या गावातील ग्रामपंचायतीने गावातील प्रत्येक घरावरच ‘क्यूआर कोड’ लावला – सगळीकडे चर्चा च चर्चा !

 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

या चेंढरे गावाची चर्चा राज्यभर झाली. आणि  महाराष्ट्रीतील पहिली ग्रामपंचायत ठरली 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
Telegram Group Join Now

 

CHENDHARE ALIBAG VILLAGE TODAY NEWS 

 

                                    अलिबाग मधील चेंढरे ग्रामपंचायतीने प्रत्येक घरावरच क्यू आर कोड‘ लावला. ऑनलाईन ही सुविधा देणारी पहिली ग्रामपंचायत ठरली. घरावर लावलेला क्यूआर कोड स्कॅन करा आणि पाणीपट्टी, घरपट्टी किंवा इतर जे सेवा ना शुल्क लागतात ते सर्व आता ऑनलाईन च भरा आणि त्याची पावती सुद्धा ऑनलाईन च मिळवा. अशी सेवा उपलब्ध करणारी चेंढरे ग्रामपंचायत ही राज्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली.

 

तुम्हाला माहितीच असेल की वाढत्या नागरीकरणामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पाणी पट्टी आणि घरपट्टी वसूल करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे या अडचणी ‘ चेंढरे ग्रामपंचायतीच्या लक्षात आले. त्यामुळे चेंढरे ग्रामपंचायतीने ही सुविधा ऑनलाईन करण्याचा निर्धार केला, ही सेवा ‘अमृत ग्राम डिजिटल कर प्रणालीद्वारे हे काम पूर्ण होणार असून, या द्वारे या पाणीपट्टी आणि घरपट्टी वसुली मध्ये आता पारदर्शता येणार आहे.त्यामुळे प्रत्येक घराचे सर्वेक्षण करून त्या घरावर क्यू आर कोड बसविण्यात येणार आहे.

 

आता स्कॅन करा आणि कर ( पाणीपट्टी आणि घरपट्टी ) भरा

 

              तुम्हाला माहीतच असेल ग्रामपंचायती मार्फत प्रत्येक घरावर बिल्ला ( लेबल ) लावला जातो. त्यावर घराची माहिती असते किंवा घर क्रमांक असतो. या द्वारे आधी घर क्रमांक नुसार कुटुंब प्रमुखाचे नाव असायचे( जागा असायची) आणि या नुसारच पाणीपट्टी आणि घरपट्टी वसूल व्हायची.. पण आता चेंढरे ग्रामपंचायतीने प्रत्येक घरावर क्यू आर कोडचे लेबल लावले आहे. या क्यू आर कोडलाच स्कॅन करून तुम्ही घर बसल्या पाणीपट्टी आणि घरपट्टी भरायची आहे.महत्वाचे म्हणजे जे सर्व खातेदार आहे त्यांचा डेटा अचूकपणे अपडेट ठेवला जाईल.

 

चेंढरे गावाची ( ग्रामपंचायतीची डिजिटल करप्रणाली :

 

                         चेंढरे गावचे सरपंच स्वाती पाटील यांनी मंगळवारी ( 24 जाने 2023 ) रोजी अनौपचारिक पणे ही प्रणाली कार्यान्वित केली . 

– गावाचा दिवसेदिवस विस्तार वाढत असून पाणी पट्टी आणि घरपट्टी वसूल करताना ग्रामपंचायत कर्मचारी याना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो. ही समस्या सोडवण्याची कोकणातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग मधील चेंढरे ग्राम पंचायतीने ही ही सुविधा ‘अमृत ग्राम डिजिटल करप्रणाली’ सुरू केली. या साठी या ग्राम पंचायतीने विशेष सॉफ्टवेअर चा वापर केला आहे.

 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Sonu Nigam breaks down in tears after performing at the Ayodhya Ram Mandir! “I have nothing more to say; my tears will speak for me.” Jaggery Tea Benefits: ग्रीन टीपेक्षाही फायदेशीर आहे गुळाचा चहा; हिवाळ्यात नक्की सेवन करा Tulsi Vivah 2023 : का करतात तुळशी विवाह यावर्षी कोणत्या तारखेला आहे पहा ?