राज्यात मुलींचा जन्म दर वाढवणे, याच बरोबर मुलीच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहान देणे या बाबत खात्री करणे यासाठी महाराष्ट्रात १ ऑगस्ट २०१७ पासून ” माझी कन्या भाग्यश्री ” हि नवीन आणि सुधारित योजना सुरु करण्यात आली होती. हि योजना किवा या योजनेस मिळणारा प्रतिसाद पाहता मुलींच्या शिक्षणासाठी एक नवीन योजना काढावी असे सरकारला वाटत होते. तर या वर्षी २०२३- २०२४ अर्थसंकल्पीय भाषणात मुलींसाठी किवा मुलींच्या सक्षमी करणासाठी महाराष्ट्रात ” लेक लाडकी योजना ” सुरु करण्यात येईल असे सांगण्यात आले होते. बजेट किवा अर्थसंकल्पीय भाषणात या योजने मार्फत मुलींचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यावर तिला ७५ हजार रुपये रोख देण्यात येईल असे सुद्धा सांगण्यात आले होते.
1 ऑगस्ट २०१७ पासूनची योजना ” माझी कन्या भाग्यश्री ” या योजनेचे सुधारित नाव आता ” लेक लाडकी योजना ” असे करून Lek Ladki Yojana Maharashtra Application ती महाराष्ट्रात १ एप्रिल २०२३ पासून लागू होईल असे या शास्सन निर्णयात सांगण्यात आले आहे.
१. या ” लेक लाडकी योजना ” योजने मार्फत मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देणे तसेच त्यांना जन्म दर वाढवणे हे सुद्धा उद्धिष्टे ठेवले आहे.
२. या योजने मार्फत महाराष्ट्रातील मुलींना शिक्षणास चालना देणे.
३ . बालविवाह थांबवणे तसेच मुलींचा मृत्यू दर कमी करणे
4. मुलींचे कुपोषण थांबवणे.
5. शाळा बाह्य असणारे मुलींचे प्रमाण कमी करून ते ” 0 ” वर आणणे.
१. ” लेक लाडकी योजना ” Lek Ladki Yojana Maharashtra Application हि महाराष्ट्रात राहणाऱ्या मुलींसाठी आहे .
२. ज्या कुटुंबाकडे पिवळे रेशन कार्ड किंव्हा केशरी रेशन कार्ड आहे त्यांच्या साठी हि ” लेक लाडकी योजना ” आहे.
१. मुलींच्या जन्मा नंतर ५ हजार रुपये मिळणार
२. इयत्ता १ लीला गेल्यावर 6 हजार रुपये मिळणार
३. इयत्ता 6 वीला गेल्यावर 7 हजार रुपये
4. इयत्ता ११ वीत गेल्यावर ८ हजार रूपये
५. मुलीचे ( लाभार्थी ) चे १८ वय झाल्यावर ७५ हजार रुपये असे या प्रमाणे 1,01,000/- एवढी रक्कम लाभार्थी च्या बँक खात्यावर देण्यात येईल.
१. हि ” लेक लाडकी योजना ” Lek Ladki Yojana Maharashtra Application पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी आहे.
२. हि ” लेक लाडकी योजना ” योजना १ एप्रिल २०२३ रोजी आणि यानंतर जन्मा नंतर येणाऱ्या एक मुलगी किवा दोन मुलींसाठी च आहे , जर एक मुलगा आणि एक मुलगी असे तर हि योजना Lek Ladki Yojana Maharashtra Application फक्त मुलीलाच लागू राहील. मात्र त्यानंतर त्या लाभार्थी कुटुंब माता / पित्याने कुटुंब नियोजन शस्रक्रिया करणे सक्तीचे असणार आहे.
3. जर जुळी अपत्ये जर दुसऱ्या प्रसूतीच्या वेळीस झाली तर तर जन्माला येणाऱ्या मुलीला ही योजना लागू राहणार आहे ( जर मुलगा आणि मुलगी झाली तर फक्त मुलीला , जर दुसऱ्या वेळी दोन्ही मुलीच झाल्या तर त्या दोन्ही मुलींना ) याचा लाभ मिळेल .
4. 1 एप्रिल 2023 नंतर जन्म घेतलेल्या पहिल्या किंवा दुसऱ्या मुलीला च ही ” लेक लाडकी योजना ” योजना लागू राहील. पण यामध्ये कुटुंब नियोजन शस्रक्रिया माता / पित्याची झालेली पाहिजे.
