Blog

अहमदनगर जिल्ह्याचा विभाजन व नामांतराचा प्रश्न सध्या राजकीय चर्चेत !

अहमदनगर जिल्ह्याचा विभाजन व नामांतराचा प्रश्न सध्या राजकीय चर्चेत !

 



 

 

 

 

 

Ahmednagar : अहमदनगर जिल्ह्याचा विभाजन व नामांतराचा प्रश्न सध्या राजकीय चर्चेत आला आहे .. गेल्या अनेक दशकापासून या मुद्याला ( अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन व नामांतर ) राजकीय हवा दिली जाते. थोडे फार आरोप व प्रत्यारोप झाल्यानंतर हा मुद्दा शांत होतो. तसे पाहिले तर अहमदनगर जिल्ह्याचे दोन मुख्य भाग म्हणायचे , एक म्हणजे उत्तर अहमदनगर ( उत्तरेकडील अहमदनगर ) आणि दुसरे म्हणजे दक्षिण अहमदनगर ( दक्षिणेकडील अहमदनगर ), या नामांतर व विभाजन या मुद्याला दक्षिणेकडील अहमदनगर मधील नेते एक होतात.

 

 

छत्रपती संभाजी नगर ( औरंगाबाद ) पाठोपाठ आता अहमदनगर शहराचे नावही बदलण्याचा घाट घातला जात आहे. मनसे कडून अहमदनगर शहराला अंबिका नगर असा उल्लेख वारंवार केला जातो तर या शहराला इतर नेत्यांकडून इतर नावे सुचविली जात आहेत. 

 

 

  तसे पाहिले तर देशातील मोजक्याच शहराचे स्थापना दिवस माहीत आहेत त्यापैकी एक म्हणजे अहमदनगर शहर . अहमदनगर शहराची स्थापना 28 मे 1490 मध्ये अहमद निजाम शाह यांच्याकडून झाली अशी आपल्याला माहिती मिळते. त्यापूर्वी जर पाहिले तर राजधानी शहर हे जुने नगर ( जुन्नर ) असा उल्लेख सापडतो. अहमद निजाम शाह कडून शहर वसविल्यानंतर अहमद निजाम शाह याच्या नावावरून अहमदनगर असे शहराचे नाव पडले अशी माहिती आपल्याला मिळते. मात्र पूर्वी शिवसेना व आता मनसे काढून या शहराला अहमदनगर या शहराच्या नावाच्या जागी ‘अंबिकानगर ‘ उल्लेख केला जात आहे.

 

 

अहमदनगर जिल्ह्याचे प्रशासकीय कारभाराची उत्तर व दक्षिण असे दोन भाग पडले आहे , RTO च्या पासिंग चे 16 आणि 17 असे क्रमांक सुद्धा वेगवेगळे आहेत.तसे पाहिले तर उत्तर अहमदनगर भागातील तालुके ( अकोले,संगमनेर, कोपरगाव,राहता,राहुरी,श्रीरामपूर,नेवासा, शेवगाव )  हे सदन आहे ( पाटपाण्यामुळे ) या ठिकाणी तुम्हाला मुख्यतः साखर कारखाने, दूध उत्पादन , शैक्षणिक संस्था आणि इतर गोष्टी जर पहिल्या तर लोकांचे जीवनमान सुद्धा दक्षिणेकडील लोकांपेक्षा उच्च आहे. अहमदनगर दक्षिणेकडील तालुके ( पारनेर, अहमदनगर, पाथर्डी, कर्जत, जामखेड श्रीगोंदा ( काही प्रमाणात ) हे बहुतांशी दुष्काळी म्हणून ओळखले जातात. त्याचा जीवनस्तर हा वेगळा आहे. त्यामुळे राज्याच्या व देशाच्या राजकारणात उत्तरेकडील नेत्याचा प्रभाव जास्त आहे व ते प्रबळ ठरतात. तुलनेने तसे पाहिले तर दक्षिणेकडील नेत्यांना मोठी कामगिरी करता आली नाही. त्यांच्यावर नेहमीच उत्तरेकडील नेत्याचा प्रभाव असतो. बऱ्याच उत्तरेकडील नेते हे दक्षिणेकडील नेत्यांना त्याचे कार्यकर्ते म्हणून मिरवतात. 

 

एकंदरीत पाहिले तर दोन्हीकडील जे सर्व सामान्य लोक आहेत त्यांनासुद्धा या जिह्याचे विभाजन हवे आहे , त्यांच्यात एकमत सुद्धा आहे.

20.674297776.4598259
Aapla Baliraja

Recent Posts

Kalakar Mandhan Yojana 2025 :कलाकारांसाठी खुशखबर ! सरकार देणार दरमहा ₹3150 मदत – लगेच अर्ज करा!

नमस्कार, महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतेच वृद्ध कलाकारांना आर्थिक मदत देण्यासाठी ' कलाकार मानधन योजना '2025…

23 hours ago

जमीन नसलेल्या बेघरांना घरकुलाचा लाभ सर्वात आधी मिळणार शासन निर्देश Jamin Nasalelyana Gharkul Yojana Maharashtra

नमस्कार, आपण घरकुल योजने साठी फॉर्म भरतो आणि घरकुल योजनेचा फॉर्म मंजूर होतो, पण घर…

4 days ago

महिलांसाठी सरकारची पिंक ई-रिक्षा योजना काय आहे ? या योजनेसाठी अर्ज आणि अनुदान तसेच अर्ज कसा करायचा ते पहा ? Pink E-Rickshaw Scheme

नमस्कार "पिंक ई-रिक्षा योजना" हि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले…

2 weeks ago

ड वरून गावांची नावे पहा ?

"ड" अक्षराने सुरू होणाऱ्या 100 गावांची नावे खालीलप्रमाणे: d varun gavachi naave ड वरून गावांची…

4 weeks ago

गाव नमुना 14 म्हणजे काय ? gav namuna 14 online

गाव नमुना 14 (Form 14) हा एक सरकारी दस्तऐवज आहे जो मुख्यत: महाराष्ट्र राज्यातील कृषी…

4 weeks ago

बांधकाम कामगार नोंदणी साठी तालुका सुविधा केंद्र bandhkam Kamgar Taluka Suvidha Kendra

महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने कामगारांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवल्या जातात. कामगारांची नोंदणी, नूतनीकरण, आणि लाभ…

1 month ago

This website uses cookies.