Central goverment

मोफत शिलाई मशीन योजना अर्ज असा करा शिलाई मशीन मिळेल | free Silai Machine Yojana | Free sewing Machine Scheme Maharashtra

मोफत शिलाई मशीन योजना अर्ज असा करा शिलाई मशीन मिळेल  | free Silai Machine Yojana | Free sewing Machine Scheme Maharashtra

      नमस्कार मंडळी केंद्र सरकार मार्फत महिलांसाठी महिला आणि बाल कल्याण विभागात मार्फत अनेक योजना आहेत. या योजना मार्फत अनेक महिलांना फायदा होत आहे. अनेक महिलांना घरबसल्या रोजगार उपलब्ध होत आहे. त्यामार्फत त्यांना सरकार उदरनिर्वाह संदर्भात सक्षम करत आहे. त्यांची आर्थिक स्थिती सुधारणे तसेच त्यांचे जीवनमान उंचावणे या दृष्टीने अनेक योजना महाराष्ट्र सरकार किंवा केंद्र सरकार मार्फत राबविले जात आहे. अशीच एक महत्वाची केंद्र सरकारची योजना आहे नाव मोफत शिलाई मशीन योजना. सद्या केंद्र सरकार मार्फत मोफत शिलाई योजना काही राज्यातच चालू आहे, त्यामध्ये महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, गुजरात, हरियाणा, मध्यप्रदेश, कर्नाटक, बिहार आणि छत्तीसगड हे राज्ये समाविष्ट आहेत. नुकतीच महाराष्ट्र सरकारने सुद्धा 90% अनुदान तत्वावर ही मोफत शिलाई योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. पण केंद्र सरकार मार्फत ही योजना 100% अनुदान तत्वावर राबविले जात आहे हे या ठिकाणी लक्षात घ्या. चला तर मोफत शिलाई योजना यासाठी अटी काय आहेत, कोणते कागदपत्रे सादर करावी लागतील तसेच अर्ज कोठे मिळेल या संदर्भात आपण माहिती पाहू.

लाभ कोणाला मिळणार ?

ही मोफत शिलाई योजना (  free sewing machine scheme ) महिलांना साठी असल्याने या योजनेसाठी फक्त आणि फक्त महिलाच या ठिकाणी अर्ज करू शकतात. पण सर्वच महिला या ठिकाणी अर्ज करू शकत नाही. तर कोणत्या महिला अर्ज करू शकतात या संदर्भात आपण माहिती पाहू. या योजनेसाठी काही आर्थिक निकष आहेत तसेच जे महिला विधवा आहेत किंवा अपंग ( दिव्यांग ) आहेत त्यांना आधी संधी दिली जाते.

मोफत शिलाई मशीन योजना पात्रता ( free Sewing Machine Scheme Eligibility | Free Silai Machine yojana Patrata

मित्रानो ही योजना मुख्यत महिलांसाठी आहे तर या योजनेची पात्रता खालीलप्रमाणे आहे.
1) अर्ज करणारी महिला ही भारतीय नागरिक असावी  ( केंद्र योजनेसाठी )
2) आर्थिक दृष्ट्या दुर्बल पाहिजे ( उत्पन्न मर्यादा ही 1 लाख 20 हजार पेक्षा जास्त नसावे – फॅमिलीचे )
3) अर्ज करणारी महिला ग्रामीण तसे शहरी हे दोन्ही अर्ज करू शकतात पण वय मर्यादा आहे, 20 ते 40 वर्ष दरम्यानच्या महिला याठिकाणी अर्ज करू शकतात
4) विधवा, अपंग ( दिव्यांग ) महिला असतील तर त्यांनी त्यांचे कागतपत्रे जमा करावी.

मोफत शिलाई मशीन योजना कागदपत्रे ( Important Document Free Silai ( sewing ) Machine Scheme

मोफत शिलाई मशीन साठी खालील कागदपत्रे लागतात, यामध्ये
1) आधार कार्ड
2) रेशनकार्ड
3) रहिवासी पुरावा तहसील दार
4) वार्षिक उत्पन्न दाखला
5) विधवा तसेच अपंग ( दिव्यांग )महिला असल्याचे सर्टिफिकेट
6) मोबाईल क्रमांक
7) शिवणकाम प्रमाणपत्र ( असल्यास द्या )
8) पासपोर्ट फोटो
9) जात प्रमाणपत्र ( असेल तर )

मोफत शिलाई मशीन योजना ऑनलाईन अर्ज कसा करायचा ?

