नमस्कार शेतकरी बांधवांनो, सरकार मार्फत अनेक योजनांचे पैसे तुमच्या खात्यावर येत असतात.
किंवा शासनाच्या विविध योजनांचा लाभ तसेच अनुदान मिळवण्यासाठी तुमच्या बँकेला आधार लिंक असणे महत्वाचे असते याला आपण आधार सीडिंग ( adhar seeding ) म्हणतो.
जर तुमच्या बँक खात्याला आधार लिंक ( seeding ) नसेल तर तुम्हाला कोणतेच डीबीडी चे अनुदान – मदत मिळत नाही आणि मिळणारही नाही.
तुमच्या शेजारील शेतकऱ्याला अनेकदा बँक खात्यावर पैसे येतात पण तुमच्या बँक खात्यावर काहीच पैसे किंवा अनुदान येत नाही तर आपण नंतर विचार करतो की आपल्याला ही सरकारी अनुदान रक्कम मिळाली नाही किंवा का मिळत नाही. यासंदर्भात आपण तत्काळ बँक शाखेत जाऊन या संदर्भात माहिती घ्यावी.
कधी कधी Ekyc ( बँक आधार केवायसी ) नसेल तर हे एक कारण असू शकते अनुदान न जमा होण्या माघे, जर आपण Ekyc ( इकेवायसी ) केल्यानंतर सुद्धा जर इतर शेतकऱ्यानं प्रमाणे अनुदान येत नसेल तर या याठिकाणी NPCI Mapping form चा प्रॉब्लेम आहे आणि हा प्रॉब्लेम ( समस्या ) जर तुम्ही सोडवला तर अनुदान जमा होण्यास सुरुवात होईल.
तर आजच्या लेखा मध्ये आपण NPCI Mapping form ( adhar bank seeding form ) संदर्भात माहिती पाहणार आहोत
शेतकरी बंधुनो, जर तुम्हाला शासकीय अनुदान बँक खात्यावर मिळवायचे असेल तर तुम्ही तुमच्या खाते असणाऱ्या बँक शाखेत जाऊन NPCI Mapping form भरून दयायचा आहे.
सोबत काही कागदपत्रे जोडायची आहेत ती खालीलप्रमाणे आहेत.
Npci Mapping form सोबत खालील कागदपत्रे जोडायची आहेत.
शाखेत गेल्यानंतर हा ‘ फॉर्म शासनातर्फे अनुदान जमा होण्या संदर्भात ‘ जारी करण्यात आला आहे असे सांगावे. तरच आम्हाला शासकीय अनुदान dbt मार्फत मिळणार आहे हे देखील सांगावे.
1. तुमच्या बँक खाते असणाऱ्या बँकेचे नाव
2. बँकेची शाखा ( ठिकाण )
3. तुमचा बँक खाते क्रमांक
4. तुमची सही ( बँक खातेदाराची )
5. तुमचे नाव ( बँक खातेदाराचे नाव )
6. तुमचा active असणारा मोबाईल नंबर किंवा लिंक असणारा मोबाईल नंबर
7. तुमचा इमेल आयडी
वरील सर्व कागदपत्रे सादर केल्यानंतर आणि बँकेने ही NPCI Mapping शी तुमचे खाते आणि आधार mapping केल्यानंतर तुम्हाला सर्व शासकीय अनुदान जमा होण्यास सुरुवात होईल.
NPCI Mapping काय आहे ?
NPCI म्हणजे National Payment Corporation of India ही एक सरकारी संस्था आहे ( Umbrella Organisation ) यामार्फत सर्व देयके ( Payment ) तसेच सर्व Payment settlment होतात.
या संस्थेची स्थापना 2008 मध्ये झाली पण 2013 कंपनी ऍक्ट कलम 8 नुसार ना- नफा यावर आधारित संस्था आहे. रिजर्व बँकेची यावर मालकी आहे. NPCI Mapping म्हणजे NPCI कडे तुमचे बँक खाते आणि आधार कार्ड लिंक करणे.
NPCI आधार कार्ड नंबर मार्फत सरकारी सर्व अनुदान DBT द्वारे NPCI कडे लिंक असणाऱ्या बँक खात्यावर पाठवत असते.
तुमचे खाते असणारी बँक यांच्याकडे mapping करू शकते.
यासाठी NPCI ने एक फॉर्म जरी केला आहे तो भरून बँकेकडे जमा करायचा आहे, त्यानंतर कोणतेही आधार मार्फत अनुदान मिळेल.
NPCI MAPPING FORM कुठून मिळवायचा किंवा डॉऊनलोड करायचा ?
Npci फॉर्म पाहिजे असेल खाली त्याची लिंक दिली आहे तो डॉऊनलोड ( मिळवून ) फॉर्म बँकेकडे जमा करायचा आहे
नमस्कार, महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतेच वृद्ध कलाकारांना आर्थिक मदत देण्यासाठी ' कलाकार मानधन योजना '2025…
नमस्कार, आपण घरकुल योजने साठी फॉर्म भरतो आणि घरकुल योजनेचा फॉर्म मंजूर होतो, पण घर…
नमस्कार "पिंक ई-रिक्षा योजना" हि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले…
"ड" अक्षराने सुरू होणाऱ्या 100 गावांची नावे खालीलप्रमाणे: d varun gavachi naave ड वरून गावांची…
गाव नमुना 14 (Form 14) हा एक सरकारी दस्तऐवज आहे जो मुख्यत: महाराष्ट्र राज्यातील कृषी…
महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने कामगारांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवल्या जातात. कामगारांची नोंदणी, नूतनीकरण, आणि लाभ…
This website uses cookies.