Adhar card And Bank link Marathi : जर सरकारी योजने साठी तुम्ही अर्ज केला असेल आणि जर तुमच्या बँक खात्याला जर आधार कार्ड लिंक नसेल किंवा आधार कार्ड ला बँक लिंक नसेल तर तुम्हाला या योजनेचे अनुदान मिळणार नाही,
जरी तुम्ही बँक खात्याची झेरॉक्स या योजनेला दिले असले तरी, कारण नवीन शासन निर्णय नुसार आता आधार लिंक बँक खात्यात पैसे सोडण्याचे सरकारने ठरवले आहे. https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login
Adhar card And Bank link status Marathi : नुकतेच या संदर्भात माहिती समोर आली आहे की, जर बँक खात्याला जर आधार लिंक किंवा संलग्न नसेल तर शासनाने नवीन शेततळ्याचे अनुदान थांबवले आहे.
मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजने मार्फत मंजुरी मिळालेल्या 5 हजार ( 5,000 ) शेततळ्याना 33 हजार कोटी रुपये एवढे अनुदान दिले आहे.
पण यामध्ये जर जो लाभार्थी असेल ( शेततळ्याचा ) त्याच्या बँक खात्याला आधार लिंक किंवा आधार कार्ड ला बँक लिंक नसेल तर त्याच्या खात्यावर हे अनुदान येणार नाही, असे ठाम मत कृषी विभागाने सांगितले आहे.
नुकतेच कृषी विभागाने ऑनलाईन Mahadbt मार्फत अर्ज मागितले होते, त्याची सोडत काढणे आणि सोडतीत पात्र ठरलेल्या लाभार्थीचे अर्ज स्वीकारून Mahadbt farmer मध्ये त्याला मंजूरी देऊन अनुदान पाठविण्याची प्रक्रिया चालू आहे. यावर्षी पाहिले तर 76,719 अर्ज स्वीकारले आहे.
या स्वीकारलेल्या अर्जापैकी 28141 लाभार्थी यांनी Mahadbt farmer या सरकारी संकेतस्थळावर लागणारी सर्व आवश्यक कागद पत्रे अपलोड केली आहेत. यानापैकी 1, 729 लाभार्थी याना शेततळे खोदण्यासाठी मंजुरी भेटलेली आहे.
या खोदकामाचे काम पूर्ण झाल्यामुळे आता ते लाभार्थी शेततळे अनुदान साठी प्रतीक्षेत आहेत, पण शेततळे पाहणी केल्यानंतर हे अनुदान शेतकऱ्यांना किंवा लाभार्थी यांना दिले जाणार आहे अशी भूमिका कृषी विभागाने घेतली आहे.
पण जर हे अनुदान त्यांना पाहिजे असेल तर त्यांच्या आधार कार्ड ला बँक लिंक असल्याशिवाय हे शेततळे अनुदान दिले जाणार नाही अशी भूमिका कृषी विभागाने घेतली आहे.
त्यामुळे जे या योजनेचे लाभार्थी आहेत त्यांनी आधार कार्ड ला बँक लिंक करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
Ans : तुमच्याकडे जर तुमचे बँक खाते असणाऱ्या बँकेचे मोबाईल अँप्लिकेशन असेल तर तुम्ही त्या मार्फत आधार लिंक असणाऱ्या ठिकाणी जाऊन बँकेशी आधार कार्ड लिंक करू शकता.
किंवा जर तुम्ही ऑफलाईन करायचे असेल तर आधार आणि बँक लिंक ( आधार सिडिंग ) चा फॉर्म बँकेत भरून जमा करायचा आहे यामार्फत तुम्ही आधार कार्ड ला बँकेशी लिंक करू शकता.
Ans : आधार सिडिंग म्हणजे बँकेला आधार नंबर लिंक करणे होय. याचा फायदा असा आहे की एकच बँक तुमची आधार ला लिंक होईल. त्यामुळे जे खरा लाभार्थी आहे त्याच्या बँक खात्यावर आधार मार्फत जे अनुदान किंवा मदत आहे ती जाईल.
नमस्कार, महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतेच वृद्ध कलाकारांना आर्थिक मदत देण्यासाठी ' कलाकार मानधन योजना '2025…
नमस्कार, आपण घरकुल योजने साठी फॉर्म भरतो आणि घरकुल योजनेचा फॉर्म मंजूर होतो, पण घर…
नमस्कार "पिंक ई-रिक्षा योजना" हि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले…
"ड" अक्षराने सुरू होणाऱ्या 100 गावांची नावे खालीलप्रमाणे: d varun gavachi naave ड वरून गावांची…
गाव नमुना 14 (Form 14) हा एक सरकारी दस्तऐवज आहे जो मुख्यत: महाराष्ट्र राज्यातील कृषी…
महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने कामगारांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवल्या जातात. कामगारांची नोंदणी, नूतनीकरण, आणि लाभ…
This website uses cookies.