Blog

महिलांसाठी सरकारची पिंक ई-रिक्षा योजना काय आहे ? या योजनेसाठी अर्ज आणि अनुदान तसेच अर्ज कसा करायचा ते पहा ? Pink E-Rickshaw Scheme

नमस्कार “पिंक ई-रिक्षा योजना” हि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. Pink E-Rickshaw Scheme या योजनेमुळे महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध होऊन त्यांचे सामाजिक व आर्थिक पुनर्वसन शक्य होणार आहे.


योजनेचा उद्देश

  • महिलांचे सक्षमीकरण (Empowerment) करणे
  • सुरक्षित प्रवासाची हमी करणे
  • महिलांच्या रोजगाराच्या संधी वाढवणे तसेच
  • महिलांना स्वावलंबी बनवणे हे आहे.

योजनेचा विस्तार

हि “पिंक ई-रिक्षा योजना” अहिल्यानगर सह इतर १० जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहे. या योजनेच्या माध्यमातून महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहून समाजात एक आदर्श निर्माण करू शकणार आहे.

रिक्षा चालवणे : स्वयंरोजगाराचा मार्ग

महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रेरित करण्यासाठी ई-रिक्षा हा उत्तम पर्याय ठरतो. या योजनेच्या माध्यमातून महिलांना बँकेच्या साहाय्याने सहज आर्थिक मदत केली जाते.


अनुदान आणि कर्जाचे स्वरूप Pink E-Rickshaw Scheme

घटकतपशील
अनुदानरिक्षाच्या किंमतीवर २०% अनुदान
कर्ज रक्कम७०% बँक कर्ज
महिला योगदान१०% स्वतःचा वाटा
कर्ज परतफेड कालावधी५ वर्षे (६० महिने)
प्रशिक्षण व विमा५ वर्षांसाठी विमा, परवाना व बॅच

योजनेचे फायदे

  1. रोजगाराची संधी : या योजनेतून महिलांना उपजीविकेचा साधन उपलब्ध होते.Pink E-Rickshaw Scheme.
  2. आर्थिक सक्षमीकरण : महिलांना स्वावलंबी बनवणे हे आहे.
  3. सुरक्षित प्रवास : महिलांसाठी सुरक्षित प्रवासाची हमी या योजनेतून मिळते.
  4. दैनंदिन गरजांची पूर्तता : इतरांवर अवलंबून राहण्याची गरज नाहीशी होईल.
  5. सामाजिक प्रगती : महिलांना समाजात मानाचे स्थान मिळेल या योजनेतून मिळेल.

पिंक ई-रिक्षा योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये

योजनेचे नावमहाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजना
1.सुरूमहाराष्ट्र राज्य सरकार
2.लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील महिला
3.वय 18 ते 40 वर्ष

आवश्यक कागदपत्रे

1.आधार कार्ड:जी महिला अर्ज करणार आहे त्या महिलेकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.

2. पासपोर्ट फोटो: त्या महिलेकडे पासपोर्ट फोटो 2 आवश्यक आहे.

3. शैक्षणिक कागदपत्रे: अर्जदार महिलेकडे शैक्षणिक कागद पत्रे आवश्यक पाहिजे

4.मोबाईल नंबर: त्या महिलेकडे एक मोबाईल क्रमांक पाहिजे.


Pink E-Rickshaw Scheme

पात्रता व अटी

i.पात्रता

  • अर्जदार महिला हि महाराष्ट्राची मूळ रहिवासी असावी.
  • तसेच या महिलेचे वय २१ ते ४० वर्षे दरम्यान असावे.
  • आणि अर्जदार महिला कर्जबाजारी नसावी.

ii.अटी Pink E-Rickshaw Scheme

  • योजनेचा लाभ फक्त एकदाच घेता येईल.
  • तसेच अन्य ई-रिक्षा योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  • कर्जाची परतफेड महिलेची जबाबदारी असेल.

संपर्क व अधिक माहिती

महिला आर्थिक विकास महामंडळ, नालेगाव, अहिल्यानगर यांच्याशी संपर्क साधा.

प्रश्न आणि उत्तरे (FAQs)

प्रश्नउत्तर
१. पिंक ई-रिक्षा योजना कोणासाठी आहे?ही योजना महाराष्ट्रातील महिलांसाठी आहे.
२. योजनेसाठी वयोमर्यादा किती आहे?वय २१ ते ४० वर्षे.
३. शासन किती अनुदान देते?शासन २०% अनुदान देते.
४. कर्ज परतफेड कालावधी किती आहे?कर्ज ५ वर्षांत फेडावे लागते.
५. विमा आणि परवाना मिळतो का?होय, ५ वर्षांसाठी विमा आणि परवाना दिला जातो.
६. या योजनेत किती आर्थिक सहभाग आवश्यक आहे?महिला लाभार्थींना १०% वाटा भरावा लागतो.
७. कोणत्या जिल्ह्यांत योजना राबविली जाते?अहिल्यानगर व अन्य १० जिल्ह्यांत.
८. रिक्षाच्या किंमतीत काय समाविष्ट आहे?GST, नोंदणी व रोड टॅक्सचा समावेश आहे.
९. कर्ज कोणत्या बँकांमधून मिळते?राष्ट्रीयीकृत, सहकारी आणि खासगी बँकांमधून कर्ज उपलब्ध होते.
१०. योजना लागू करण्याचा मुख्य उद्देश काय आहे?महिलांना स्वावलंबी व आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे.

पिंक ई-रिक्षा” हि योजना महिलांसाठी स्वाभिमानाने जीवन जगण्याचा मार्ग प्रशस्त करते. तसेच ही योजना महिलांच्या सुरक्षिततेसोबतच स्वावलंबनासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

Aapla Baliraja

Recent Posts

Kalakar Mandhan Yojana 2025 :कलाकारांसाठी खुशखबर ! सरकार देणार दरमहा ₹3150 मदत – लगेच अर्ज करा!

नमस्कार, महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतेच वृद्ध कलाकारांना आर्थिक मदत देण्यासाठी ' कलाकार मानधन योजना '2025…

17 hours ago

जमीन नसलेल्या बेघरांना घरकुलाचा लाभ सर्वात आधी मिळणार शासन निर्देश Jamin Nasalelyana Gharkul Yojana Maharashtra

नमस्कार, आपण घरकुल योजने साठी फॉर्म भरतो आणि घरकुल योजनेचा फॉर्म मंजूर होतो, पण घर…

4 days ago

ड वरून गावांची नावे पहा ?

"ड" अक्षराने सुरू होणाऱ्या 100 गावांची नावे खालीलप्रमाणे: d varun gavachi naave ड वरून गावांची…

4 weeks ago

गाव नमुना 14 म्हणजे काय ? gav namuna 14 online

गाव नमुना 14 (Form 14) हा एक सरकारी दस्तऐवज आहे जो मुख्यत: महाराष्ट्र राज्यातील कृषी…

4 weeks ago

बांधकाम कामगार नोंदणी साठी तालुका सुविधा केंद्र bandhkam Kamgar Taluka Suvidha Kendra

महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने कामगारांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवल्या जातात. कामगारांची नोंदणी, नूतनीकरण, आणि लाभ…

1 month ago

PM Asha Yojana 2025: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! या योजनेतून मिळणार जबरदस्त आर्थिक फायदा! “

नमस्कार, केंद्र सरकारने शेतकऱ्यांना चांगला भाव देण्यासाठी तसेच ग्राहकांसाठी जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीतील चढउतार नियंत्रित करण्यासाठी…

1 month ago

This website uses cookies.