आरबीआय बँकेची बँकेविरुद्ध एकात्मिक लोकपाल योजना : बँक त्रास असेल तर आता बँकेविरुद्ध दाखल करा तक्रार ; RBI Ekatmik Lokpal Yojana

आरबीआय बँकेची बँकेविरुद्ध एकात्मिक लोकपाल योजना : बँक त्रास असेल तर आता बँकेविरुद्ध दाखल करा तक्रार ; RBI Ekatmik Lokpal Yojana

Table of Contents

RBI EKATMIK LOKPAL YOJANA 2021 DETAIL
मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
Telegram Group Join Now

 

मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी ‘ दि रिझर्व्ह बँक एकत्रित लोकपाल योजना 2021 ही आभासी रीतीने उदघाटन 12 नोव्हेंबर 2021 रोजी केले. यामध्ये तीन योजना एकत्रित केल्या 1) बँकिंग लोकपाल योजना 2006, 2) बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांसाठीची लोकपाल योजना 2018 आणि 3) डिजिटल व्यवहारासाठी लोकपाल योजना 2019.

 

 

फायदा या योजनेचा – आरबीआय बँकेची बँकेविरुद्ध एकात्मिक लोकपाल योजना !

 

अ)  आता कोणत्या योजनेखाली लोकपालकडे तक्रार करायची किंवा शोध तक्रारदाराने घेण्याची आवश्यकता नाही

 

ब) या योजनेत विहित केलेल्या यादीसह कोणतीही तक्रार फेटाळळी जाणार नाही

 

क) या नवीन योजनेमुळे प्रत्येक विभागीय कार्यालय क्षेत्र ( अधिकार क्षेत्र ) काढून टाकण्यात आले.

 

ड) कोणत्याही भाषेत किंवा email द्वारे तक्रारी स्वीकारण्यासाठी एक केंद्र स्थापन केले आहे.

 

इ) समाधान कारक व वेळेत कागदपत्रे न सादर केल्यामुळे लोकपालने निर्णय दिल्यास विनियमित संस्था किंवा बँक अपील करण्याचा अधिकार पुन्हा असणार नाही.

 

 

 
 

अपील कसे करणार ?

 

सुरुवातीला https://cms.rbi.org.in यावर जाऊन तक्रार दाखल करू शकता. ( File Complaint मध्ये जाऊन ) यामध्ये खास विशिष्ट email मार्फत किंवा प्रत्यक्ष रीतीने तसेच पोस्टाने ( ‘केंद्रियकृत स्वीकार व प्रक्रिया केंद्र’ भारतीय रिझर्व्ह बँक 4 था मजला सेक्टर 17 चंदीगड -160017 या पत्ता वर तुम्ही विहित अर्जसाह ( नमुन्यात ) पाठवू शकता.

 

 

 

आरबीआय कडे कोणत्या तक्रारी दाखल करू शकता ?

 

1. निर्धारित तासाचे पालन न करणे

2. पैसेकंन भरणे तसेच आवक पाठवण्यास विलंब करणे.

3.ग्राहकाला सूचना न देता खात्या मधून शुल्क काढणे.

4. पैसे न भरणे

5. एटीएम तसेच डेबिट कार्ड मधील त्रुटी 

6. पेन्शन ही खात्यादाराला न देणे

7. बँकेचे तसेच कोणत्याही वित्तीय संस्थेचे कोणत्याही प्रकारचे उल्लंघन यामध्ये येतात

 

 

वारंवार विचारले जाणारे प्रश्न 

1. आरबीआय तक्रार केल्यास स्थिती कसे जाणावी ?

 RBI लोकपाल या वेबसाईट https://cms.rbi.org.in यावर जाऊन अर्जाची स्थिती तुम्ही पाहू शकता

 

 

2. RBI ने कोणत्या वर्षी नवीन एकत्रित  लोकपाल योजना आणली ?

आरबीआय ने नवीन एकत्रित किंवा एकात्मिक लोकपाल योजना ही 2021 मध्ये आणली त्याचे उदघाटन नरेंद्र मोदी यांनी केले.

 

 

3. RBI किती डेप्युटी गव्हर्नर आहेत ?

RBI मध्ये एक गव्हर्नर आणि 4 डेप्युटी गव्हर्नर आहेत

 

 

4. RBI मध्ये तक्रार कोठे दाखल करावी ?

आरबीआय मध्ये या वेबसाईट मध्ये जाऊन https://cms.rbi.org.in ऑनलाईन पद्धतीने File complaint या section मध्ये जाऊन तक्रार दाखल करू शकता

हेही वाचा :  अवकाळी तसेच गारपिटीने पिकांचे नुकसान, साडे सात हजार हेक्टर क्षेत्र बाधित : Avkali Ani Garpitine Nuksaan Maharahstra
WhatsApp aapla Baliraja

1 thought on “आरबीआय बँकेची बँकेविरुद्ध एकात्मिक लोकपाल योजना : बँक त्रास असेल तर आता बँकेविरुद्ध दाखल करा तक्रार ; RBI Ekatmik Lokpal Yojana”

Leave a Comment