5. लाभ घेणारे जे कुटुंब असणार आहे ते महाराष्ट्रातील रहिवासी पाहिजे.
6. तसेच लाभार्थी ( मुलीचे ) बँक खाते हे महाराष्ट्रात असणे आवश्यक आहे.
7. यामध्ये उत्पन्नाची अट घातलेली आहे, लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम ही 1 लाख पेक्षा जास्त नसावे.
1. मुलीचा ( लाभार्थी ) जन्माचा दाखला लागेल.
2. कुटुंब प्रमुखाचा उत्पन्न दाखला लागेल ( वार्षिक उत्पन्न हे 1 लाख पेक्षा जास्त नसावे. )
3. लाभार्थी कडे आधार असावे ( पहिला लाभ हा जन्मा नंतर असल्यामुळे फक्त पहिला लाभ घेण्यापूर्वी आधार कार्ड नसेल तरी चालेल, याठिकाणी आधार कार्ड ची अट शिथिल केली आहे.
4. पालकांचे आधार कार्ड लागेल
5. बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानांची झेरॉक्स प्रत लागेल. त्यानंतर
6. रेशन कार्ड लागेल ( फक्त पिवळे आणि केशरी रेशन कार्ड साठी )
7. मतदान ओळख पत्र ( इलेक्शन कार्ड ) ची झेरॉक्स प्रत. ( शेवटच्या लाभ घेण्या करीता मतदान कार्ड त्या संबंधित मुलीचे लागणार आहे.
8. संबंधित जे लाभाचे टप्पे निर्धारित केले आहे. या टप्प्यावर लाभ घेताना शाळेतील बोनाफाईड लागणार आहे.
9. कुटुंब नियोजन शस्र क्रिया प्रमाण पत्र
10. ज्या वेळी शेवटचा टप्पा लाभ घेणार आहे , त्यावेळी त्या संबंशीत मुलीचे विवाह झालेले नसावे तरच मिळेल. तसेच अविवाहित असल्याबाबत लाभार्थीचे स्वयं घोषणपत्र लागणार आहे.
1. सदर लाभ Lek Ladki Yojana Maharashtra Application घेण्यासाठी मुलीचा जन्म हा 1 एप्रिल 2023 नंतर आलेला असावा.
2. त्यानंतर ( जन्मा नंतर ) त्या मुलीचा संबंधित ग्रामीण किंवा शहरी भागातील ठिकाणी मुलीची जन्माची नोंद करावी, जन्माची नोंद केल्यानंतर
3. त्या भागातील ( रहिवासी क्षेत्रातील ) अंगणवाडी सेविकेकडे अर्जासह ( लेक लाडकी योजनेचा अर्ज खाली जीआर मध्ये दिला आहे ) करावा लागणार आहे , त्या अंगणवाडी सेविकेला सर्व कागदपत्रे जोडून तो अर्ज Lek Ladki Yojana Maharashtra Application देयचा आहे. ( आवश्यक वाटल्यास अंगणवाडी सेविकेने अर्ज भरण्यास मदत करावी ). त्यानंतर अंगणवाडी सेविकेने तो अर्ज अंगणवाडी मधील पर्यवेक्षिका / मुख्य सेविका कडे जमा करायचा आहे.
4. तेथील अंगणवाडी पर्यवेक्षिका / मुख्य सेविका यांनी तो आलेला अर्ज व्यवस्थित छाननी करून ( व्यवस्थित कागद पत्रांची तपासणी करून ) प्रत्येक महिन्याला त्या भागातील बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे मान्यते साठी पाठवायचा आहे.
5. तो अर्ज बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे मंजुरी साठी पाठवायचा आहे.
6. तो आलेला अर्ज जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी व्यवस्थित छाननी करून आलेल्या अर्जांना मान्यता देऊन त्याची यादी करून , ती यादीस मान्यता देऊन ती यादी आयुक्तालयास पाठवायची आहे. ( अपवाद – अपंग / अनाथ यांनी अर्ज जोडताना सोबत प्रमाण पत्र जोडावे )
1. लेक लाडकी योजना लाभार्थ्यांची नोंदणी ही ऑनलाईन करण्याची जबाबदारी ही अंगणवाडी सेविका तसेच तेथील पर्यवेक्षिका / मुख्य सेविका यांची असणार आहे. आलेले सर्व Document त्यांनी पोर्टल वर भरावीत.
