Pm Vidya Laxmi Yojana 2024 : नमस्कार मित्रांनो केंद्र सरकार झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये नुकतीच एका योजनेची घोषणा करण्यात आली तिचं नाव आहे पीएम विद्या लक्ष्मी योजना ही योजना काय आहे तसेच ही योजना कोणासाठी आहे आणि या योजनेमधून काय लाभ होणार आहे याबद्दल आपण सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत
पीएम विद्या लक्ष्मी योजना या योजनेमार्फत शिक्षण घेण्यासाठी सहजपणे 10 लाख रुपयापर्यंत कर्ज उपलब्ध होणार आहे. यामध्ये काहींना व्याज द्यावा लागणार आहे काहींना द्यावे लागणार नाही यासाठी उत्पन्नाची मर्यादा आहे याबद्दल आपण पुढे माहिती पाहू तसेच याला अटी व शर्ती काय असणार आहेत कोणत्या शिक्षणासाठी लागू होणार आहे याबद्दल माहिती पाहून
पीएम विद्या लक्ष्मी योजना
भारतासारख्या मोठ्या देशांमध्ये आणि विकसनशील देशांमध्ये लोकसंख्या जास्त आणि पर कॅपिटा इन्कम कमी असल्याकारणाने बऱ्याचदा विद्यार्थ्यांना अर्धवट शिक्षण घ्यावे लागते आणि यामुळे विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही तर अशा विद्यार्थ्यांना अपूर्ण शिक्षण पूर्ण करण्यासाठी तसेच उच्च शिक्षण मिळवण्यासाठी केंद्र सरकार मार्फत पीएम विद्या लक्ष्मी योजनेमार्फत दहा लाख रुपये पर्यंत सहज कर्ज उपलब्ध करून देणार आहे
भारतामध्ये किंवा देशातील 860 प्रतिष्ठित टॉप शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घ्यायचा असेल तर त्यांना हे 10 लाख रुपये सहज उपलब्ध होणार आहे जवळजवळ 22 लाख विद्यार्थ्यांना या योजनेमधून लाभ घेता येते यामुळे ज्या विद्यार्थ्यांना यामध्ये मुले किंवा मुली असणार आहे ज्यांना पूर्ण शिक्षण करायचे आहे आणि उच्च शिक्षण करायचे आहे त्यांनाही एक चांगली संधी या ठिकाणी म्हणता येईल
पीएम विद्या लक्ष्मी योजना माहिती
योजना | पीएम विद्यालक्षमी योजना |
सुरू | 2024 -2025 |
लाभ | विद्यार्थ्यांना 10 लाख रुपये ची मदत किंवा कर्ज |
योजना कोणी सुरू केली | केंद्र सरकारने |
फायदा | ज्या विद्यार्थ्यांचे अर्धवट शिक्षण राहिले आहे त्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी ही योजना |
अर्ज लिंक | https://www.vidyalakshmi.co.in/Students/ |
अटी व शर्ती
- उच्च शिक्षण घेण्यासाठी लाभ
- मुलांसाठी मुलींसाठी दोघांसाठी योजना आहे
- या योजनेमधून दहा लाख रुपये पर्यंत सहज कर्ज उपलब्ध होणार
- भारतातील 860 प्रतिष्ठित व टॉप उच्च शिक्षण संस्थेमध्ये याचा लाभ होणार
- केंद्र सरकार मार्फत ही योजना लागू होणार
- दहा लाख रुपये पर्यंत कर्ज असणार आहे त्यावर 3 टक्के व्याजदर असेल
- 8 लाखापेक्षा कमी आहे अशांना त्याचा लाभ होणार आहे
पीएम विद्यालक्ष्मी योजनेत कर्ज कसे मिळणार ?
तुम्हाला जर उच्च शिक्षण घ्यायचे असेल आणि पैसे अभावी जर शिक्षण अर्धवट राहत असेल तर ही योजना तुमच्यासाठीच आहे. यासाठी काही महत्त्वपूर्ण स्टेप्स आहेत त्याद्वारे तुम्ही हे पीएम विद्या लक्ष्मी योजना लाभ घेऊ शकता
- पीएम विद्यालक्ष्मी योजना लाभ घेण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला उच्च शिक्षण विभागाच्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावा लागेल
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरल्यानंतर तो मला केंद्र सरकारकडून 75 टक्के पर्यंत क्रेडिट गॅरंटी असेल
- ही ऑनलाईन प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि सुलभ तसेच सोपी आहे
- ज्या कुटुंबाचे उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे त्यांच्या पाल्यांना किंवा त्यांच्या विद्यार्थ्यांना दहा लाखापर्यंत शैक्षणिक कर्ज तीन टक्के व्याजदराने मिळेल त्याशिवाय ज्या कुटुंबाचे उत्पन्न 4.5 लाखापर्यंत आहे त्या विद्यार्थ्यांना या व्याजामधून सूट मिळेल
केंद्र सरकार मार्फत कॅबिनेट मीटिंगमध्ये या पी एम विद्या लक्ष्मी योजनेला मंजुरी देण्यात आली. पीएम विद्या लक्ष्मी योजना ही राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चे पुढचे पाऊल असे मानले जात आहे या योजनेसाठी विविध भागातून शिफारसी आल्या होत्या त्यावर अंमलबजावणी झालेली पाहायला मिळते.