Ahmednagar : अहमदनगर जिल्हा परिषदेत काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर खाजगी एजंटचा सुळसुळाट वाढला आहे. हे एजंट सरकारी कर्मचारी असल्याचे सांगून तुम्हाला जिल्हा परिषदेतून कडबा कुट्टी मशीन ( Kadabakutti Machine Scheme ) मिळवून देतो. त्यासाठी हे एजंट त्या शेतकऱ्याला जिल्हा परिषद शिवारात बोलावुन घेतात आणि जवळजवळ 10 हजार रुपये या शेतकऱ्याकडून उकळतात. आणि त्यानंतर फाईल आणतो म्हणून त्याठिकानावरून गायब होतात. अशी घटना पारनेर तालुकातील एका शेतकऱ्या बाबत घडली असता हा प्रकार उघडीस आला आहे.
फसवणूक झालेला शेतकरी हा पारनेर तालुक्यातीलआहे. या आधीही जिल्हा परिषदेच्या कृषी योजनेचा लाभ मिळवून देतो नावाखाली असे अनेक प्रकार घडले आहेत. शेतकऱ्यांकडून या संदर्भात अनेक लेखी तक्रारी दाखल केल्या आहेत. मात्र त्याची दखल घेतली जात नाही.
जिल्हा परिषदेच्या योजनांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागितले जातात… यावरून अर्जाची लॉटरी पद्धतीने नावे जाहीर केली जातात. त्यामुळे अश्या जिल्हा परिषदेच्या योजनांना कोणाच्याही वशील्याची गरज लागत नाही. सरकारी सर्व योजना आता ऑनलाईन झाल्या त्यामुळे कोणीही या योजनांसाठी कोणत्या खाजगी एजंट ला पैसे देऊ नये. असे संभाजी लांगोरे ( अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ) यांच्याकडून सांगण्यात येत आहे.
नमस्कार, महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतेच वृद्ध कलाकारांना आर्थिक मदत देण्यासाठी ' कलाकार मानधन योजना '2025…
नमस्कार, आपण घरकुल योजने साठी फॉर्म भरतो आणि घरकुल योजनेचा फॉर्म मंजूर होतो, पण घर…
नमस्कार "पिंक ई-रिक्षा योजना" हि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले…
"ड" अक्षराने सुरू होणाऱ्या 100 गावांची नावे खालीलप्रमाणे: d varun gavachi naave ड वरून गावांची…
गाव नमुना 14 (Form 14) हा एक सरकारी दस्तऐवज आहे जो मुख्यत: महाराष्ट्र राज्यातील कृषी…
महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने कामगारांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवल्या जातात. कामगारांची नोंदणी, नूतनीकरण, आणि लाभ…
This website uses cookies.