Categories: Blog

कोव्हीड-१९ या आजारामुळे मृत पावलेल्या व्यक्तीच्या नजिकच्या नातेवाईकास सानुग्रह सहाय्य मंजूर, आला शासनाचा 11 जानेवारी नवीन जीआर

कोव्हीड-१९ या आजारामुळे मृत पावलेल्या व्यक्तीच्या नजिकच्या नातेवाईकास सानुग्रह सहाय्य मंजूर, आला शासनाचा 11 जानेवारी नवीन जीआर

 



Maharashtra gov to give rs 50000 for beneficiary,  family member covid 19 victim ( compensation )

सर्वोच्च न्यायालय निर्णयानुसार सरकारी कारवाई  ( 26/11/2021 GR  ) नुसार :

                           मा.सर्वोच्च न्यायालयाचे रिट याचिका (सिव्हील) क्र.५३९/२०२१ आणि क्र. ५५४/२०२१ मध्ये दि. ३०.६.२०२१ रोजी दिलेल्या निर्णयानुसार कोव्हिड-१९ या आजारामुळे निधन पावलेल्या व्यक्तीच्या निकट नातेवाईकास सहाय्य प्रदान करणेबाबत वर नमूद दिनांक ११ सप्टेंबर २०२५ च्या परिपत्रकान्वये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सविस्तर मार्गदर्शक सूचना पाठविल्या आहेत. तसेच मा. सर्वोच्च न्यायालयाने रिट याचिका (सिव्हील) क्र.५३९ /२०२१ मधील संकीर्ण अर्ज क्र.११२०/२०२१ मध्ये दि. ०४ ऑक्टोंबर, २०२१ रोजी सविस्तर आदेश निर्गमित राज्य सरकार यांना केले आहेत. राज्य शासनाने, महसूल व वन विभागाकडून दिल्या जाणान्या मदतीची रक्कम लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होण्याकरिता योजना आखली आहे. त्यानुसार लाभार्थ्यांना  सहाय्य प्रदान किंवा मदत निधी  करणेसाठी संगणकीय प्रणाली विकसित करण्यात येत असून / केली आहे ,  त्यानुसार आधार क्रमांकाद्वारे ओळख पटवून लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये सहाय्याची / मदतीची रक्कम थेट जमा करण्यात येणार आहे. यास्तव, राज्यातील कोव्हिड- १९ या आजारामुळे निधन पावलेल्या व्यक्तीच्या निकट नातेवाईकास सानुग्रह सहाय्य प्रदान करणेबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार , आदेश निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.



Maharashtra Covid Assistant ( Beneficiary ) GR 

आता शासन निर्णय :

महाराष्ट्र राज्यात जी व्यक्ती कोव्हिड-१९ या आजारामुळे निधन पावली आहे, त्या मृत व्यक्तीच्या निकट नातेवाईकास रु. ५०००০/- (रु.पन्नास हजार) इतके सानुग्रह सहाय्य राज्य आपत्ती मदत निधीमधून प्रदान करण्यास महाराष्ट्र शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

२. हे सानुग्रह सहाय्य किंवा मदत निधी  देण्याकरिता कोविड-१९ मृत्यू प्रकरणे खालीलप्रमाणे निर्धारित करण्यात येतील :-

                     



अनुदान घेण्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या काही अटी व शर्ती :

1 ) R-PCR /Molecula Tests/RAT या चाचण्यांमधून Positive अहवाल आलेल्या ज्या व्यक्तीचे अथवा आंतररुग्ण म्हणून रुग्णालयात दाखल झालेल्या ज्या व्यक्तीचे Clinical diagnosis कोव्हिड-१९ असे झाले होते, याच व्यक्तीचे प्रकरण कोव्हिड-१९ मृत्यू प्रकरणासाठी कोव्हिड प्रकरण म्हणून समजण्यात येईल.



2 ) वरील प्रमाणे समजण्यात येत असलेल्या कोव्हिड-१९ प्रकरणात अशा व्यक्तीचा मृत्यू अशा चाचण्यांच्या दिनांकापासून किवा रुग्णालयात Clinical diagnosis च्या दिनांकापासून ३० दिवसाच्या आत झाला असल्यास ( घरी किंवा हॉस्पिटल मध्ये अशा व्यक्तीचा मृत्यू कोविड १९ चा मृत्यू समजण्यात येईल, जरी हा मृत्यू रुग्णालयाच्या बाहेर झाला असेल अथवा त्या व्यक्तीने कोव्हिड- १९ चे निदान झाल्यामुळे आत्महत्या केली असेल तरी.

३) कोविड-१९ चे प्रकरणात जर व्यक्तीचा रुगणालयामध्ये दाखल असतांना मृत्यू रुग्णालयात झालेला असेल, जरी मृत्यू ३० दिवसाच्या नंतर झाला असेल तरी, अशा व्यक्तीचा मृत्यू देखील कोविड -१९ चा मृत्यू समजण्यात येईल.



४) ज्या कोव्हिड- १९ च्या प्रकरणात व्यक्ती कोव्हिड-१९ पासून बरी झालेली नव्हती, अशा प्रकरणातील व्यक्तीचा मृत्यू रुग्णालयात अथवा घरामध्ये ( मृत्यू ) झालेला आहे आणि त्या व्यक्तीच्या मृत्यू प्रकरणी जन्म व मृत्यू नोदणी अधिनियम, १९६९  नुसार Medical Certificate of Cause of Death (MCCD) हे Fom ४ व ४A मध्ये नोंदणी प्राधिकरणाला पाठविले आहे आशा व्यक्तीचा मृत्यू कोव्हिड-१९ चा मृत्यू समजण्यात येईल.

