शरद पवार ग्रामसमृध्दी योजना अर्ज सुरू 100% अनुदान, गाई व म्हैस गोठा अनुदान , 77 हजार रुपये अनुदान अर्ज सुरू Gai Gotha Anudan Maharashtra

 शरद पवार ग्रामसमृध्दी योजना अर्ज सुरू 100%  अनुदान | गाई व म्हैस गोठा अनुदान | 77 हजार रुपये अनुदान अर्ज सुरू | gai gotha form | गाय गोठा अनुदान महाराष्ट्र  form pdf | 

Table of Contents

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
gai ani mhais gotha anudan maharashtra
मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
Telegram Group Join Now

 

हेही वाचा :  3 सरकारी योजना ज्या द्वारे मोफत पैसे भेटत जातील Goverment Subsidy Scheme

                  नमस्कार शेतकरी बंधुनो महाराष्ट्र सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीतीने अनेक उपक्रम राबवते. या उपक्रमा मार्फत शेतकऱ्यांना फायदा होत असतो. असे अनेक उपक्रम आहेत ज्या मार्फत शेतकरी या योजनांचा फायदा घेतात आणि आपले उत्पन्न वाढवतात. तर शेतकरी बंधुनो आज आपण शेतकऱ्यांसाठी असणारी ‘ गाई म्हैस गोठा अनुदान योजना किंवा आपण सोप्या शब्दात शरद पवार ग्रामसमृध्दी योजना असे सुद्धा म्हणतो.

 

 

शरद पवार ग्रामसमृद्धी योजना ?

नमस्कार शेतकरी बंधुनो महाराष्ट्र सरकार मार्फत आलेल्या 3 फेब्रुवारी 2021 शासन निर्णयानुसार शरद पवार ग्रासमृद्धी योजना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आणली. या ग्राम समृद्धी योजनेतून शेळी, कुक्कुट पालन तसेच गाय – म्हैस यासाठी किंवा बांधकाम करण्यासाठी अनुदान स्वरूपात मदत दिली जाते.

हेही वाचा :  नोकऱ्यांसाठी सुचनांचीच भरती , जिल्हा परिषदेच्या जागांचा मुहूर्त कधी ? job News, Employment News Maharashtra

 

ही योजना प्रामुख्याने : 

i) शेळीपालनासाठी शेड बांधणे

ii) कुक्कुटपालनासाठी शेड बांधणे

iii) गाई म्हैस यांच्यासाठी गोठा बांधणे

iv) नाफेड कॉपस्टिंग

v) इतर

 

 

या योजनेचे अनुदान किती ?

I) 2 ते 6 गुरांसाठी ( गाई म्हैस गोठा अनुदान ) यामध्ये 77,188 रुपये अनुदान दिले जाते. गुरे 6 पेक्षा जास्त असतील , 12 , 18 ( 6×6×6) असतील ( 6 च्या पटीमध्ये तर अनुदान सुद्धा याच  पटीने मिळणार ) उदा. जनावरे जर 12 असतील तर अनुदान दुप्पट आणि जनावरे जर 18 असतील अनुदान तिप्पट मिळणार

 

 

 

II) शेळ्यांसाठी निवारा : – यामध्ये जर 10 शेळ्यांकरिता शेड किंवा निवारा बांधायचे असेल तर 49,284 रुपये एवढे अनुदान मिळणार.( हे सुद्धा पटीने अनुदान मिळणार उदा 10 शेळ्यांसाठी 49284 रु, 20 शेळ्यांसाठी दुप्पट ( 49284×2 ) आणि 30 शेळ्या असतील तर अनुदान सुद्धा तिप्पट मिळणार

 

महत्वाचे या योजनेत 10 शेळ्या असाव्यात असे काही नाही जर 2 शेळ्या असतील तरीही तुम्ही/ तुम्हाला  या योजनेत सहभागी होता येते.( शासन निर्णयानुसार )

