महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसरे पारितोषिक, सुधीर मुनगंटीवार यांनी केले अभिनंदन | Maharashtra Chitrarath 2023 |

 महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसरे पारितोषिक,  सुधीर मुनगंटीवार यांनी केले अभिनंदन Maharashtra Chitrarath 2023 

Table of Contents

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now



मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
Telegram Group Join Now

 



    प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्लीतील कर्तव्यपथ वर झालेल्या पथ संचलनात ‘ महाराष्ट्राने साडे तीन शक्ती पीठे आणि नारी शक्ती ‘ या नवीन संकल्पनेवर आधारित नवीन चित्ररथ यावर्षी ( 2023 प्रजासत्ताक दिना निमित्त ) सहभागी झाला होता. काल म्हणजे 30 जानेवारी 2023 रोजी संरक्षण मंत्रालयाच्या वतीने महाराष्ट्राच्या या ‘( साडे तीन पीठे व नारीशक्ती ) चित्ररथा ला सर्वोत्तम चित्ररथामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक जाहीर केले आहे. ( News Link )  या चित्र रथ महाराष्ट्रातील समस्थ महिला शक्तीला समर्पित होता. आता दुसऱ्या क्रमांकाचे पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे महाराष्ट्रातील सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अभिनंदन केले आहे.

 

                       यावर्षी सहभागी झालेल्या चित्ररथामध्ये उत्तराखंड च्या चित्र रथाला पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक, तर दुसरे महाराष्ट्राचे आणि तिसरे उत्तर प्रदेश च्या चित्ररथाला पारितोषिक मिळाले. आज या ( 31 जानेवारी 2023 ) रोजी नवी दिल्ली येथे भारताचे संरक्षक राज्यमंत्री अजय भट्ट यांच्या हस्ते या परितोषिकांचे वितरण होणार आहे. महाराष्ट्रातील सांस्कृतिक संचालक हे आज पारितोषिक स्वीकारतील.

Maharashtra Chitrarath  2023 News 

 

 महाराष्ट्रातील 2023 चित्ररथ वैशिष्टये :

 दरवर्षी दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिना निमित्त पथ संचलनात विविध राज्याच्या संस्कृतीचे प्रदर्शन करणारे चित्ररथ या पथ संचलनात संचलित ( प्रदर्शित ) होत असतात. यावर्षी महाराष्ट्राने नारीशक्ती या अशयाखाली “महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठे व नारीशक्ती ” हा विषय निवडून यामध्ये लोककला आणि मंदिर शैलीचा वारसा दाखविण्याचाही या संकल्पनेतून प्रयत्न करण्यात आला होता. अतिशय दिमाखदार व आकर्षक पद्धतीने हा चित्ररथ पुन्हा यावर्षी सुद्धा प्रदर्शित करण्यात आला. 



या साडे तीन शक्तिपीठे व नारीशक्ती संकल्पनेत ‘तुळजापूरची आईभवानी, कोल्हापूरची लक्ष्मीमाता, माहूरची रेणुका माता आणि वणीची शप्तशृंगी माता यांच्या विलोभनीय प्रतिकृती यावर्षी चित्ररथावर सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. संबळ वाजवणारा गोंधळी हा देवीशी निगडित असल्याने हा लोककलाकार भव्य स्वरूपात दर्शविण्यात आला होता. या चित्ररथासाठी प्रसिद्ध कवयित्री, लेखिका व निवेदिका प्राची गडकरी यांनी चार कडव्यांचे गीत लिहिलेले आहे आणि कौशल्य इनामदार यांनी यापैकी तीन कडवी घेऊन सुंदर गीत तयार केले होते.



 

                          यावर्षी ( 2023) या चिरारथाचे शुभ आर्ट या नागपूर येथील संस्थेने चित्ररथाचे शिल्पाचे काम साकार केले होते. महाराष्ट्राला आतापर्यंत 1971 ( पासून सुरुवात झाली तेव्हापासून ) पासून 2023 पर्यंत 14 वेला उत्कृष्ट चित्ररथ, 7 वेळा पाहिले पारितोषिक, 4 वेळा दुसरे पारितोषिक आणि 2 वेळेस तिसरे पसरितोषिक मिळाले आहे. एक महत्वाचे सलग तिन वर्षी ( हॅटट्रिक ) महाराष्ट्र राज्याच्या नावावर जमा आहे.

 

                                        

पाहिले पारितोषिक –  महाराष्ट्र चित्ररथ

म पारितोषिक मिळाले. 

– सन 1983 मध्ये बैलपोळा या चित्ररथास प्रथम पारितोषिक मिळाले. 

– 1988 मध्ये लोकमान्य टिळकांच्या ऐतिहासिक खटला, 

– 1993 मध्ये टिळकांच्या शताब्दी वर्ष ( सार्वजनिक गणेश उत्सव ) यास प्रथम पारितोषिक मिळाले, 

– 1994 हापूस आंबा यास ससंकल्पनेला प्रथम पारितोषिक, 

– 1995 मध्ये बापू स्मृती या चित्ररथास प्रथम पारितोषिक मिळाले,

– 2018 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा यास प्रथम

Apla Baliraja

            

  • दुसरे पारितोषिक महाराष्ट्राच्या चित्ररथास !

2007 – जेजुरीच्या खंडेराया,

2009- धनगर चित्ररथास 

2023 – महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठे आणि नारीशक्ती या चित्ररथा ला दुसरे पारितोषिक मिळाले.

 

 

 

 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Sonu Nigam breaks down in tears after performing at the Ayodhya Ram Mandir! “I have nothing more to say; my tears will speak for me.” Jaggery Tea Benefits: ग्रीन टीपेक्षाही फायदेशीर आहे गुळाचा चहा; हिवाळ्यात नक्की सेवन करा Tulsi Vivah 2023 : का करतात तुळशी विवाह यावर्षी कोणत्या तारखेला आहे पहा ?