नमस्कार मित्रांनो आज आपण नरेंद्र मोदी सरकारच्या सर्वात अतिशय लोकप्रिय असणाऱ्या दहा योजना बद्दल सविस्तरपणे माहिती पाहू. या दहा योजना अतिशय लोकप्रिय आहेत तर या दहा योजनांचा लाभ कसा घ्यायचा आणि कोणाला फायदा होणार आहे या संदर्भात आपण पूर्ण माहिती पाहणार आहोत.
केंद्र सरकार किंवा मोदी सरकार भारतामध्ये रहिवासी साठी अनेक विविध योजना आणत असते काही योजना सामाजिक दृष्ट्या असतात, काही योजना आर्थिक पाठबळ देण्यासाठी असतात, तर काही योजना ह्या सबसिडी पुरवण्यासाठी तयार केलेले असतात तर या संदर्भात आपण डिटेल अशी माहिती पाहणार आहे. चला तर पाहूया या दहा योजना कोणत्या आहेत ज्या अतिशय लोकप्रिय आहेत.
मित्रांनो केंद्र सरकार मार्फत तसेच मोदी सरकार मार्फत सन 2019 मध्ये शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी योजना तयार केली गेली तीच नाव आहे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना. या योजनेमार्फत जे पात्र शेतकरी आहेत त्या सर्वांना या योजनेचे पैसे मिळत आहे. ज्या ज्या शेतकऱ्यांना हे पैसे मिळत नाही त्यांनी हा फॉर्म ऑनलाईन भरून द्यायचा आहे.
पण या ठिकाणी एक प्रमुख अट आहे तुमच्या नावाचे क्षेत्र झालेले आहे ते क्षेत्र फेब्रुवारी 2019 च्या आत मध्ये झालेले असावे. या पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जे पात्र शेतकरी आहेत त्या पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये हे तीन टप्प्यांमध्ये दिले जात आहे. तुम्ही पाहिल्यास नुकतेच महाराष्ट्र शासनाने सुद्धा एक योजना काढली आहे तिचे नाव आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेत सुद्धा जे पात्र शेतकरी आहेत पीएम किसान मध्ये त्या सर्व शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात.
म्हणजे पीएम किसान चे सहा हजार रुपये आणि नमो शेतकऱ्याचे सहा हजार रुपये वार्षिक असे एकूण वार्षिक 12 हजार रुपये शेतकऱ्यांना मिळत आहे. त्यामुळे ही पीएम किसान योजना अतिशय लोकप्रिय योजना असे मानले जाते. आणि हे जे पैसे असतात यामध्ये कोणीही मध्यस्थी नसतो, जी शेतकरी आहेत त्यांच्या डायरेक्ट बँक खात्यावर डीबीटी मार्फत जमा केले जात आहे.
तुम्ही पाहिला असेल 2020 मध्ये, म्हणजे ज्यावेळी कोरोना महामारी सुरुवात झाली. त्यावेळी केंद्र सरकारने किंवा मोदी सरकारने या पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना या योजनेची सुरुवात केली. कोरोना काळामध्ये मोठ्या प्रमाणावर लोक डाऊनचा काळ असल्याकारणाने. भारतातील जे रहिवासी आहेत त्यांना कोणते काम नव्हते त्यांना अन्न मिळावे म्हणून या योजनेची सुरुवात केली गेली.
या पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना, या योजनेमार्फत भारतातील 80 कोटी लोकांना मोफत अन्न दिले गेले. सध्या या पंतप्रधान करीत कल्याण अन्न योजना मुदत वाढ ही फेब्रुवारी 2028 पर्यंत केली गेली आहे. त्यामुळे फेब्रुवारी 2028 पर्यंत 80 कोटी लोकांना मोफत अन्न दिले जाणार आहे. या यांना मध्ये समावेश मुख्याता पाच किलो गहू आणि तांदूळ हे आहे.
मित्रांनो उज्वला गॅस योजना केंद्र सरकारसाठी एक गेम चेंजर योजना असे म्हणता येईल. देशातील जे महिला आहेत त्यांचे जीवनमान बदलण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली. घरातील महिला स्वयंपाक करण्यासाठी आता गॅस वापरणार आहेत आणि यादी जर पाहिला आपण चुली समोर स्वयंपाक केला तर धुराचा मोठा सामना महिलांना करावा लागत होता हि बाब लक्षात घेता मोदी सरकारने महिलांसाठी मोफत गॅस योजना सुरू केली तिचं नाव आहे उज्वला गॅस योजना. या योजनेची सुरुवात मे 2016 मध्ये झाली होती.
