अनेकांची इच्छा असते की स्वतःचा एक व्यवसाय असावा, त्या साठी महत्वाची म्हणजे भांडवलाची गरज असते म्हणजे पैशाची , अनेक जन बँकेकडून कर्ज घेतात आणि व्यवसाय सुरू करतात. पण बँकेचे व्यवसाय कर्ज असते ते खूप जास्त व्याजाचे असते.
पण हे कर्ज ज्यावेळी काढतो त्यावेळी अनेक कागदपत्रे पूर्तता तसेच काही तरी गहाण ठेवावे लागते तरच बँक आपल्याला कर्ज देते. पण केंद्र सरकारने ही अडचण लक्षात घेऊन एक नवीन योजना काढलेली आहे.तिचे नाव आहे ‘ प्रधानमंत्री मुद्रा योजना ‘ Mudra Loan Scheme marathi या मुद्रा योजनेत अर्ज करून तुम्ही व्यवसाय कर्ज घेऊ शकता. या व्यवसाय कर्जाचा उपयोग तुम्ही तुमचे व्यावसायिक स्वप्न पूर्ण करण्यासाठी करू शकता. या व्यवसायातून तुम्ही चांगले आर्थिक आधार कमवू शकता.
केंद्र शासना मार्फत सन 2015 मध्ये प्रधानमंत्री मुद्रा योजना कर्ज देण्यासाठी सुरू करण्यात आली. या योजने अंतर्गत केंद्र सरकार Mudra Loan Scheme marathi 3 प्रकारे किंवा 3 श्रेणीत कर्ज देते. 1. शिशु कर्ज 2. किशोर कर्ज आणि 3. तरुण कर्ज. या मुद्रा योजनेत 50,000 रुपया पासून ते 10 लाखा पर्यंत कर्ज देते. भारतातील कोणत्याही व्यक्तीला जर व्यवसाय सुरू करण्याचा असेल तर 50,000 रुपये पासून ते 10,00,000 रुपये पर्यंत कर्ज त्याला मिळते. यामध्ये तुम्ही छोटा व्यवसाय करू शकता तसेच मोठा व्यवसाय सुद्धा सुरू करू शकता. यामध्ये आतापर्यंत लाखो लोकांनी कर्ज घेऊन व्यवसाय सुरू केला आहे आणि त्यापासून मोठा व्यवसाय सुद्धा सुरू start up केला आहे. या प्रधान मंत्री मुद्रा योजना किंवा PMMY योजनेत कर्ज घेण्यासाठी काही कागदपत्रांची आवश्यकता असते. यामध्ये दुसरे कोणतेच आश्वासन देण्याची गरज नाही कारण हे कर्ज स्वतः सरकार देत आहे.
1. शिशु कर्ज – यामध्ये 50,000 रुपये एवढे कर्ज मिळते
2. किशोर कर्ज – यामध्ये 50,000 रुपये ते 5,00,000 रुपये कर्ज मिळते.
3. तरुण कर्ज – यामध्ये 5,00,000 रुपये ते 10,00,000 रुपये पर्यंत कर्ज मिळते.
प्रधान मंत्री मुद्रा योजना यामध्ये 50,000 रुपये ते 10,00,00 रुपये कर्ज मिळते तर यासाठी परत फेड काळावधी सुद्धा आहे. तुम्हाला हे कर्ज 3 वर्ष ते 5 वर्ष कालावधी म्हणजे ( 36 महिने ते 60 महिने एवढा कालावधी लागतो.)
कर्ज घेण्यासाठी वय हे 24 ते 70 वर्ष पाहिजे किंवा या वया मधील कोणताही व्यक्ती मग तो पुरुष असो किंवा स्त्री कोणालाही कर्ज मिळु शकते किंवा कर्ज घेण्यासाठी पात्र आहे.
आधार कार्ड
पासपोर्ट ( असेल तर )
पॅन कार्ड
उद्यम आधार
मतदार ओळख पत्र किंवा इलेक्शन कार्ड
केवायसी प्रमाण पत्र इतर सर्व महत्वाची कागदपत्रे या ठिकाणी लागणार आहे.
https://www.mudra.org.in/
अर्ज डाउनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा
नमस्कार, महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतेच वृद्ध कलाकारांना आर्थिक मदत देण्यासाठी ' कलाकार मानधन योजना '2025…
नमस्कार, आपण घरकुल योजने साठी फॉर्म भरतो आणि घरकुल योजनेचा फॉर्म मंजूर होतो, पण घर…
नमस्कार "पिंक ई-रिक्षा योजना" हि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले…
"ड" अक्षराने सुरू होणाऱ्या 100 गावांची नावे खालीलप्रमाणे: d varun gavachi naave ड वरून गावांची…
गाव नमुना 14 (Form 14) हा एक सरकारी दस्तऐवज आहे जो मुख्यत: महाराष्ट्र राज्यातील कृषी…
महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने कामगारांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवल्या जातात. कामगारांची नोंदणी, नूतनीकरण, आणि लाभ…
This website uses cookies.