Whatsapp Dual Number Login : नमस्कार मित्रांनो व्हाट्सअप नेहमी वापर करताना विविध फीचर्स आणत असते यामध्ये विविध स्टिकर्स असतात किंवा स्टेटस संदर्भात फीचर असतात किंवा कधीकधी युजर असणार नियमावली सुद्धा आणते यामुळे बऱ्याचदा मोबाईल नंबर ब्लॉक केले जातात.
पण काही दिवसापूर्वी व्हाट्सअप ने एक फीचर आणलेला आहे याचा फायदा नक्कीच वापरकर्त्यांना होणार आहे जे नियमित व्हाट्सअप वापरतात किंवा दोन दोन तीन तीन मोबाईल मध्ये व्हाट्सअप वापरतात अशांना आता एकाच मोबाईल मध्ये एकाच व्हाट्सअप मध्ये दोन दोन नंबर वरून व्हाट्सअप वापरता येणार आहे.
चला तर पाहू एकाच नंबर मध्ये दोन व्हाट्सअप कसे वापरायचे तुम्ही पाहिला असेल सुरुवातीला दोन दोन व्हाट्सअप वापरायचे असेल तर त्यासाठी दोन दोन मोबाईल लागायचे किंवा एकाच मोबाईल मध्ये दोन व्हाट्सअप वापरायचे असेल तर बऱ्याचदा आपण एक नॉर्मल व्हाट्सअप दुसरं म्हणजे बिजनेस व्हाट्सअप वापरावे लागत असेल बिझनेस व्हाट्सअप चे विविध नियम आहेत यामुळे जर काही डाटा शेअर केला तर तुमचे अकाउंट हे बंद केले जात होते आणि चालू करण्यासाठी तुम्हाला किंवा व्हाट्सअप शी कॉन्टॅक्ट करावा लागत होता. किंवा दोन व्हाट्सअप वापरण्यासाठी तुम्ही क्लोन व्हाट्सअप चा पर्याय शोधत असाल.
ही समस्या व्हाट्सअप ने ओळखले आणि काही दिवसापूर्वी एकाच व्हाट्सअप मध्ये दोन नंबर वापरण्याची सुविधा whatsappने दिलेली आहे पण बऱ्याचदा एकाच व्हाट्सअप मध्ये दोन नंबर कसे वापरायचे याबद्दल माहिती नसते चला तर आजच्या पोस्टमध्ये आपण एकाच व्हाट्सअप मध्ये दोन नंबर कसे वापरायचे याबद्दल माहिती पाहू
व्हाट्सअप मध्ये हे फीचर कसे वापराल ?
एकाच मोबाईल मध्ये एकाच व्हाट्सअप मध्ये दोन दोन नंबर वरून व्हाट्सअप वापरणे एकदम सोपा आहे आणि सरळ आहे यासाठी तुमच्याकडे वेगवेगळे सिम कार्ड पाहिजे आणि त्यांचे नंबर पाहिजे एकाच सिम कार्ड वरून दोन व्हाट्सअप वापरता येत नाही तर त्यासाठी तुम्हाला दोन दोन नंबर पाहिजे
- हे फीचर वापरण्यासाठी सुरुवातीला तुम्ही व्हाट्सअप लॉगिन करा
- व्हाट्सअप लॉगिन केल्यानंतर उजव्या बाजूला वरती एका लाईनीत तीन टिंब दिसतील तेथे तुम्हाला सेटिंग चा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.
- सेटिंग या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर वरती तुम्हाला तुमचा फोटो त्याच लाईन मध्ये तुम्हाला क्यूआर कोड दिसेल आणि त्याच्या शेजारी उजव्या बाजूला एक प्लस चे + चिन्ह दिसेल.
- या प्लस च्या चिन्हाला क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली ऍड अकाउंट Add acount हा ऑप्शन दिसेल या अकाउंटला क्लिक करा
- क्लिक केल्यानंतर तुम्हाला नवीन व्हाट्सअप म्हणजे एकाच व्हाट्सअप मध्ये दुसरा नंबर वरून व्हाट्सअप चालवण्याची प्रोसेस दिसेल यामध्ये ॲग्री आणि कंटिन्यू करून तुम्ही दुसरा नंबर वरून व्हाट्सअप वापरू शकता
- म्हणजे एकाच व्हाट्सअप मध्ये दोन नंबरचे व्हाट्सअप तुम्ही या ठिकाणी वापरू शकता
अशाप्रकारे तुम्ही एकाच मोबाईल मध्ये आणि एकाच व्हाट्सअप मध्ये दोन नंबर वरून व्हाट्सअप वापरू शकता यासाठी दुसरा मोबाईल घेण्याची गरज नाही किंवा व्हाट्सअप बिजनेस वापरण्याची गरज नाही.
व्हाट्सअप ने ही प्रोसेस किंवा ही फीचर सुरुवातीपासूनच सर्वांसाठी खुले केले होते पण बऱ्याच लोकांना याबद्दल माहिती नव्हती आज आपण याबद्दल माहिती पाहणार आहोत व्हाट्सअप मध्ये दिलेल्या विविध प्रायव्हसी आणि नोटिफिकेशन वर तुमचे यामध्ये कंट्रोल असणार आहे आणि यामध्ये तुमची सुरक्षा सुद्धा असणार आहे.