Pm Kisan Yojana : पी एम किसान सन्मान निधी योजनेचे 2000 रुपये जर बँकेत आले नसतील तर मोबाईल मधून या गोष्टी चेक करा
Pm Kisan Yojana : पी एम किसान सन्मान निधी योजनेचे 2000 रुपये जर बँकेत आले नसतील तर मोबाईल मधून एवढे काम करा लगेच बँक खात्यावर पैसे येतील
Pm Kisan Yojana Today News
पी एम किसान सम्मान निधी योजनेचे पैसे आले नसतील तर खालील गोष्टी चेक करा
( P M kisaan yojana – Beneficiary Status मध्ये) link
पहिले म्हणजे या मध्ये आधार डेमोग्राफी ( Pm kisan Sanmman Nidhi Biometric Ekyc ) इथे yes आहे की नाही चेक करा नसेल तर सुरुवातीला ती kyc करून घ्या. – आधार डेमोग्राफी चेक केल्यानंतर पात्रता आहे की नाही yes आहे की नाही चेक करा ( Kyc – yes ) ही केवायसी गाव पातळीवर ग्रामसेवक किंवा तलाठी यांनी केलेली आहे ( 10 % व्हिलेज केवायसी मध्ये ) यामध्ये तुमची केवायसी फेल झाली आहे जसे की ( 7/12, 8अ आणि हयातीत आहे की नाही यासंदर्भात ) या संदर्भात तुम्हाला पुन्हा पी एम किसान योजनेचा चा फॉर्म भरावा लागेल यामध्ये ग्रामसेवक किंवा तलाठी यांच्याकडून तपासून सही शिक्केसह तालुका पातळीवर किंवा जिल्हा पी एम किसान कक्ष यांच्याकडे जमा करावा लागेल.
यानंतर तुम्हाला Payment Mode चेक करावा लागेल यामध्ये adhar असेल तर काही प्रॉब्लेम नाही पण जर या ठिकाणी account दिसत असेल तर समजा की तुमची बँक आधार कार्ड ला लिंक नाही. ( adhar Bank seeding ) सिडिंग करण्यासाठी सरकारने नवीन परिपत्रक काढले होते की तुम्ही पोस्टामध्ये नवीन खाते उघडा यामध्ये आधार seeding करायला सांगा, यामुळे पुढील पी एम किसान चा येणारा हप्ता पोस्टामध्ये येईल.
– त्यानंतर महत्वाचे म्हणजे Land seeding , जर या ठिकाणी No असेल तर समजा की तुमची तलाठी यांच्याकडे येणारी केवायसी फेल झाली आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या गावातील तलाठी याना भेटावे लागेल. ते या संदर्भात तुमची केवायसी करून देतील.
या सर्व स्थिती मध्ये बँक केवायसी आणि land seeding केवायसी मोठ्या प्रमाणावर आहे. वरील सर्व yes असणे आवश्यक आहे, जर नसेल तर वरील प्रमाणे सर्व गोष्टी करा तुमचे अडकलेले पैसे तुमच्या बँक खात्यावर लगेच मिळून जातील.