कोणीच मदत करत नाही, घरबसल्या करा अर्ज आणि मिळवा पी एम योजनेतून वार्षिक १२ हजार रुपये Pm Kisan Registration 2024

 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शेतकरी बंधूंनो, केंद्र सरकार मार्फत आपल्या बळीराजा साठी महत्वाची योजना म्हणजे पी एम किसान योजना या योजने मध्ये नोंदणी Pm kisan Registration साठी मुदत आता वाढवून देण्यात आली आहे.  जे शेतकरी या योजनेमध्ये पात्र असून देखील त्यांना या योजने मार्फत 12,000 रुपये ( महाराष्ट्रात ) मिळत नाही,  ते आता नोंदणी करू शकता. पहिल्यांदा ही नोंदणी Csc centre मार्फत होत होती परंतु बळीराजा च्या होणाऱ्या गैर सोयी मुळे तसेच आपल्या सरकार सेवा केंद्र किंवा सीएससी सेंटर यांच्या हेडसाळ वृत्ती मुळे आपला बळीराजाची गैर सोय होऊन जाते.  यामुळे आता कोणी पण ज्याच्याकडे जमीन आहे तो या योजने मध्ये नोंदणी करू शकतो. तुमच्या कडे जर स्मार्ट फोन आणि त्याला इंटरनेट जोडणी असेल तर तुम्ही घरी बसल्या तुमच्या मोबाईल मधून ही Pm kisan registration पी एम किसान नोंदणी करू शकता.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

हे पण पहा :  पी एम किसान सन्मान निधी योजनेचे 2000 रुपये जर बँकेत आले नसतील तर मोबाईल मधून एवढे काम करा लगेच बँक खात्यावर पैसे येतील

PM Kisan Registration

केंद्र सरकार मार्फत पी एम किसान नवीन नोंदणी ची मुदत आता वाढून दिली आहे.  ज्या शेतकऱ्यांनी अजून पण नोंदणी केली नाही ते आता आपल्या मोबाईल मधून  पी एम किसान नवीन नोंदणी करू शकता.  नोंदणी करताना या योजने साठी काही पात्र निकष आहेत. ते जर निकष तुम्ही पूर्ण करत असतील तर येणारा 4 हजार रुपये चा हप्ता आता तुमच्या आधार लिंक बँकेत लवकरच येईल आणि तुम्ही या योजनेत कायम स्वरूपी पात्र राहणार आहात.

पी एम किसान साठी आवश्यक पात्रता

1. जो शेतकरी अर्ज करणार आहे त्याच्या नावावर थोडी का होईना सरकारी दप्तरी 7/12 उतारा किंवा 8अ वर जमीन पाहिजे.
2. या योजने साठी कोणतेही आरक्षण दिलेले नाही, ओबीसी, एस टी आणि एस सी सर्व जण या योजने साठी पात्र राहणार आहे.
3. पी एम किसान योजने साठी अर्ज करताना त्याच्याकडे मोबाईल नंबर पाहिजे.
4.पी एम किसान योजने साठी अर्ज करताना त्याच्याकडे आधार लिंक बँक खाते पाहिजे. ( आधार ला बँक लिंक म्हणजे NPCI शी लिंक असणारे खाते होय. ) बऱ्याच दा बँकेला लिंक झाले म्हटले जाते ते बँके मध्ये आधार केवायसी झालेले असते. परंतु यामुळे बँक ही NPCI शी आधार लिंक करत नसून ती फक्त आधार केवसायी करते यामुळे बऱ्याच दा आपली नकळत फसवणूक होते.

पी एम किसान योजना मोफत नोंदणी Pm Kisan New Registration असे करा

पी एम किसान मध्ये नोंदणी करण्यासाठी वरील निकष जर पूर्ण करत असतील तर तुम्ही ऑनलाईन नोंदणी करू शकता यासाठी अतिरिक्त कोणतेही शासन शुल्क लागत नाही.

1. पी एम किसान नोंदणी करण्यासाठी सुरुवातीला तुमच्या कडे असणाऱ्या मोबाईल मध्ये google चालू करा ( Open google Browser )

2. Google चालू केल्यानंतर त्यामध्ये pm kisaan असे Search करा , Search केल्यानंतर तुम्हाला सर्वात वरती pmkisan.gov.in ही लिंक दिसेल त्यावर क्लीक करून मूळ वेबसाईटच्या Home Page वर यायचे आहे.

3. pm kisan Home page वर आल्यानंतर तुम्हाला उजव्या बाजूला Farmer Cornor असा Option दिसेल, त्यामध्ये New farmer registration अशी लिंक दिसेल, तर या New farmer registration वर क्लीक करायचे आहे.

 pm-kisan-registration

 

4. New farmer वर क्लीक केल्यानंतर एक नवीन page वर तुम्हाला घेऊन जाईल. येथे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. येथे आल्यानंतर Rural किंवा Urban हा Option निवडून , आधार नंबर तसेच चालू नंबर जो तुम्ही नेहमी वापरता तो या ठिकाणी टाकायचा आहे. तुमचे राज्य निवडायचे आणि त्या खाली असणारा Captcha टाकून Send Otp वर क्लीक करायचे आहे.

 

pm-kisan-registration-new

 

6. या ठिकाणी आपले गाव बरोबर नमूद आहे की नाही पहा, रेशन कार्ड नंबर, मोबाईल नंबर, त्यांनतर खाली सर्व्हे नंबर, खाता नंबर, आणि किती क्षेत्र आहे, जमीन कधी नावावर झाली आहे , ती जमीन तुमच्या नावावर कशी Transfer झाली आहे ( उदा. वडिलोपार्जित ) ते सर्व याठिकणी टाकून Add करायचे आहे.

7. सर्व माहिती भरल्यानंतर खाली तुम्हाला आधार कार्ड आणि land Record pdf स्वरूपात 100kb च्या आत तयार करून Upload करायचे आहे. आणि फायनल सबमिट करायचे आहे.

gai ani gotha anudan yojana pdf

हे पण पहा :  शरद पवार ग्रामसमृध्दी योजना अर्ज सुरू 100% अनुदान, गाई व म्हैस गोठा अनुदान , 77 हजार रुपये अनुदान अर्ज सुरू

 

8. Submit केल्यानंतर फॉर्म भरलायची पावती स्क्रिन शॉट घेऊन प्रिंट काढायची आहे ( पी एम किसान फॉर्म सोबत 7/12 आणि 8अ आणि तुमच्या नावावर झालेली जमीन फेरफार हे सर्व घेऊन फक्त कृषी सहाय्यक किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे जमा करायचे आहे.

 

हे पण पहा : आभा हेल्थ कार्ड आणि आयुष्यमान हेल्थ कार्ड दोघांमधील फरक जाणून घ्या

 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp aapla Baliraja

Leave a Comment

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now