आपले सरकार सेवा केंद्र घेण्यासाठी अर्ज सुरू | 176 जागांसाठी या जिल्ह्यात अर्ज सुरू | 2023 New Aaple Sarkar Seva Kendra | Apply Here

 आपले सरकार सेवा केंद्र घेण्यासाठी अर्ज सुरू | 176 जागांसाठी या जिल्ह्यात अर्ज सुरू | 2023 New Aaple Sarkar Seva Kendra | Apply Here

Table of Contents

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now




Aaple Sarkar Seva kendra 2023 advertisement
मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
Telegram Group Join Now

 

 



नमस्कार मंडळी 2023 मध्ये या  जिल्ह्यात एकूण 176 जागांसाठी ‘आपले सरकार सेवा केंद्र ‘ ( महाऑनलाईन ) घेण्यासाठी अर्ज सुरू झाले आहे. यामध्ये महानगरपालिका क्षेत्र तसेच नगरपरिषद , नगर पंचायत आणि ग्रामपंचायती क्षेत्र हद्दीत मध्ये नवीन केंद्र घेण्यासाठी या जिल्ह्यात अर्ज मागितले आहेत. हे अर्ज तुम्ही 08 फेब्रुवारी 2023 ते 20 फेब्रुवारी 2023 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज डॉउनलोड करून ते भरून सोबत महत्त्वाचे कागतपत्रे attach करून 20 फेब्रुवारी 2023 सायंकाळी 05 वाजे पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय आवक – जावक विभागात जमा करावे असे निर्देशित केले आहे.







तर तो जिल्हा आहे अकोला जिल्हा, अकोला जिल्ह्यात आपले सरकार सेवा केंद्र घेण्यासाठी अर्ज सुरू झाले आहेत. जे हे केंद्र घेण्यासाठी इच्छुक असतील त्यांनी तो अर्ज व्यवस्थित पूर्ण कागतपत्रासह जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी जमा करावा.


 

 



2023 New Aaple Sarkar Seva Kendra 



महत्वाचे :

– अर्ज जमा करणे :- 08 फेब्रुवारी 2023 ते 20 फेब्रुवारी 2023 सायंकाळी 05 वाजेपर्यंत 

– प्राप्त अर्जाची माहिती वेबसाईट वर प्रसिद्ध करणे :- 27 फेब्रुवारी 2023 

– प्राप्त अर्जाची छाननी करणे :- 6 मार्च 2023 

– निकाल जाहीर करणे :- 13 मार्च 2023 ला



तर अर्ज केल्यापासून एक महिन्याच्या आत निकाल लागणार आहे.





अर्जाची लिंक येथे क्लिक करा 

 



Website – link येथे google Form दिला आहे ( दिनांक – 07/02/2023 या तारखेला Archieve मध्ये जाऊन पाहावा )



2023 New Aaple Sarkar Seva Kendra 





अर्जासोबत सादर करायचे Document ( कागदपत्रे ) :-

– नमुना अर्ज ( ऑनलाईन चा )

– आधार कार्ड

– पॅन कार्ड

– जन्म नोंदणी दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला

– शैक्षणिक गुणवत्ता प्रमाणपत्र ( किमान 10 वी SSC )

– CSC केंद्र चालक असल्यास CSC प्रमाणपत्र

– MSCIT किंवा संगणक प्रमाणपत्र

एवढे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.



2023 New Aaple Sarkar Seva Kendra – Akola District





अटी व शर्ती : आपले सरकार सेवा केंद्र घेण्यासाठी :- 

1. ज्या ठिकाणी जागा निघाली आहे त्याच ठिकाणी अर्ज करणे आवश्यक तसेच तेथिलच CSC केंद्र चालक व स्थानिक नागरिक हेच अर्ज करण्यास पात्र असतील.

2. अर्जदार किमान दहावी पास आवश्यक

3. महाराष्ट्र शासनाचा शासन निर्णय क्र. मातंस -1716/ प्र. क्र. 557/ 39 दि. 19 जानेवारी 2018 मधील नमूद निर्देशानुसार प्राप्त अर्जधारकांची ज्या CSC अर्जधारकांचे माघील सहा महिन्यात ( 1 ऑगस्ट 2022 ते 31 जानेवारी 2023 पर्यंत ) केंद्रावरील व्यवहार अधिकतम असतील अश्या अर्जदारास प्राधान्य देण्यात येऊन आपले सरकार सेवा केंद्राची नियुक्ती व कार्यन्तवीत केले जाईल



4. समान CSC व्यवहार असल्यास अथवा एकही अर्जदार CSC केंद्र धारक नसल्यास वय जष्ठेते नुसार प्राधान्य देण्यात येईल.

5. अर्जदार फक्त एकच आपले सरकार सेवा केंद्रा साठी साठी अर्ज करू शकतात.



6.कुटुंबातून एकाला अर्ज करता येईल, किंवा यादी आपले सरकार सेवा केंद्र आहे किंवा जिल्हा परिषदेचे संग्राम केंद्र आहे, त्यांना या ठिकाणी अर्ज करता येणार नाही.

7.आपले सरकार सेवा केंद्र साठी अर्जदारकडून कोणतेही शुल्क घेतले जात नाही.

8.आपले सरकार सेवा केंद्र ज्या ठिकाणी देण्यात येईल त्याच ठिकाणी ते कार्यरत असणे आवश्यक राहील.केंद्राची जागा बदल्यास त्याचे आपले सरकार सेवा केंद्र तत्काळ बंद करण्यात येईल.





9. नागरिकांची तक्रार आल्यास आपले सरकार सेवा केंद्राची चौकशी करून त्यावर कार्यवाही करण्यात येईल.



10.आपले सरकार सेवा केंद्र कोणत्याही परिस्थतीमध्ये हस्तांतर केले जाणार नाही, शासनाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार केंद्र चालू ठेवणे, शासनाने ठरवून दिलेले दर पत्रक केंद्रावर प्रसिद्ध करणे, शासकीय दरापेक्षा जास्त शुल्क आकारणी करू नये, तसे केल्यास केंद्र चालकांवर कार्यवाही करून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल.





11.आपले सरकार सेवा केंद्र निवड प्रक्रिये दरम्यान जागा कमी व अधिक करण्याचे सर्व अधिकार मा. जिल्हाधिकारी अकोला यांच्याकडे राखीव राहील.



 





2023 New Aaple Sarkar Seva Kendra – Akola District

अर्ज नमुना 







मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Sonu Nigam breaks down in tears after performing at the Ayodhya Ram Mandir! “I have nothing more to say; my tears will speak for me.” Jaggery Tea Benefits: ग्रीन टीपेक्षाही फायदेशीर आहे गुळाचा चहा; हिवाळ्यात नक्की सेवन करा Tulsi Vivah 2023 : का करतात तुळशी विवाह यावर्षी कोणत्या तारखेला आहे पहा ?