नमस्कार, महाराष्ट्र शासनाने 2 फेब्रुवारी 2024 रोजी एक जीआर काढून लाखो शेतकरी बांधवांना एक दिलासा दिला असे म्हणता येईल . आता सरकारने ‘ मोजणी क पत्र ‘ ही आता जी.आय. एस. आधारित होणार आहे.
ई मोजणी व्हर्जन 2.0 GR E mojani Version 2.0 Maharashtra
मोजणी क पत्रावर आता अक्षांश आणि रेखांश नमूद करून ही प्रत ऑनलाईन मिळणार आहे. जर कोणाला अक्षांश आणि रेखांश आधारित मोजणी प्रत पाहिजे असेल तर ती भूमी अभिलेख यांच्या वेबसाईटवर मिळणार आहे.
सरकारने ही जी.आय. एस. आधारित मोजणी केल्यामुळे / करणार असल्यामुळे अनेक शेतकऱ्याचे असणारे भांडणे ही बंद होणार आहे. त्यामुळे हा जीआर शेतकऱ्यांना अनेक भांडणापासून दिलासा देणारा आहे. तसेच शेतकऱ्याचे होणारे भांडणे बंद होणार आहे कारण यामध्ये वापरली जाणारी जी.आय. एस पद्धत ( अक्षांश आणि रेखांश आधारावर ).
भूमी अभिलेख मा. जमीन महसूल अधी. 1966 कलम 136 या अंतर्गत जमीन धारक व्यक्तीच्या अर्जा नुसार जमिनीची मोजणी करणे त्या जमिनीच्या हद्दी कायम करणे, पोट हिस्सा मोजणी करणे त्यानंतर त्याचे अभिलेख करणे हे कामे होत होते आणि त्यानुसार ‘ मोजणी नकाशा क पत्र ‘ दिले जात होते.
परंतु या नंतर सुध्दा अनेक अडचणी होत्या आप आपसातली जागेवरून भांडणे होत होते. त्यानुसार आता जी.आय. एस. आधारावर आता GNNS ROVER व इलेक्ट्रॉनिक स्टेशन मशीन या मशीन चा वापर होणार आहे त्यामुळे जागेची अक्षांश आणि रेखांश सहित आता प्रत येणार आहे आता याला ई मोजणी व्हर्जन २.० म्हंटले गेले आहे
सुरुवातीला ई मोजणी व्हर्जन 2.0 ही नंदुरबार व वाशिम जिल्ह्यात आणि इतर जिल्ह्यातील प्रत्येकी एका तालुक्यात वापरली गेली. आत्ता संपूर्ण राज्यात ही पद्धत वापरली जाणार आहे.
📝 बातमी पहा : मोदी आवास घरकुल योजना आता विमुक्त आणि भटक्या जमातींना मिळणार आला जीआर
ई मोजणी व्हर्जन 2.0 काय बदल होणार आहे ?
१) यामुळे अक्षांश आणि रेखांश आधारावर मोजणी पत्र मिळणार आहे.
२) ही अक्षांश आणि रेखांश आधारावर असणारी प्रत डिजिटल स्वरूपात भूमी अभिलेख या संकेतस्थळावर असणार आहे.
३) या पद्धती साठी ‘ जी.आय. एस. आधारावर आता G.N.N.S. ROVER व इलेक्ट्रॉनिक स्टेशन मशीन वापरणार आहे यामुळे मोजणी एकदम अक्यूरेट होणार असून वाद विवाद संपणार आहे.
४) मानवी मोजणी मुळे ज्या चुका होत होत्या त्या आता या मशीन द्वारे होणार नाही.
📝 बातमी पहा : घराचं वीजबिल शून्य येणार पंतप्रधान सूर्योदय योजना काय आहे पहा
शासन निर्णय : ई मोजणी व्हर्जन 2.0 ( GR E mojani Varsion 2.0 Maharashtra )
भूमी अभिलेख विभागाकडून खालील मोजणी ही मशीन द्वारे ॲक्युरेट दिली जाणार आहे.
1) जमिनीचे हद्दी कायम करणे.
2) पोट हिस्सा कायम केली जनार.
3) समिलीकरण केले जाणार.
4) बिनशेत .
5) कोर्ट वाटप.
6 ) कोर्ट कमिशन.
7 ) विविध प्रकल्प आधारित मोजणी.
8) इतर भूमी संपादन मोजणी याद्वारे केली जाणार आहे.
ई मोजणी व्हर्जन 2.0 २ फेब्रूवारी २०२४ चा जी आर पाहण्यासाठी येथे क्लिक करा
📝 बातमी पहा : 3 सरकारी योजना ज्या द्वारे मोफत पैसे भेटत जातील Goverment Subsidy Scheme