ज्या गरीब महिला आहेत किंवा बीपीएल कार्डधारक महिला आहेत त्यांना वर्षभरात बारा सिलेंडर हे अनुदानावर दिले जातात. तुम्ही जर आकडेवारी पाहिली तर एक मार्च 2023 पर्यंत जवळजवळ 9.59 कोटी उज्वला गॅस योजनेचे लाभार्थी आहेत आता केंद्र सरकारने यामध्ये विस्तार केलेला आहे याची संख्या येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर होऊ शकते.
या गॅस साठी म्हणजे उज्वला गॅस योजनेसाठी केंद्र सरकारने एकूण 1650 कोटी खर्च करून हे नवीन उज्वला गॅस कनेक्शन दिलेले आहे.
मित्रांनो भारतामध्ये खेड्यापाड्यांमध्ये विविध कारागीर आणि हस्तकलाकार असतात तर त्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी केंद्र सरकार मार्फत पीएम विश्वकर्मा योजनेची सुरुवात केली गेली. . केंद्र सरकारने या पीएम विश्व कर्मा योजनेसाठी आतापर्यंत 13000 कोटी राखीव तरतूद करण्यात आली. येणाऱ्या पाच वर्षाच्या काळामध्ये म्हणजे 2023 ते 2018 पर्यंत त्यांना हे पैसे वाटप केले जाणार आहे. म्हणजे कारागीर आहेत किंवा हस्तकलागार आहेत तर त्यांना एक प्रकारचं प्रमाणपत्र हे या योजनेमार्फत दिले जाणार आहे. याच्यामध्ये म्हणजे या योजनेमध्ये तुम्हाला 1 लाख रुपये पर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध केले जाणार आहे. त्यानंतर दुसरा टप्प्यांमध्ये म्हणजे तुम्हाला जर दोन लाख रुपये कर्ज पाहिजे असेल तर त्यासाठी पाच टक्के व्याजदर लावून हे कर्ज दिले जाणार आहे आणि महत्त्वाचे म्हणजे यासाठी कोणती हमीभाव घेतले जाणार नाही. त्यामुळे ही पीएम विश्वकर्मा योजना कारागिरासाठी किंवा जे हस्तकलाकार आहेत त्यांच्यासाठी एक वरदानच ठरणार आहे. या योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही पीएम विश्वकर्मा योजना या वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा आहे.
मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना ही सुद्धा एक लोकप्रिय योजना असं म्हणता येईल कारण या योजनेमार्फत जे भारतातील रहिवासी आहेत गरीब लोक आहेत तर त्यांना हक्काचा जर असावा म्हणून मोदी सरकार मार्फत किंवा केंद्र सरकार मार्बल ही प्रधानमंत्री आवास योजना सुरू करण्यात आली.
या योजनेअंतर्गत जे गरीब लोक आहेत ग्रामीण भागासाठी 1,20000 रुपये अनुदान तर शहरी भागासाठी 1,30000 रुपये एवढे अनुदान घर बांधण्यासाठी दिले जाते. आणि तसं जर पाहिलं तर राज्य सरकार मार्फत सुद्धा काही पैसे हे घर बांधण्यासाठी दिले जातात तर या रकमेमध्ये वाढ होऊन ती अडीच लाखापर्यंत सुद्धा घरबांधणीसाठी आर्थिक मदत गेलेली आहे. Modi Goverment 10 Popular Scheme
आत्तापर्यंत या पीएम आवास योजना अंतर्गत संपूर्ण देशांमध्ये चार कोठून अधिक लोकांना याचा फायदा झालेला आहे किंवा त्यांनी हे धरे बांधलेले आहे. जर तुम्हालाही घर नसेल आणि तुमच्या आर्थिक उत्पन्न कमी असेल तर तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळतो त्यासाठी तुम्ही तुमच्या भागातील ग्रामपंचायत पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद यांच्याकडे प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज करू शकता अर्ज केल्यानंतर काही दिवसातच तुम्हाला या अनुदानाचा लाभ मिळेल.