५) Medical Certificate and of Cause of Death (MCCD) मध्ये “कोव्हिड-१९ मुळे मृत्यू” याप्रमाणे नोंद नसली तरीही वरील दिलेल्या  अटीची पूर्तता होत असल्यास, ती प्रकरणे रु. ५०,০০০/- च्या सानुग्रह सहाय्यासाठी पात्र असतील.

                     हे सहाय्य मिळणेकरिता कोव्हिड-१९ या आजाराने निधन पावलेल्या व्यक्तीच्या निकट नातेईवाईकाने राज्य शासनाने या करिता विकसित केलेल्या वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक राहील. यासाठी अर्जदार स्वतः किंवा सेतू केंद्रात किंवा ग्रामपंचायतीत CSC-SPV मधून अर्ज करु शकेल. हा अर्ज दाखल करतांना अर्जदाराने खालील कागदपत्रे / माहिती सादर करणे बंधनकारक राहील.

                    

आवश्यक कागदपत्रे :

१) अर्जदाराचा स्वत:चा तपशील, आधार क्रमांक किंवा आधार नोंदणी क्रमांक

२) अर्जदाराचा स्वत: चा बँंक तपशील

३) मृत पावलेल्या व्यक्तीचा तपशील

४) मृत पावलेल्या व्यक्तीचे जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम, १९६९ खालील मृत्यू प्रमाणपत्र

५) इतर निकट नातेवाईकांचे नाहरकत असल्याचे स्वयं घोषणापत्र



11  जानेवारी २०२३ – महत्वाची माहिती : 

ज्ञापन – अधिदान व लेखाधिकारी, मुंबई यांना  असे कळविण्याचे आदेश आहेत की, वर नमूद दिनांक २६.११.२०२१ रोजी निर्गमित केलेल्या नवीन शासन निर्णयानुसार, कोव्हीड- १९ या आपत्ती मध्ये आजारामुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या जवळच्या नातेवाईकास रू.५०,००০/- इतके सानुग्रह सहाय्य ( मदत निधी ) प्रदान करणे या योजनेकरिता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून ( District Disaster Management Authority – DDMA ) मंजूर करण्यात येणाऱ्या ३००० अर्जदारांना रू.५०.०००/- प्रत्येकी याप्रमाणे एकूण रु. १५.००,००,०००/-( रुपये पंधरा कोटी फक्त) इतकी रक्कम मंजूर करण्यात येत आहे.



2.वर नमूद शासन परिपत्रक दिनांक ०८.१२.२०२१ नुसार  विहित कार्यपध्दतीनुसार अधिदान व

लेखाधिकारी कार्यालयास रु. १५,००.००,০০০/- ( अक्षरी रुपये पंधरा कोटी फक्त) इतक्या रकमेचे देयक सादर करण्याची कार्यवाही तातडीने करण्यात यावी.                     



3. जी रक्कम देणार आहे ती RTGS/NEFT द्वारे तातडणीने लाभार्थ्यांच्या खात्यात वितरित करण्यात यावी . वितरित करताना तपशील प्रमाणे पाठवावी. ( कॉलम प्रमाणे ) :-

 

 

Covid 19 Victim Update from Maharashtra Goverment :



1. बँकेचे नाव

2. बँकेची शाखा ( Ex. बँकेचा पत्ता पूर्ण पत्यासह व पिन कोड सह )

3. खातेदाराचे नाव – याठिकाणी लाभार्थ्यांचे पूर्ण नाव 

4. बँक खाते क्रमांक

5. IFSC Code – पूर्ण व्यवस्थित 



मेसेजेस करताना ‘त्यावर State Disaster Response Fund ‘ असा पाठवावा.

जीआर पाहण्यासाठी पुढे क्लिक कराक्लिक  ( 11/01/2023 )

जीआर पाहण्यासाठी पुढे क्लिक करा – क्लिक  ( 26/11/2021 )

अनुदानाचे status पहाण्यासाठी पुढील लिंक वर जा  – लिंक  



Aapla Baliraja

Recent Posts

Kalakar Mandhan Yojana 2025 :कलाकारांसाठी खुशखबर ! सरकार देणार दरमहा ₹3150 मदत – लगेच अर्ज करा!

नमस्कार, महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतेच वृद्ध कलाकारांना आर्थिक मदत देण्यासाठी ' कलाकार मानधन योजना '2025…

1 day ago

जमीन नसलेल्या बेघरांना घरकुलाचा लाभ सर्वात आधी मिळणार शासन निर्देश Jamin Nasalelyana Gharkul Yojana Maharashtra

नमस्कार, आपण घरकुल योजने साठी फॉर्म भरतो आणि घरकुल योजनेचा फॉर्म मंजूर होतो, पण घर…

4 days ago

महिलांसाठी सरकारची पिंक ई-रिक्षा योजना काय आहे ? या योजनेसाठी अर्ज आणि अनुदान तसेच अर्ज कसा करायचा ते पहा ? Pink E-Rickshaw Scheme

नमस्कार "पिंक ई-रिक्षा योजना" हि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले…

2 weeks ago

ड वरून गावांची नावे पहा ?

"ड" अक्षराने सुरू होणाऱ्या 100 गावांची नावे खालीलप्रमाणे: d varun gavachi naave ड वरून गावांची…

4 weeks ago

गाव नमुना 14 म्हणजे काय ? gav namuna 14 online

गाव नमुना 14 (Form 14) हा एक सरकारी दस्तऐवज आहे जो मुख्यत: महाराष्ट्र राज्यातील कृषी…

4 weeks ago

बांधकाम कामगार नोंदणी साठी तालुका सुविधा केंद्र bandhkam Kamgar Taluka Suvidha Kendra

महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने कामगारांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवल्या जातात. कामगारांची नोंदणी, नूतनीकरण, आणि लाभ…

1 month ago

This website uses cookies.