हेही वाचा :  कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा, सरकारने सुरू केले वाटप onion subsidy distribution in Maharashtra

 

 

III) कुकुटपालन साठी शेड बांधण्यासाठी अनुदान :

यामध्ये 100 पक्षी असतील आणि तुम्हाला शेड यासाठी बांधायचे असेल तर यासाठी या योजनेतून 49,760 रु अनुदान दिले जाते. ( या योजनेत सुद्धा पक्षी जर दुप्पट असतील ( उदा 200 पक्षी ) तर अनुदान सुद्धा दुप्पट च मिळणार ( 49760 रु × 2 )

 

” महत्वाचे जर तुमच्याकडे पक्षी नसतील तर 100 रुपये स्टॅम्प पेपर वर याठिकाणी दोन जामीनदारासह शेड बांधण्यासाठी अनुदान ची मागणी करावी लागेल “

 

IV) नाफेड कंपोस्टिंग भूसंजीवनी :

शेतकरी बंधुनो यामध्ये नाफेड पद्धतीने जर कंपोस्ट खत तयार करण्यासाठी ( शेतातील कचरा गोळा करून खत तयार ) यासाठी महाराष्ट्र सरकार मार्फत या योजनेतून 10,537 रुपये एवढे अनुदान दिले जाते.

 

 

या अनुदान साठी लांबी रुंदी किती पाहिजे ?

यासाठी 3 फेब्रु 2021 चा शासन निर्णय पहा

 

नमुना फॉर्म पाहिजे असेल तर या ठिकाणी क्लिक करा 

 

 

शरद पवार ग्रामसमृध्दी योजना साठी अर्ज करण्याची पद्धत :

शेतकरी बंधुनो या योजनेसाठी ( शेळी निवारा, गाय – म्हैस गोठा , कुकुटपालन किंवा भूसंजीवनी नाफेड ) अर्ज करायचा असेल तर अर्ज तुम्हाला ग्रामपंचायती मध्ये मिळेल . ( अर्ज नमुना पाहण्यासाठी येथे क्लीक करा )

 

यामध्ये सुरुवातीला अर्ज करताना तुम्ही सरपंच , ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी या तीन पैकी कोणाच्या नावाने भरणार आहे त्यांच्या समोर खूण ( टिकमार्क ) करायची आहे. त्यानंतर अर्जामध्ये ग्रामपंचायतीचे नाव, त्यानंतर तालुका आणि जिल्हा या ठिकाणी निवडायचा आहे किंवा या ठिकाणी या संदर्भात अर्जात माहिती टाका. त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे, 

 

 

या योजनेसाठी आवश्यक कागतपत्रे :

  • आधार कार्ड
  • रहिवासी दाखला
  • रेशन कार्ड
  • फोटो
  • मोबाईल नंबर
  • इलेक्शन कार्ड
  • अर्जदार शेतकरी दाखला 
  • आराखडा

 

शरद पवार ग्रामसमृध्दी योजनेचा उद्देश :

– शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण किंवा आत्मनिर्भर करणे/ बनवणे

– पशूंना संरक्षण

– शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे

– पक्षु किंवा जनावरे पाळण्यास प्रोत्साहन करणे

 

नमुना फॉर्म पाहिजे असेल तर या ठिकाणी क्लिक करा 

 

 

 

 

WhatsApp aapla Baliraja

2 thoughts on “शरद पवार ग्रामसमृध्दी योजना अर्ज सुरू 100% अनुदान, गाई व म्हैस गोठा अनुदान , 77 हजार रुपये अनुदान अर्ज सुरू Gai Gotha Anudan Maharashtra”

  1. या अनुदान साठी लांबी रुंदी किती पाहिजे ?
    यासाठी 3 फेब्रु 2021 चा शासन निर्णय पहा..।। हा कुठे पाहयचा एवढी लांबलचक माहिती टाकता मग जमीनीचि अट व गोठ्याचि साईज टाकली असती तुमचं काय नुकसान झालं असंत

    Reply

Leave a Comment