मित्रांनो मोदी सरकारने जे भारतातील गरीब कुटुंब आहे जर काही कारणास्तव कुटुंबप्रमुखाचा मृत्यू झाला तर त्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी या हेतूने या प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेची सुरुवात करण्यात आली. ही योजना 436 रुपये एवढा वार्षिक प्रीमियम भरून तुम्ही वर्षाला दोन लाख रुपये पर्यंत आर्थिक जीवनविमा काढू शकता.
आता हे 436 रुपये कोठे भरणार तर तुमचे जे बँक खाते आहे किंवा तुमच्या भागातील ज्या बँकेमध्ये तुमचे खाते आहे त्या बँकेमध्ये जाऊन प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा फॉर्म भरून आणि वार्षिक 436 रुपये एवढे भरून हा विमा उतरू शकता. जर भविष्यामध्ये कुटुंबप्रमुखाचा काही कारणास्तव अपघात आला किंवा काही अडचणी उद्भवल्यास त्यावेळी या प्रधानमंत्री जीवन ज्योति योजनेचा फायदा त्या ठिकाणी तुम्हाला होतो आणि हे पैसे नक्कीच मिळतात यासाठी वयोमर्यादा सुद्धा ठरवलेली आहे कमीत कमी 18 वर्षे केलेले आणि जास्तीत जास्त 55 वर्ष.
केंद्र सरकारने केंद्रीय अर्थसंकल्प 201516 मध्ये जसे पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेची सुरुवात केली त्याच सोबत पंतप्रधान सुरक्षा विमा योजना किंवा प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना याची सुरुवात केली. या योजनेचा उद्देश असा आहे की तुम्ही फक्त वार्षिक बारा हजार रुपये भरून 2 लाख रुपयांचा अपघाती विमा याठिकाणी काढू शकता.
तुमचे वय जर 18 ते 70 च्या दरम्यान असेल तर तुम्ही सुद्धा या योजनेत सहभागी होऊ शकता. हा विमा कोठे काढणार, त्या ठिकाणी तुमची बँक खाते आहे त्या बँकेत जाऊन प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा फॉर्म भरायचा आहे त्यानंतर तत्काळच ही योजना तुमच्या बँकेमार्फत सुरू होईल. आणि ज्यावेळी तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे किंवा जे वारस असणार त्यांना हा लाभ घ्यायचा आहे तर त्यांनी त्याच बँकेत जाऊन प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा विमा विड्रॉल फॉर्म भरून मिळवायचा आहे.
आता यामध्ये बदल करण्यात आले एक जून 2022 पासून अति बारा रुपये रक्कम आहे ते वीस रुपये करण्यात आली आहे फक्त वीस रुपयांमध्ये तुम्ही दोन लाखा पर्यंत अपघाती विमा पॉलिसी काढू शकता.
भारतातील जे गरीब लोक आहेत त्यांना दवाखान्यांमध्ये व्यवस्थित इलाज मिळावा यासाठी ही योजना सुरू करण्यात आली तिचे नावे आयुष्मान भारत योजना. या आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत पाच लाख रुपये पर्यंत आरोग्य विमा काढू शकता. यासाठी फक्त आधार कार्ड आणि रेशन कार्ड पाहिजे. जर तुमच्याकडे आधार कार्ड रेशन कार्ड असेल तर तुम्ही आयुष्मान भारत योजनेसाठी पात्र आहात. तुमच्या आसपास जे कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट आहे त्यामध्ये जाऊन ही आयुष्मान भारत योजनेचे कार्ड काढू शकता त्याला दुसरे एक नावे आयुष्मान भारत गोल्ड कार्ड.
