जमीन नसलेल्या बेघरांना घरकुलाचा लाभ सर्वात आधी मिळणार शासन निर्देश Jamin Nasalelyana Gharkul Yojana Maharashtra

नमस्कार, आपण घरकुल योजने साठी फॉर्म भरतो आणि घरकुल योजनेचा फॉर्म मंजूर होतो, पण घर बांधण्यासाठी जागा उपलब्ध नसते. त्यामुळे अनेक लाभार्थी या योजनेपासून वंचित राहतात. Jamin Nasalelyana Gharkul Yojana

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मात्र आता काळजी करण्याचे कारण नाही. शासनाने घरकुल लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

पात्र अर्जदारांना मिळणार जागा आणि प्राधान्य

ज्या पात्र अर्जदारांकडे घरकुल बांधण्यासाठी जागा नाही किवा ज्याचे घरकुल अर्ज मंजूर झाले आहेत पण त्यांच्याकडे जागा नाही , अशा लाभार्थ्यांना सरकारकडून जागा मिळणार आहे. तसेच अशा लाभार्थ्यांना घरकुल देताना प्राधान्य दिले जाणार आहे.

हेही वाचा :  क्यूआर ( QR code Scan a ) कोड ने करताय स्कॅन, तुमचा स्मार्ट फोन होऊ शकतो हॅ -क ? बातमी पहा - QR code Scan News | Safe method

मंत्री जयकुमार गोरे यांचा महत्त्वाचा निर्णय

महाराष्ट्र राज्य ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी २९ जानेवारी रोजी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत हे निर्देश दिले आहे

कि ज्याचे घरकुल योजनेचे अर्ज मंजूर आहेत किवा फॉर्म भरणार आहे पण त्यांच्याकडे जागा नाही , तर त्यांना सरकार कडून जागा उपलब्ध करून दिले जाणार आहे आणि घरकुल बांधण्यास सांगणार आहे. या निर्णयामुळे हजारो बेघर लाभार्थ्यांना मोठा दिलासा यातून मिळेल.

👇👇👇👇

हेही वाचा :  दिव्यांगांसाठी ई रिक्षा किंवा ई वाहने योजना अर्ज सुरू Divyang Apang Mofat Riksha Vatap Yojana 2023-24

घरकुल बांधकामासाठी किती जागा मिळेल आणि अनुदान किती?

सरकार घरकुल बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून देणार असून लाभार्थ्यांना योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य देखील दिले जाईल. या साठी खालील तक्त्यात सविस्तर माहिती दिली आहे:

घटकमाहिती
घरकुल बांधण्यासाठी मिळणारी जागाशासन निश्चीत केलेली जागा
अनुदानाची रक्कमठराविक निकषांनुसार
प्राथमिकता कोणाला?ज्यांच्याकडे जागा नाही त्या लाभार्थ्यांना
घरकुल मंजुरी प्रक्रियासंबंधित ग्रामपंचायत आणि जिल्हा कार्यालयाच्या माध्यमातून
मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मंजूर घरकुलांची यादी ग्रामपंचायतीत लागणार Jamin Nasalelyana Gharkul Yojana Maharashtra

बऱ्याच वेळा लाभार्थ्यांना आपले नाव घरकुल योजनेच्या यादीत आहे की नाही, याचा संभ्रम असतो किवा त्यांना माहिती दिली जात नाही

तर आता हि माहिती ग्रामपंचायतीच्या दर्शनी भागात घरकुल मंजूर लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

हेही वाचा :  शेतकऱ्यांच्या नावाखाली पीकविमा मधून होतेय लूट, मूळ शेतकरी अंधारातच ! Pik Vima Mafia found in Crop Insurance Maharashtra

घरकुल बांधकामाचे उद्दिष्ट – २० लाख नवीन घरे

राज्यात २० लाख नवीन घरकुलांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ही घरे लवकर मंजूर करून लाभार्थ्यांना तत्काळ हक्काचे घर मिळवून देण्याचा शासनाचा मानस आणि ध्येय आहे.

निकृष्ट दर्जाचे घरकुल होणार नाही

गेल्या काही वर्षांत काही ठिकाणी घरकुलांचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले होते. यापुढे असे होऊ नये म्हणून शासनाने संबंधित अधिकाऱ्यांना गुणवत्तेवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

घरकुल योजनेत भ्रष्टाचार थांबविण्याचा प्रयत्न

लाभार्थ्यांना घरकुल अनुदानासाठी लाच मागितली जात असल्यास संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार द्यावी. सरकारने यासाठी कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत.

घरकुल लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती

  • ज्यांच्याकडे बांधकामासाठी जागा नाही, त्यांना सरकारकडून जागा दिली जाणार आहे.
  • लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीनंतर अनुदानाचे हप्ते वेळेवर मिळतील.
  • २० लाख नवीन घरकुलांचे उद्दिष्ट असून त्यासाठी गतीने काम केले जाणार आहे.Jamin Nasalelyana Gharkul Yojana Maharashtra.
  • लाभार्थ्यांची यादी ग्रामपंचायतीच्या कार्यालयात प्रसिद्ध केली जाणार आहे.
  • घरकुल योजना पारदर्शकतेने राबवली जाईल आणि भ्रष्टाचाराला आळा घातला जाईल.

घरकुल योजनेबाबत महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तरे

प्रश्नउत्तर
घरकुल योजनेसाठी जागा नसेल तर काय करावे?सरकार पात्र लाभार्थ्यांना जागा देणार आहे.
जागा मिळण्यासाठी कुठे अर्ज करावा?स्थानिक ग्रामपंचायत आणि जिल्हा प्रशासन कार्यालयात.
घरकुल यादीत नाव आहे की नाही, कसे तपासावे?ग्रामपंचायतच्या दर्शनी भागात यादी पाहू शकता.
घरकुल मंजुरी किती दिवसात होते?प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तात्काळ मंजुरी दिली जाईल.
लाभार्थ्यांना अनुदान कसे मिळेल?टप्प्याटप्प्याने हप्त्यांद्वारे दिले जाईल.
घरकुल बांधकाम निकृष्ट झाल्यास काय करावे?स्थानिक अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवावी.
घोटाळा किंवा लाच मागितल्यास कुठे तक्रार करावी?भ्रष्टाचार प्रतिबंधक विभाग किंवा जिल्हा प्रशासनाकडे.
नवीन २० लाख घरकुलांचे काम केव्हा सुरू होणार?लवकरच मंजुरी देऊन काम सुरू होईल.
घरकुल योजनेंतर्गत जागा कोणाला दिली जाणार?ज्या लाभार्थ्यांकडे बांधकामासाठी जागा नाही त्यांना.
अधिक माहितीसाठी कुठे संपर्क करावा?स्थानिक ग्रामपंचायत किंवा जिल्हाधिकारी कार्यालय.

सरकारने घरकुल योजनेसंदर्भात मोठा निर्णय घेतला असून, पात्र लाभार्थ्यांना आता जागेची चिंता राहणार नाही. Jamin Nasalelyana Gharkul Yojana Maharashtra

योजनेअंतर्गत पारदर्शकपणा वाढवण्यासाठी विविध पावले उचलली जात आहेत. त्यामुळे ज्यांना हक्काचे घर हवे आहे त्यांनी आपल्या ग्रामपंचायतीत जाऊन आवश्यक ती माहिती घ्यावी आणि त्वरित अर्ज करावा असे शासना मार्फत सांगण्यात येत आहे.

WhatsApp aapla Baliraja

Leave a Comment