ईश्रम कार्ड वर नोंदणी कृत कामगारांना निधी वाटप संदर्भात शासन निर्णय | e shram card benefits in marathi

ईश्रम कार्ड Eshram Card 

Table of Contents

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भारतातील असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी केंद्र सरकार मार्फत ऑगस्ट 2021 मध्ये ” ईश्रम ” पोर्टल सुरू करण्यात आले, या पोर्टल मार्फत असंघटित कामगारांना नोंदणी केल्यानंतर त्यांना ” ईश्रम स्मार्ट कार्ड ” सरकार मार्फत ऑनलाईन देण्यात येत आहे. या पोर्टल वर जर नोंदणी केल्यास योजना सोबत 2 लाख रुपयां पर्यंत मदत इन्शुरन्स सुद्धा सरकार मार्फत किंवा या पोर्टल मार्फत दिले जात आहे. नुकतीच श्रम आणि रोजगार मंत्रायलायने रिपोर्ट काढला आहे, या पोर्टल वर आता पर्यंत 25 कोटी पेक्षा जास्त लोकांनी यावर नोंदणी केली आहे.

हेही वाचा :  आता 10 लाखा कर्ज ते पण कोणतेही हमी शिवाय, हे कागदपत्रे घेऊन अर्ज करा

ईश्रम कार्ड पोर्टल हे असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्यांचा एक डेटाबेस संकेतस्थळ (Website ) आहे. यामध्ये तुम्ही नोंदणी केल्यानंतर तुम्हाला एक केशरी कलर चे स्मार्ट कार्ड ईश्रम नावाचे दिले जाणार आहे. यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड आणि बँक अकाउंट असणे आवश्यक आहे.

 

शासन निर्णय महाराष्ट्र ( 03 नोव्हेंबर 2023 ) ईश्रम कार्ड Eshram Card Shasan Nirnay Maharashtra

 

03 नोव्हेंबर 2023 महाराष्ट्र शासन निर्णयानुसार माहिती – असंघटित क्षेत्रात जे कामगार आहेत त्यांना सामाजिक सुरक्षा पुरविण्या संदर्भात कामगारांचा एक डेटाबेस तयार केला जात आहे. या संदर्भात केंद्र शासनाने निर्णय घेतला आहे.  कोरोना महामारी मध्ये असंघटित कामगारांना पैसे पाठविण्यासाठी सरकार कडे असा कोणताही डेटा बेस नव्हता, त्यामुळे सरकारला इच्छा असूनही यावर पैसे पाठवता आले नाही असे सरकार मार्फत सांगण्यात येत आहे. असंघटित कामगार यांच्या डेटा बेस ची उणीव जाणवू लागल्यामुळे केंद्र सरकार ने ऑगस्ट 2021 पासून ईश्रम कार्ड पोर्टल सुरू केले आहे.

हेही वाचा :  नमो शेततळे अभियान | Namo Shettale Abhiyan हे 11 सूत्री कार्यक्रमाअंतर्गत राबविणेबाबत

या ईश्रम कार्ड पोर्टल वर ज्या असंघटित कामगारांनी नोंदणी केली आहे, तसेच या कार्ड मार्फत ज्या अनेक योजना आहे तसेच यावर ज्यांनी इन्शुरन्स साठी दावा केला आहे ते सर्व दावे आणि तक्रारी निकाली काढण्यासाठी आणि ज्या तक्रारी अनेक राज्यांना प्राप्त झाले आहेत ते सर्व निकाली काढण्यासाठी केंद्र सरकारने काही मार्गदर्शक तत्वे व या संदर्भात कार्यप्रणाली तयार आणि जारी केली आहे. हे दावे निकाली काढण्यासाठी एक X-ग्रेशिया ( सानुग्रह ) मोड्यूल कार्यान्वित केले जाणार आहे.

हया मॉड्युल चे काम सुरळीत चालवण्यासाठी या मॉड्युल अंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात एक जिल्हास्तरीय समिती स्थापन केली जाईल. या समिती मध्ये जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे अध्यक्ष स्थानी असणार आहे, सोबत त्यांनी नियुक्त केलेले जिल्हयातील अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी हे सदस्य सचिव असतील आणि कामगार अधिकारी या मॉड्युल मध्ये सदस्य असणार आहे.

हेही वाचा :  पी एम किसान : नाहीतर 14 लाख शेतकऱ्यांना मिळणार नाही येणार 13 वा हप्ता | Pm kisan Adhar ekyc | e kyc adhar P M kisan sanmman Nidhi |

ईश्रम कार्ड साठी पात्रता

1. भारताचा नागरिक असावा ही प्रमुख अट आहे.
2. यामध्ये फक्त असंघटित कामगारच नोंदणी करू शकतील ( उदा – फेरी वाले, शेतकरी, गवंडी, खोदकाम, न्हावी, सुतार, मजुरी करणारे, चांभार, रिक्षा चालवणारे, ड्रायव्हर, कोळी, भाजी विक्रेता, बांधकाम कामगार, आदी सर्व
3. वय 16 ते 59 दरम्यान पाहिजे.
4. EPPO/ESIC मध्ये किंवा NPS मध्ये नोंदणी नसलेली पाहिजे.

ईश्रम कार्ड वर नोंदणी साठी काय आवश्यक आहे ?

1. आधार कार्ड आवश्यक आहे
2. आधार कार्ड ला लिंक असणारा मोबाईल नंबर
3. Ifsc code सहित बँक अकाउंट नंबर

 

 

या योजनेचा फॉर्म आणि शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लीक करा

WhatsApp aapla Baliraja

Leave a Comment