आयुष्मान भारत हेल्थ गोल्ड कार्ड मध्ये काय काय सुविधा भेटतात या संदर्भात माहिती पाहू, या कार्डमार्फत तुम्हाला पाच लाखापर्यंत आरोग्य विमा भेटतो म्हणजे तुम्ही पाच लाखापर्यंत तुम्ही जर काही आजारी असाल किंवा सर्जरी करायचे आहे किंवा कोणत्याही आजार असो तर ते तुम्ही मोफत मध्ये काढू शकता. यासाठी एक रुपये सुद्धा देण्याची गरज नाही. तसेच औषधाचा खर्च असणारे ते सर्व खर्च सुद्धा केंद्र सरकार घेत आहे. केंद्र सरकारने काही हॉस्पिटल जिल्ह्यामध्ये आयुष्मान भारत योजनेचे घोषित केलेले आहेत त्या घोषित केलेल्या हॉस्पिटलमध्ये जाऊन या योजनेचा लाभ घेऊ शकता. याची यादी तुम्हाला केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत या वेबसाईटवर पाहायला मिळेल.
तुम्ही जर भारतीय रहिवासी असाल तसेच असंघटित क्षेत्रांमध्ये तुम्ही काम करत असाल म्हणजे ज्यांचा पीएफ कट होत नाही त्या सर्वांना अटल पेन्शन योजनेचा लाभ मिळतो यासाठी एक अट आहे ते म्हणजे वयोमर्यादा ही 18 वर्षे ते 40 वर्षे दरम्यान पाहिजे म्हणजे 40 वर्षापर्यंत असाल तर तुम्ही ह्या अटल पेन्शन योजनेमध्ये नोंदणी करू शकता.
या योजनेचे लाभा असा आहे की ज्यावेळी तुमचे वय हे साठ वर्षे झाले त्याच्यानंतर तुम्हाला महिन्याला पाच हजार रुपयापर्यंत पेन्शन मिळण्यास सुरुवात होती. म्हणजे थोडी रक्कम भरून 60 वर्षानंतर एक चांगली पेन्शन तुम्ही मिळू शकता.
तुम्हाला जर या अटल पेन्शन योजनेमध्ये सहभागी व्हायचे असेल तर तुम्ही पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन हा फॉर्म भरून या योजनेची सुरुवात करू शकता.
मित्रांनो प्रधानमंत्री जनधन योजना ही खूप खास योजना म्हणते किंवा लोकप्रिय योजना म्हणता येईल कारण विदाऊट गॅरंटीसह तसेच खात्यावर एक रुपया न भरता हे खाते उघडू शकता. तसेच तुम्ही दहा हजार रुपये पर्यंत सुद्धा पैसे या मार्फत काढू शकता.
भारतातील जे दारिद्र्यरेषेखालील जे लोक आहेत किंवा ज्यांचे एक पण खातं कोणत्याही बँकेत नाही त्या लोकांसाठी ही खूप खास योजना मानता येईल. हे खाते खोलण्यासाठी बँकेला कोणतेही इतर चार्जेस द्यायची गरज नाही. या योजनेचे मुख्य उद्देश असा आहे की जे भारतातील गरीब लोक आहेत त्यांना बँकेची सलग्न करणे किंवा बँकिंग व्यवस्थेची जोडणे.
आता या प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत विविध सवलती नागरिकांना देण्यात येतआहे, पासबुक, चेक बुक , ओव्हर ड्राफ्ट सुविधा आणिअपघात विमा. अशा सुविधामुळे गरिबातील गरीब लोकांना बँकिंग व्यवस्थेची जोडता येते. त्यामुळे प्रधानमंत्री जनधन योजना ही एक लोकप्रिय योजना झाली असे या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल.
तरी या आहेत केंद्र सरकारचे दहा लोकप्रिय योजना या योजने संदर्भात तुमच्या काही प्रतिक्रिया आहेत ते नक्कीच सांगा.
नमस्कार, महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतेच वृद्ध कलाकारांना आर्थिक मदत देण्यासाठी ' कलाकार मानधन योजना '2025…
नमस्कार, आपण घरकुल योजने साठी फॉर्म भरतो आणि घरकुल योजनेचा फॉर्म मंजूर होतो, पण घर…
नमस्कार "पिंक ई-रिक्षा योजना" हि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले…
"ड" अक्षराने सुरू होणाऱ्या 100 गावांची नावे खालीलप्रमाणे: d varun gavachi naave ड वरून गावांची…
गाव नमुना 14 (Form 14) हा एक सरकारी दस्तऐवज आहे जो मुख्यत: महाराष्ट्र राज्यातील कृषी…
महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने कामगारांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवल्या जातात. कामगारांची नोंदणी, नूतनीकरण, आणि लाभ…
This website uses cookies.