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला www.india.gov.in यामध्ये अर्ज ऑनलाईन पद्धतीने करू शकतात ( केंद्रासाठी ) सध्या सरकारने ऑनलाईन पद्धतीने अर्ज बंद केले आहेत.जर पुन्हा ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू झाले तर त्या संदर्भात माहिती तुम्हाला घेऊन देऊ.
                                             

मोफत शिलाई मशीन योजना ऑफलाईन अर्ज कसा करायचा ?

मोफत शिलाई मशीन योजना या संदर्भात अपडेटेड अर्ज तुम्हाला महिलां व बालकल्याण विभागात मिळेल ( जिल्हा किंवा तालुका ठिकाणी )
किंवा
अर्जाची लिंक खाली आहे तो अर्ज dawnload करून सर्व माहिती व्यवस्थित भरून तो अर्ज तुम्ही तुमच्या जवळच्या पंचायत समिती तसेच जिल्हा परिषदेमध्ये ( महिला व बालकल्याण विभागात ) जमा करायचा आहे.

मोफत शिलाई मशीन साठी निवड प्रक्रिया ?

सर्व पात्रता धारक महिलां कडून अर्ज माघीतल्यानंतर या सर्व अर्जाची छाननी किंवा चौकशी होते. यामध्ये कोणाला जास्त गरज आहे यामध्ये त्यांची लवकर निवड होते. तुम्ही जर या साठी कागदपत्रे तसेच माहिती व्यवस्थित भरली असेल तर तुमची निवड या ठिकाणी 100% होऊ शकते. यासाठी साधारण १ -२ महिने अर्ज केल्यानंतर कालावधी लागू शकतो. जर या कालावधीत म्हणजे अर्ज केल्यापासून  २ महिन्याच्या आत  काही माहिती मिळाली नाही तर या संदर्भात या महिला आणि बाल कल्याण विभागात चौकशी करू शकता.
मोफत शिलाई मशीन घेण्यासाठी अर्ज नमुना या ठिकाणीयेथे क्लीक करा
free silai
free silai machine
www.india.gov.in free silai machine
free silai machine yojana online registration
free silai machine yojana online application form
free silai machine yojana online application form in Maharashtra
free silai machine yojana online application form pdf
free sewing machine scheme
how to apply free sewing machine
मोफत शिलाई मशीन योजना अर्ज
मोफत शिलाई मशीन योजना कागदपत्रे
मोफत शिलाई मशीन योजना पात्रता
मोफत शिलाई मशीन योजना
मोफत शिलाई मशीन
मोफत शिलाई
Aapla Baliraja

Recent Posts

Kalakar Mandhan Yojana 2025 :कलाकारांसाठी खुशखबर ! सरकार देणार दरमहा ₹3150 मदत – लगेच अर्ज करा!

नमस्कार, महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतेच वृद्ध कलाकारांना आर्थिक मदत देण्यासाठी ' कलाकार मानधन योजना '2025…

20 hours ago

जमीन नसलेल्या बेघरांना घरकुलाचा लाभ सर्वात आधी मिळणार शासन निर्देश Jamin Nasalelyana Gharkul Yojana Maharashtra

नमस्कार, आपण घरकुल योजने साठी फॉर्म भरतो आणि घरकुल योजनेचा फॉर्म मंजूर होतो, पण घर…

4 days ago

महिलांसाठी सरकारची पिंक ई-रिक्षा योजना काय आहे ? या योजनेसाठी अर्ज आणि अनुदान तसेच अर्ज कसा करायचा ते पहा ? Pink E-Rickshaw Scheme

नमस्कार "पिंक ई-रिक्षा योजना" हि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले…

2 weeks ago

ड वरून गावांची नावे पहा ?

"ड" अक्षराने सुरू होणाऱ्या 100 गावांची नावे खालीलप्रमाणे: d varun gavachi naave ड वरून गावांची…

4 weeks ago

गाव नमुना 14 म्हणजे काय ? gav namuna 14 online

गाव नमुना 14 (Form 14) हा एक सरकारी दस्तऐवज आहे जो मुख्यत: महाराष्ट्र राज्यातील कृषी…

4 weeks ago

बांधकाम कामगार नोंदणी साठी तालुका सुविधा केंद्र bandhkam Kamgar Taluka Suvidha Kendra

महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने कामगारांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवल्या जातात. कामगारांची नोंदणी, नूतनीकरण, आणि लाभ…

1 month ago

This website uses cookies.