महाराष्ट्र शासना मार्फत 28 जुलै 2023 महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधान मंत्री जन आरोग्य योजना नवीन जीआर काढला गेला. यामध्ये या दोन्ही योजनांच्या विस्तारीकरण संदर्भात माहिती दिली आहे.
महाराष्ट्रात 2 जुलै 2012 पासून राज्यात महात्मा फुले जन आरोग्य योजना राबविण्यात येत आहे याची खरी सुरुवात 21 नोव्हेंबर 2013 ला झाली , प्रधान मंत्री जन आरोग्य योजना ही महाराष्ट्रात 23 सप्टेंबर 2018 रोजी लागू झाली. या दोन्ही योजना वेगवेगळ्या होत्या. महात्मा फुले योजना यामध्ये याची मर्यादा दीड लाख रुपये ( प्रती कुटूंब ) असे होते आणि आयुष्यमान / प्रधान मंत्री जन आरोग्य योजना मध्ये 5 लाख रुपये आहे. ह्या दोन्ही योजना राबविताना अडचणी येत होत्या. आयुष्यामन मध्ये ही संख्या खूप होती. मर्यादा 5 लाख रुपये प्रति कुटूंब वार्षिक असे आहे. सरकार ने या दोन्ही योजनाची सांगड घालत या दोन्ही योजना एकत्रित राबविण्याचा विचार करत 28 जुलै 2023 पासून याला मान्यता दिली आहे. आता यामध्ये सर्व महाराष्ट्रातील गरीब लोक याचा फायदा घेऊ शकणार आहे.
शासन निर्णय :
1. दोन्ही योजना एकत्रित केल्यानंतर आता उपचार एकत्रित होणार आहे आणि याची मर्यादा ही 5 लाख रुपये वार्षिक प्रति कुटूंब अशी केली गेली आहे.
2.मूत्र पिंड शस्र क्रिये साठी महात्मा फुले जन आरोग्य योजनामध्ये याची मर्यादा 2.5 लाख एवढी होती. आत त्याची मर्यादा वाढवून 4.50 लाख रुपये एवढी केली गेली आहे.
3. उपचारा ( प्रकार ) ची संख्या ही महात्मा फुले जन आरोग्य योजने मध्ये ही 996 आहे आणि प्रधान मंत्री जन आरोग्य मध्ये हीच संख्या 1209 आहे. आता या संख्येत वाढ करून म्हणजे 147 ने वाढवून ती ऐकून 1356 वर केली आहे ( एकत्रित मध्ये ). आणखी 328 मागणी असलेल्या उपचारा चा समावेश यामध्ये केला गेला. महत्वाचे सर्व फायदा किंवा उपचार मोफत असणार आहे.
4. महात्मा फुले जन आरोग्य योजना तसेच आयुष्यमान जन आरोग्य योजना एकत्रित रुग्णालयाची संख्या 1000 एवढी आहे. 140 कर्नाटक राज्यातील सीमा लगत भागातील 4 जिल्ह्याच्या लोकांसाठी, आता सरकारने यामध्ये आणखी 200 रुग्णालय यासाठी मान्यता दिली असून आता ती संख्या 1350 होईल असे या मध्ये सांगितले आहे.
5. आता यापुढे महाराष्ट्रातील सर्व रेशन कार्ड धारक आणि अधिवास प्रमाण पत्र धारक याना ती लागू होईल असे सांगण्यात आले आहे.
लाभार्थी घटक :
1. महाराष्ट्रातील सर्व पिवळी रेशन कार्ड धारक, अन्नपूर्ण योजनेतील , आणि केशरी रेशन कार्ड सर्वच लाभार्थी राहतील.
2. शुभ्र रेशन कार्ड धारक किंवा महाराष्ट्रातील रहिवासी असलेले पण रेशन कार्ड नाही ते सुद्धा यासाठी पात्र राहील असे सांगण्यात आले आहे.
लाभार्थी ओळख कसे करणार
1. रेशन कार्ड व फोटो ओळख पत्र ( identity card )
2. जर कोणतेच रेशन कार्ड नसेल ( पिवळे, केशरी, शुभ्र किंवा पांढरे ) तर अधिवास दाखला / तहसिलदार याचा दाखला ( महात्मा फुले जन आरोग्य चा )/ फोटो ओळख पत्र .
3. अपघात ग्रस्त व्यक्तीचा रुग्णालयातील जिओ टॅगिंग फोटो.
4 . रुग्णालयाना पोलिसांनी कळवलेला फोटो,
5. आधार कार्ड, मतदान कार्ड व पॅन कार्ड यापैकी एक फोटो ओळख पत्र
आरोग्य मित्र व इतर मनुष्य बळ
या दोन्ही योजनांचे महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधान मंत्री जन आरोग्य योजना किंवा आयुष्यमान भारत योजना यासाठी जिल्हा स्तरावर तसेच राज्य स्तरावर अंमलबजावणी साठी आवश्यक मनुष्य बळाची नियुक्ती केली जाईल.
अंगीकृत प्रत्येक रुग्णालयात किमान ( कमीत कमी ) एक आरोग्य मित्राची नियुक्ती करण्यात येईल. याची अंमलबजावणी ही राज्य आरोग्य हमी सोसायटी कडून करण्यात येईल