frozen mater Agriculture Business information : नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण शेतामध्ये विविध पिकं घेत असतो यामध्ये मसाले पिके, नगदी पिके त्याचबरोबर कडधान्य पिके अशा प्रकारचे पिके आपण घेत असतो. पण आपण ज्यावेळी पीक घेतो त्यावेळी यासाठी खर्च मात्र जास्त येतो. जसे की त्यामध्ये उत्पादन खर्च त्यानंतर इतर जे खर्च असतात यामुळे काय होतं आपल्याला शेती मध्ये कमी नफा मिळतो. त्यामुळे आपल्याला शेती ही परवडत नाही असे बऱ्याचदा ऐकायला मिळते. आणि शेवटी काय होतं तर आपण कर्जबाजारी होत चालतो.
शेतकरी बंधूंनो आपण आज अशा शेती संदर्भातील बिजनेस बद्दल माहिती पाहणार आहोत. हा बिजनेस केल्यानंतर तो मला चांगला फायदा होणार आहे. आणि याला काही जास्त जागा लागत नाही अगदी कमी जागेमध्ये सुद्धा तुम्ही हा बिजनेस सुरू करू शकता. चला तर हा कोणता बिजनेस आहे याबद्दल आपण माहिती पाहू.
हि माहिती पहा :
frozen mater Agriculture Business information : मित्रांनो वटणाचा व्यवसाय Frozen mater Business सध्या दिवसेंदिवस खूप वाढत आहे. या गोठवलेल्या वाटाण्याची डिमांड मोठ्या प्रमाणावर शहरी भागात आपल्याला पाहायला मिळते. या व्यवसायाला तेजीचे मार्केट आहे असे म्हणता येईल. गोठवलेले वाटाणे किंवा आपण त्याला हिरवे वाटाणे सुद्धा म्हणतो हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला जास्त भांडवलाची गरज नाही. तसेच तुम्हाला जास्त जागेची सुद्धा गरज नाही तुम्ही कमी जागेमध्ये किंवा छोट्याशा रूममध्ये सुद्धा व्यवसाय सुरु करू शकता.
गोठवलेले वाटाणे वटाणे हा व्यवसाय कसा सुरू करणार. मित्रांनो तुम्ही जर शेतकरी असाल तर तुम्हाला कोणाकडून विकत घ्यायची गरज नाही. पण तुम्ही जर शेतकरी नसाल तर तुम्हाला हिरवे वटाणे Frozen mater शेतकऱ्यांकडून विकत घ्यावे लागेल.
शेतकऱ्यांकडून विकत घेतल्यानंतर तुम्हाला ते वटाणे सोलणे, त्यानंतर त्या वाटाण्यांना धुणे त्यानंतर उकळणे आणि पॅकिंग करणे अशी सोपी पद्धत आहे. या व्यवसायासाठी तुम्ही घरातल्यांची मदत घेऊ शकता किंवा कमी मजुरांमध्ये हा व्यवसाय सुरू करू शकता. पॅकिंग केल्यानंतर आम्हाला तुम्ही डायरेक्ट मार्केटमध्ये सुद्धा विकू शकता किंवा दुकानदाराशी ओळख करून तुम्ही हे उत्पादन विकू शकता.
मित्रांनो फ्रोजन मटर अर्थात हिरवे वटाणे हा व्यवसाय शहरांमध्ये अत्यंत तेजी मध्ये वाढत आहे. कारण हॉटेल्स झाले आणि घरगुती साठी वाटाण्याची भाजी लोकांना आवडत असतं त्यामुळे यामध्ये नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे.
शेती संदर्भात बिझनेस आयडिया साठी येथे क्लीक करा
फ्रोजन मोटरचा व्यवसाय जर तुम्ही केला तर तुम्हाला यामधून 70 ते 80 टक्के फायदा मिळू शकतो. यामध्ये थोडाफार कमी जास्त होऊ शकता पण साधारण जर पाहिले तर 70 ते 80% च्या दरम्यान फायदा होणार आहे. शेतकऱ्यांकडून तुम्ही कसं किलोने हे वाटाणे विकत घेणार आहे त्यावर त्याची किंमत ठरणार आहे. शेतकऱ्यांकडून तुम्ही उत्पादन विकत घेऊ शकता किंवा तुमच्याकडेच जर शेतामध्ये वाटाणे असतील तर तुम्ही डायरेक्ट हिरवे वाटाणे पॅकिंग पर्यंत कसे तयार करायचे हा बिजनेस सुरू करू शकता.
मित्रांनो शेतकऱ्यांकडून वटाणे विकत घेतल्यानंतर किंवा तुमच्याकडेच शेतामध्ये जर वाटाणे असतील त्यानंतर पॅकिंग पर्यंत पद्धत खूप सोपी आहे. आता ते गोठवायचं कसं हे महत्त्वाचं आहे. पॅकिंगच्या अगोदर हे वाटाणे तुम्ही 80 डिग्री सेल्सिअसच्या तापमानावर उकळायचा आहे. त्यानंतर ते तीन ते पाच या डिग्रीपर्यंत थंड करायचा आहे जेणेकरून जर त्याच्यावर कोणते जिवाणू चिकटले असतील तर ते लगेच नष्ट होणार आहे. त्यानंतर तुम्ही याला पॅकिंग करू शकता आणि फ्रीजरमध्ये ठेवू शकता. आणि आणि हे तुम्ही बाजारामध्ये सहज विकू शकता. हा पूर्णपणे लीगली बिजनेस आहे. तुमचा व्यवसाय जर खूप मोठा झाला त्यानंतरच तुम्हाला टॅक्स वगैरे द्यायची गरज आहे. लहान व्यवसायाला कोणती टॅक्स देण्याची गरज नाही किंवा कोणत्या नोंदणीची गरज नाही.
नमस्कार, महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतेच वृद्ध कलाकारांना आर्थिक मदत देण्यासाठी ' कलाकार मानधन योजना '2025…
नमस्कार, आपण घरकुल योजने साठी फॉर्म भरतो आणि घरकुल योजनेचा फॉर्म मंजूर होतो, पण घर…
नमस्कार "पिंक ई-रिक्षा योजना" हि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले…
"ड" अक्षराने सुरू होणाऱ्या 100 गावांची नावे खालीलप्रमाणे: d varun gavachi naave ड वरून गावांची…
गाव नमुना 14 (Form 14) हा एक सरकारी दस्तऐवज आहे जो मुख्यत: महाराष्ट्र राज्यातील कृषी…
महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने कामगारांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवल्या जातात. कामगारांची नोंदणी, नूतनीकरण, आणि लाभ…
This website uses cookies.