राज्यभरातील 70 हजार आशा स्वयंसेविकांना मिळणार आता मोबदल्याचा हिशेब – आनंदाची बातमी
‘ सध्या आरोग्यविषयक योजना राबविण्यात वाटा उचलणाऱ्या आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकांना मोबदला याचा हिशेब दिला जात नव्हता तर आता आशा स्वयंसेविकाना व गट प्रवर्तकना मोबदला या वेतन चिठ्ठीत दिली जाणार आहे याचा फायदा असा की, मासिक मोबदला कोणकोणत्या कामाचा आहे याचा हिशेब या चिठीत राहणार आहे.( सोप्या शब्दात त्याचे रेकॉर्ड राहणार आहे)
राज्यभरातील ७० हजार आशा स्वयंसेविका व ४ हजार गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात यामूळे पारदर्शकता येणार आहे. या संदर्भातील आदेश राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या सहसंचालकांनी ( आतांत्रिक काढला आहे)
सध्या आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांकडून विविध ७४ प्रकारची
कामे करून घेतली जातात. यामध्ये महिलांचे आरोग्य, लसीकरण याशिवाय साथीचे
आजार यासाठी किंवा उपाययोजनांसाठी आशा स्वयंसेविकांची मदत घेतली जाते.
त्यांना निश्चित वेतन नाही.( फिक्स नाही ) कामावर आधारित मोबदला त्यांना दिला जातो. दरमहा साधारणतः: सहा ते सात हजार रुपयांपर्यंत त्यांचे मानधन निघते. परंतु
ही रक्कम नेमकी कशापोटी मिळाली आहे, याची माहिती मिळत नव्हती.त्यामुळे या काम संदर्भात आशा सेविकाना वेतन चिठ्ठी मिळावी, अशी त्यांची मागणी होती.
Asha Sevika Good News Today :
( महिलां वर्ग साठी आनंदाची बातमी आली ! अंगणवाडी सेविका भरतीला मान्यता | 20 हजार पदांची जाहिरात येणार त्यामध्ये ह्याची सुद्धा जाहिरात | पूर्ण पहा – येथे क्लिक करा
या कामांचा मिळतो मोबदला :
1. मासिक सभा, प्रसूती रुग्ण, लसीकरण, विविध प्रकारच्या रुग्णसेवा.याचा मोबदला मिळतो
2. मासिक सभेचा सर्वाधिक पाच हज़ार रुपये मोबदला.दिला जातो यात प्रामुख्याने ( राज्य – 3 हजार + केंद्र 2 हजार ) राज्याचा तीन हज़ार तर केंद्र सरकारचा दोन हज़ार रुपये वाटा.
3. गावातील महिलेची शासकीय रुणालयात प्रसुती केल्यास ६०० रुपये मानधन मिळतो.
4.महिला प्रसूतीसाठी माहेरी गेल्यास अर्धी रक्कम अर्थात ३०० रुपये. याशिवाय वेळोवेळी निघणाऱ्या कामाची रक्कम आशा सेविकांना मिळते.
दिवाकर नागपुरे :-
“काही आशा स्वयंसेविकांना केलेल्या कामाचाही मोबदला मिळत नव्हता. त्यामुळे वेतन चिट्ठीची मागणी होती.”
– दिवाकर नागपुरे, राज्य
उपाध्यक्ष,
महाराष्ट्राज्य आरेग्य
खाते आशा व गठ प्रवर्तक संघटना