महाज्योती मार्फत मोफत टॅबलेट वाटप | अर्ज संदर्भात सविस्तर माहिती | Mahajyoti Tablet new Scheme |
|
Mahajyoti Free Tablet Scheme Maharashtra
|
Free Tablet Scheme Mahajyoti Application :
महाराष्ट्र राज्यामध्ये महाज्योती ( Mahajyoti ) महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था – नागपूर मार्फत विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण, टॅबलेट, इंटरनेट आधी सुविधा दिल्या जातात.
यावर्षी 2023 मध्ये महाज्योती मार्फत ( महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास व बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था ) – यामार्फत MHT-CET/NEET -2025 पूर्व प्रशिक्षणा करिता नोंदणी अर्ज साठी इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.
अर्ज करण्यासाठी सुरुवातीला महाज्योती च्या मुख्य वेबसाईटवर या www.mahajyoti.org.in या संकेत स्थळावर आल्यानंतर सूचना फलक ( मराठीत ) किंवा Notice board इंग्रजीत असे समोर दिसेल त्याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला समोर ‘Application for ‘ MHT-CET/NEET -2025’ Training ‘ यावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज करण्यासाठी ही लिंक – 31/03/2023 पर्यंत चालू राहणार आहे. अर्ज फक्त ऑनलाईन च करायचा आहे जर अर्ज तुमचा महाज्योती च्या पत्त्यावर टपालद्वारे किंवा प्रत्यक्ष किंवा मेल द्वारे अर्ज आला तर तो विचारात घेतला जाणार नाही असे सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय तसेच भटक्या जाती- विमुक्त जमाती यासाठी महाज्योती काम करते यावेळी MHTCET /JEE/NEET- 2025 अर्ज मागविण्यात आले आहे. वर्ष भरात Mpsc Rajayseva तसेच Combine B and C साठी सुद्धा अर्ज मागविण्यात येतात. यावेळी MHTCET /JEE/NEET- 2025 पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने दिले जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक निवडलेल्या उमेदवाराला महाज्योती मार्फत टॅबलेट तसेच 6 GB/Day इंटरनेट डाटा पुरवले जाणार आहे
या योजनेचे काही अटी व शर्ती आहेत ते खालील प्रमाणे :
– महाराष्ट्राचा रहिवासी असावा
– हा उमेदवार इतर मागासवर्गीय तसेच विमुक्त भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा
– उमेदवार हा नॉन क्रिमी लेअर गटामध्ये मोडत असणारा असावा.
– जे विद्यार्थी यावर्षी १० वी ला ( 2023) मध्ये परीक्षा देत आहेत ते सुद्धा पात्र असतील त्यांनी अर्ज करते वेळी 10 वी चे प्रवेश पत्र तसेच 9 वी निकाल या ठिकाणी जोडावा. महत्वाचे तो उमेदवार विज्ञान शाखेत प्रवेश घेणारा असावा
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागतपत्रे खालीलप्रमाणे पाहिजे :
1. आधार कार्ड
2. रहिवासी दाखला
3. जातीचा दाखला
4. वैध नॉन क्रिमिलयेर
5. 9 वी चे गुणपत्रक
6. 10 वी चे परीक्षेचे ओळखपत्र