वी झाली त्यानंतर ही योजना सरकारने महाराष्ट्रात 15 एप्रिल 2023 ते 15 जून 2023 या दरम्यान राबवणार आहे. या संदर्भात माहिती पुढे पाहू
शासन निर्णय : शासन आपल्या दारी, जत्रा शासकीय योजनांची Shasan Aplya Dari Campaign :
मंडळींनो महाराष्ट्र शासनाने, शासन आपल्या दारी ( जुने नाव आहे जत्रा शासकीय योजनांची ) या संदर्भात पहिला जीआर 13 एप्रिल 2023 ( नवीन पद्धतीने ) रोजी काढला. यामध्ये जे सरकारी योजना आहेत ( योजना लिस्ट खाली आहे ) ते सर्व गरजू लोकांनपर्यंत पोहचवणे हा उद्देश ठेवला. यासाठी महाराष्ट्र सरकारने ही योजना अधिक गतिमान करण्यासाठी जे योजना आहेत त्या योजना संबंधित प्रतिनिधी, योजनेचे अधिकारी, एका छता खाली काम करणारे सर्व कर्मचारी, ग्रामपंचायत मधील कर्मचारी, सेतू कार्यालय यांनी सर्वांनी एकत्र येऊन विविध योजनांचे लाभ कसे या दिलेल्या दिवसामध्ये देत येईल या संदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. ह्या योजना अधिक प्रभावी पणे अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे या अभिनव उपक्रमाचे प्रमुख असतील, 15 एप्रिल 2023 ते 15 मे 2023 ( जुलै २०२३ मुदतवाढ ) या कालावधीत गरजू नागरिकांना या योजना संदर्भात माहिती पोचवणे , प्रस्तावित जे लाभार्थी आहेत त्यांच्या याद्या तयार करणे, अर्ज भरून घेणे आणि लाभ त्यांना मिळवून देणे ( गतिमान प्रोसेस करून ) हे या उपक्रमाचे लक्ष्य अपेक्षित आहे.
यामध्ये महाष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात कमीतकमी 75 हजार गरजू लाभार्थ्यांचे लाभ तालुका स्तरावर 2 दिवसाचे कार्यक्रम आयोजन करून त्यांना मिळवून देणे, यासाठी मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे मदत / समनव्य घेण्यास या साठी सांगण्यात आले आहे , सुरुवातीला ( मे 2023 पर्यंत नुसार ) शासन जवजवळ या Shansan Aplya Dari योजनेत 53 कोटी खर्च करणार आहे यामध्ये विविध ठिकाणी जाहिरातीचे फलक लावणे व माहिती देणे यासाठी खर्च करणार आहे.
नवीन योजना पहा : बियाणे अनुदान योजना 2023, बियाणे अनुदान अर्ज सुरू
शासन आपल्या दारी : जत्रा शासकीय योजनांची योजना लिस्ट Shasan Aplya Dari Jatra Shasakiya Yojananchi yojana list :
या शासन आपल्या दारी या योजनांमध्ये / ऊपक्रमाध्ये खालील योजनाचा लाभ मिळणार आहे,
1.संजय गांधी निराधार योजना
2. श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती नवीन योजना
3. जीर्ण आणि खराब रेशन कार्ड बदलणे किंवा नवीन काढणे
4. नवीन वीज कनेक्टिव्हिटी
5. नवीन आधार कार्ड काढणे आणि दुरुस्ती
6. नवीन रेशन कार्ड काढणे
7. वीजबिल दुरुस्ती
8. दिव्यांग प्रमाणपत्र
9. जन्म मृत्यू नोंदणी
10. शासकीय दाखले ( उत्पन्न, रहिवासी, जात प्रमाण पत्र, नॉन क्रिमिलयेर, पडताळणी इत्यादी )
11. पी एम किसान योजना तृटी आणि नवीन समाविष्ठ करणे
11. कृषी व कृषीच्या योजना
१२. पॅन कार्ड
13. मनरेगा कार्ड
१४. नवीन मतदार नोंदणी
१५. ई-श्रम कार्ड
१६. सखी किट वाटप
१७. शिकाऊ चालक परवाना
१८. भरती मेळावा
१९. पीएफ योजना आणि घरकुल योजना
२०. पॅन कार्ड
२१. अश्या असंख्य योजना यात समाविष्ठ आहे
यातून ” सरकारी काम आणि यातून सहा महिने थांब’ ही सरकारी लोकांची मानसिकता या संकल्पना बदलणार आहे.
FAQ किंवा प्रश्नावली
1. शासन आपल्या दारी Shasan Aplya Dari या उपक्रमाची सुरुवात कोणाच्या काळात झाली ?