2. लाभार्थ्यांकडून lek Ladki Yojana अर्ज मात्र हा ऑफलाईन घ्यावा असे सांगितले आहे , आलेला ऑफलाईन अर्ज हा ऑनलाईन करण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविकेकडे दिले आहे.
3. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर जमा असलेला अर्ज हा सक्षम अधिकऱ्या कडे जमा करायचा आहे.
1. यामध्ये सुरुवातीला वैयक्तिक माहिती भरायची आहे ( ऑफलाईन अर्ज मध्ये ) –
– लाभार्थ्यांचे नाव
– आधार कार्ड क्रमांक,
– लाभार्थ्यांच्या पालकांचे नाव ( आई / वडील )
– पालकांचे आधार कार्ड क्रमांक
– मोबाईल ( भ्रमणध्वनी ) नंबर
– इमेल आयडी असेल तर
2. त्यानंतर यामध्ये पत्ता पूर्ण व्यवस्थित येथे भरायचा आहे.
3. योजना घेताना कितवे अपत्ये आहे ते नमूद करणे आवश्यक आहे ( संख्या , उदा – 2 )
4. त्यानंतर बँक संदर्भात माहिती भरायची आहे ( यामध्ये बँकेचा IFSC Code , बँकेच्या शाखेचे नाव , तसेच बँक आधार कार्ड शी संलग्न आहे की नाही तेथे नमूद करायचे आहे.
5. त्यानंतर या फॉर्म मध्ये लेक लाडकी योजनेचा कितवा टप्पा किंवा हप्ता साठी अर्ज केला आहे तेथे टिकमार्क करायचे आहे किंवा नमूद करायचे आहे.
6. त्यानंतर दिलेली माहिती ही अचूक आणि बरोबर असून या संदर्भात समंती द्यायची आहे आणि तेथे संबंधित पालकांचे ( जो पालक असेल तो आई वडील यापैकी कोणीही). सही किंवा अंगठा त्या ठिकाणी देयचा आहे. आणि हा अर्ज सोबत वरील सर्व कागदपत्रे अंगणवाडी सेविकेकडे जमा करायचा आहे.
7. महत्वाचे म्हणजे हा अर्ज संबंधित मुलगी जन्म घेतल्यानंतर लगेच काही दिवसाच्या आत करायचा आहे.
लेक लाडकी योजना साठी अर्ज हा तुमच्या भागातील असणाऱ्या अंगणवाडी सेविका यांच्याकडे असणार आहे तो झेरॉक्स करून व्यवस्थित भरून पुन्हा त्यांच्याकडे सर्व कागद पत्रांच्या पूर्ततेसह जमा करायचा आहे. त्यांच्याकडे आलेला अर्ज हा तो ऑनलाईन करणार आहे. तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येणार नाही.
लेक लाडकी योजना पात्रता तेसाठी वय हे 1 एप्रिल 2023 नंतर जन्म घेतलेल्या कुटुंबातील पहिल्या दोन मुलींना आहे.
लेक लाडकी योजना ही फेब्रुवारी 2023 ला घोषणा करण्यात आली त्यानंतर या योजनेचा शासन निर्णय ( जीआर ) ,हा 30 ऑक्टोबर 2023 ला आला. आणि याची अंमलबजावणी तारीख ही 1 एप्रिल 2023 ही देण्यात आलेली आहे. म्हणजे 1 एप्रिल 2023 नंतर कुटुंबात जन्म घेतलेल्या पहिल्या दोन मुलींना याचा फायदा होणार आहे.
या योजनेचा अर्ज डाउनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा
नमस्कार, महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतेच वृद्ध कलाकारांना आर्थिक मदत देण्यासाठी ' कलाकार मानधन योजना '2025…
नमस्कार, आपण घरकुल योजने साठी फॉर्म भरतो आणि घरकुल योजनेचा फॉर्म मंजूर होतो, पण घर…
नमस्कार "पिंक ई-रिक्षा योजना" हि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले…
"ड" अक्षराने सुरू होणाऱ्या 100 गावांची नावे खालीलप्रमाणे: d varun gavachi naave ड वरून गावांची…
गाव नमुना 14 (Form 14) हा एक सरकारी दस्तऐवज आहे जो मुख्यत: महाराष्ट्र राज्यातील कृषी…
महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने कामगारांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवल्या जातात. कामगारांची नोंदणी, नूतनीकरण, आणि लाभ…
This website uses cookies.