Gram panchayat complaint Maharashtra : ग्रामपंचायत मार्फत अनेक योजना हे राबविले जातात. काही योजनांचे अनुदान हे सरळ ग्रामपंचायतीमध्ये जमा होत असते. पण हे काही कामे फक्त कागदोपत्री दाखवून त्याचे अनुदान लाटले जाते. त्याचा सर्वसान्यांपर्यंत माहिती किंवा कामे माहिती होत नाही. तसेच काही कामाबाबत विचारणा केली असता ग्रामसेवक किंवा सरपंचाकडून हे उडवा उडवी उत्तरे दिली जातात. अश्या वेळेस तुमचे कोणी ऐकत नाही. अश्या वेळेस online grampanchyat complaint maharashtra मध्ये तक्रार केल्यानंतर तुम्हाला थोडा का होईना न्याय मिळेल येथे न्याय मिळाला नाही तर तुम्ही केंद्राकडे Pmo ला तक्रार grivience करू शकता.
आज आपण महाराष्ट्र सरकार कडे तक्रार कशी नोंदवायची या सदर्भात माहिती पाहू. सध्याचे युग मोबाईल आणि इंटरनेट चे युग आहे असे म्हणता येईल. तुमच्याकडे जर मोबाईल असेल आणि त्याला जर इंटरनेट जोडले असे किंवा त्यामध्ये Internet चालू असेल तर तुम्ही कोणत्याही ठिकाणावरून या संदर्भात तक्रार करू शकता. तुम्ही शेतात जरी असाल तरीही तेथे बसून तक्रार करू शकता. तक्रार करताना टाईप करुन तक्रार करू शकता किंवा त्या तक्राराची pdf बनवून तक्रार दाखल करू शकता. या साठी कोणतेही शुल्क लागतं नाही.
१. तक्रार तुम्ही ग्रामसेवक यांच्या कामाची करू शकता.
२. तक्रार तुम्ही सरपंच किंवा उपसरपंच यांच्या कामाची करू शकता.
३. तक्रार तुम्ही ग्राम पंचायत सदस्य यांच्या नावे सुध्दा करू शकता.
४. तक्रार तुम्ही गाव टोळी विरुद्ध करू शकता. ( पोलिसांकडे तक्रार केल्यास किंवा एस पी ऑफिस मध्ये तक्रार केल्यास या संदर्भात लवकर यासाठी न्याय मिळेल ).
५. तक्रार तुम्ही तलाठी या विरुद्ध करू शकता.
६. तक्रार तुम्ही सेतू किंवा आपले सरकार सेवा चालाविण्या विरुद्ध करू शकता.
७. तक्रार तुम्ही आधार केंद्र चालविणाऱ्या गैर प्रकरा विरुद्ध करू शकता.
८. सर्व प्रकारच्या होणाऱ्या त्रासा विरुद्ध तक्रार करू शकता.
तक्रार येथे नोंदवा – तक्रार करण्यासाठी येथे क्लिक करा
१. तक्रार करण्यासाठी तुम्हाला सर्व प्रथम मोबाईल मध्ये internet चालु करून कोणताही Browser चालू करून त्यामध्ये griviences maharashtra gov in असे search करायचे आहे. सर्च केल्यानंतर तुम्हाला एक लिंक दिसेल https//grievances.maharashtra.gov.in/mr यावर क्लिक करायचे आहे.
२. वेबसाईट होम पेज वर आल्यानंतर तक्रार नोंदवा असा option दिसेल यावर क्लिक करायचे आहे,.
३. क्लिक केल्यानंतर log in असा option दिसेल. पण या ठिकाणी मोबाईल नंबर आणि password टाकून log in करायचे आहे. आपण नोंदणी केली नसल्याने log in होणार नाही. त्यासाठी किंवा नोंदणी साठी त्याच्याच खाली एक पर्याय दिसेल यावर क्लिक करायचे आहे.
४. यामध्ये मोबाईल नंबर टाकून त्यानंतर जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायत असे पर्याय निवडून तुम्हाला तक्रार कोणा विरुद्ध करायची आहे सर्व माहिती टाकून अर्ज किंवा तक्रार दाखल करायची आहे.
५. या दाखल केलेल्या तक्रारी चा निकाल ७ दिवस ते १ महिन्याच्या आत निकाली काढला जातो.
तक्रार येथे नोंदवा – तक्रार करण्यासाठी येथे क्लिक करा
नमस्कार, महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतेच वृद्ध कलाकारांना आर्थिक मदत देण्यासाठी ' कलाकार मानधन योजना '2025…
नमस्कार, आपण घरकुल योजने साठी फॉर्म भरतो आणि घरकुल योजनेचा फॉर्म मंजूर होतो, पण घर…
नमस्कार "पिंक ई-रिक्षा योजना" हि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले…
"ड" अक्षराने सुरू होणाऱ्या 100 गावांची नावे खालीलप्रमाणे: d varun gavachi naave ड वरून गावांची…
गाव नमुना 14 (Form 14) हा एक सरकारी दस्तऐवज आहे जो मुख्यत: महाराष्ट्र राज्यातील कृषी…
महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने कामगारांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवल्या जातात. कामगारांची नोंदणी, नूतनीकरण, आणि लाभ…
This website uses cookies.