Shasan aplya Dari शासन आपल्या दारी या उपक्रमाची सुरुवात 15 एप्रिल 2023 मध्ये झाली ती 15 जून 2023 पर्यंत राहणार आहे. हा उपक्रम जुलै 2023 पर्यंत चालणार आहे. हा उपक्रम राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडवणीस यांनी राबविला आहे.
2. शासन आपल्या दारी ही योजना काय आहे ?
शासन आपल्या दारी, जत्रा शासकीय योजनांची Shasan Aplya Dari Jatra Shaskiya Yojananchi या योजनेमध्ये सर्व शासकीय कार्यालयातील कर्मचारी गावपातळीवर जाऊन संबंधित विभागातील सर्व योजना 15 एप्रिल 2023 ते 15 जून 2023 या कालावधीत त्या गरजू व्यक्तीला मिळवून देणारा आहे. यामध्ये त्या गरजू व्यक्तीला होणारी हेडसाळ किंवा होणाऱ्या त्रुटी व्यवस्थित करून ती योजना त्या व्यक्तीला चालू करणार आहे. हा एक अभिनव आणि ऐतिहासिक उपक्रम आहे त्या मार्फत वर्षोनो वर्ष रखडलेले गरजू व्यक्तीच्या योजना त्या व्यक्तीला मिळवणार आहे. सध्या शासन आपल्या दारी 1.0 shasan aplya dari 1.0 मध्ये प्रत्येक जिल्ह्यात 75 हजार गरजू व्यक्तींची लिस्ट काढली जाणार आहे ती महाराष्ट्र शासनाकडे पाठवला जाणार आहे
3. शासन आपल्या दारी Shasan Aplya Dari ही योजना कधी चालू झाली ?
– शासन आपल्या दारी ही योजनेचा जीआर हा 13 एप्रिल 2023 ला काढण्यात आला आणि या अभिनव उपक्रमाची प्रथम कालावधी हा 15 एप्रिल 2023 ते 15 जून 2023 असा दोन महिने सलग असणार आहे. हा कालावधी वाढवू शकतो.
4. शासन आपल्या दारी Shasan Aplya Dari या उपक्रमात किंवा योजनेत कोणत्या गोष्टी मिळणार आहे ?
– शासन आपल्या दारी या योजनेत सर्व शासकीय योजना ( पेन्शन योजना, कृषी योजना, सामाजिक योजना, सेतू दाखले यासोबत इतर माहिती शासकीय अधिकाऱ्यानं मार्फत गाव पातळी पर्यंत सर्वांना मिळणात आहे
5. शासन आपल्या दारी या उपक्रमात सुरुवातीला किती खर्च केला जाणार आहे ?
– शासन आपल्या दारी योजनेत सुरुवातीला 53 कोटी खर्च केला जाणार त्यामध्ये वाढ होणार आहे. ,या 53 कोटी खर्चात शासकीय योजनेची तसेच या उपक्रमाचे पोस्टर ( शासकीय दरात ) सर्वत्र पोचवले आहे ( रिक्षा, महामंडळ, गावपातळीवर बॅनर हे त्यामध्ये असणार आहे
6. शासन आपल्या दारी हा उपक्रम यशस्वी झाला आहे का ?
– शासन अप्लाय दारी हा उपक्रम एक अभिनव उपक्रम आहे, सुरुवातीला काही जिल्ह्यात राबविला त्यामध्ये मोठा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला, अनेक लोकांना गरजू व्यक्तींना याचा फायदा झाला.
7. शासन आपल्या दारी योजना काय आहे ? Shasan aplya Dari Yojana Kay ahe ?
शासन आपल्या दारी एक महाराष्ट्र शासनाचा उपक्रम आहे या उपक्रमा मार्फत महाराष्ट्रातील सर्व जाती पंथाच्या लोकांना शासन राबवित असलेले योजनाची माहिती त्यांना देणे, त्यासाठी आवश्यक ते कागतपत्रे घेऊन त्या योजना तत्काळ त्यांना चालू करणे, त्या योजना चालू करताना कोणताही अडथळा न आणता त्या समाजाच्या सर्व घटका पर्यंत पोहचवणे या Shasan Aplya Dari उपक्रमाचा उद्देश आहे.
shasan aplya dari
shasan aplya dari in marathi
shasan aplya dari gr
नवीन योजना पहा :
बियाणे अनुदान योजना 2023, बियाणे अनुदान अर्ज सुरू
शौचालय अनुदान योजना महाराष्ट्र, अर्ज असा करा 12 हजार रुपये मिळवा