केंद्र सरकारने काढले नवीन पॅन कार्ड 2.o, पहा काय बदल झाले ते पहा ? QR code on pan card free update by union government

केंद्र सरकारने आयकर विभागासाठी “पॅन 2.0” प्रकल्पाची घोषणा नुकतीच केली आहे. या नव्या पॅन कार्ड मध्ये QR कोडसह डिजिटल सुविधा प्रदान करण्यात येणार असून ज्यामुळे करदात्यांसाठी प्रक्रिया अधिक सोपी, वेगवान, आणि सोप्पी होणार आहे.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

या Pan योजनेसाठी सरकार जवळजवळ 1435 कोटी रुपये एवढे खर्च करणार आहे, यामधून सध्याचे PAN किवा TAN 1.0 आहे ती सुधारित  केली जाणार आहे. Qr code Pancard

पॅन 2.0 प्रकल्प काय आहे यामागचा उद्देश ?

Table of Contents

पॅन 2.0 प्रकल्प हे संपूर्णतः पेपरलेस असणार आहे तसेच ऑनलाइन आहे. केंद्रीय मंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या न्यूज मिडिया ला दिलेल्या माहितीनुसार ही एक नवीन प्रणाली असणार आहे जी नागरिकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी चांगली प्रभावी असणार आहे. ” यामध्ये सर्वांसाठी आता एकच पोर्टल असेल, जे Digital सुविधांचे माहिती सुधारणार आहे ” असे त्यांनी म्हटले.

हेही वाचा :  सरकार गरिबांना देत आहे मोफत साडी असा अर्ज करा १०० % मिळणार तुम्हाला Mophat Sadi Yojana Maharashtra

नवीन पॅन कार्डसाठी अर्ज करावा लागेल का ?

जर तुमच्या कडे आधीच पॅन कार्डधारक असाल, तर नवीन पॅनसाठी अर्ज करण्याची आवश्यकता नाही. तुमचा सध्याचा पॅन क्रमांक वैध राहणार आहे. मात्र, नवीन पॅन कार्ड तुमच्यासाठी उपलब्ध करून दिले जाईल.

जुन्या पॅनकार्डचे काय ?

नवीन पॅन कार्ड लागू झाल्यानंतर जुने पॅन कार्ड कचऱ्यात जमा करावे लागेल. मात्र, त्यावरचा क्रमांक कायम राहील, त्यामुळे कोणतीही अडचण होणार नाही. qr code on pan card free update by union government

नवीन पॅन कार्डची वैशिष्ट्ये ?

  1. QR कोड : यामुळे डिजिटल ओळख अधिक सुरक्षित आणि सोपी होईल.
  2. डेटा सुरक्षा : नवीन पॅन डेटा व्हॉल्ट प्रणालीमुळे माहिती पूर्णतः सुरक्षित राहील.
  3. मोफत सेवा : नवीन पॅन कार्डसाठी कोणतेही सरकारी शुल्क आकारले जाणार नाही.

डेटा सुरक्षिततेबाबत खात्री ?

अपग्रेड केलेल्या पॅन कार्डमधील डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी पॅन डेटा व्हॉल्ट प्रणाली विकसित केली जात आहे. त्यामुळे डेटा लीक होण्याची शक्यता कमी होईल, असे आश्वासन देण्यात आले आहे.

हेही वाचा :  Crop insurance : या राज्यात दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांसाठी 1000 कोटी ची तरतूद

पॅन कार्ड म्हणजे काय ?

पॅन (Permanent Account Number) हा दहा अंकी ओळख क्रमांक आहे, जो प्राप्तिकर विभागाकडून दिला जातो. हा दहा अंकी नंबर बँकिंग, आर्थिक व्यवहार, आणि प्राप्तिकराशी संबंधित व्यवहारांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.

सरकारच्या या निर्णयाचा फायदा ?

  • करदात्यांसाठी डिजिटल सुविधा सोपी होईल.
  • तक्रारींचे निवारण लवकर होईल.
  • प्रक्रिया कागदावाचून आणि पर्यावरणपूरक बनेल.

नवीन पॅन कार्डाच्या या सुविधेमुळे देश डिजिटल दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकत आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकासाठी ही अत्यंत उपयुक्त योजना ठरणार आहे.

क्यूआर कोड वैशिष्ट्यासह नवीन ‘पॅन २.०’ची घोषणा

केंद्र सरकारने डिजिटल इंडिया मोहिमेच्या उद्दिष्टांना गती देण्यासाठी आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या उपक्रमाअंतर्गत, विद्यमान पॅन कार्डचा सुधारित प्रकार म्हणजेच QR कोड असलेले नवीन पॅन कार्ड करदात्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हे कार्ड पूर्णपणे विनामूल्य दिले जाणार आहे.

पॅन म्हणजे ‘Permanent Account Number,’ जो भारतीय प्राप्तिकर विभागाकडून करदात्यांना प्रदान केला जातो. हा १०-अंकी अल्फान्यूमेरिक कोड भारतातील आर्थिक व्यवहारांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.

‘पॅन 2.0’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या नव्या सुविधेची घोषणा केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, सध्याचे पॅन क्रमांक पूर्वीप्रमाणेच वैध राहील आणि तो बदलण्याची गरज नाही. त्यामुळे कर भरणार्यांना कोणत्याही तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागणार नाही.

हेही वाचा :  सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण आहे तुम्हाला माहित आहे का ? | Do you know who is the richest Chief Minister in India, Current Issue ?

या नव्या तंत्रज्ञानामुळे आर्थिक व्यवहार अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर होणार असून डिजिटल भारताच्या उद्दिष्टांना अधिक बळकटी मिळणार आहे.

नवीन पॅन कार्ड 2.0 बाबत काही महत्त्वाचे प्रश्न व उत्तरे

1. नवीन पॅन कार्डसाठी मला अर्ज करावा लागेल का?

उत्तर: जर तुमच्याकडे आधीच पॅन कार्ड असेल, तर तुम्हाला नवीन पॅन कार्डसाठी अर्ज करण्याची गरज नाही. तुमचे विद्यमान पॅन क्रमांक वैध राहील आणि तुम्हाला नवीन कार्ड आपोआप दिले जाईल.

2. जुने पॅन कार्ड वापरणे सुरू ठेवता येईल का ?

उत्तर: नाही, नवीन पॅन कार्ड लागू झाल्यानंतर जुने कार्ड रद्द मानले जाईल. मात्र, त्यावरचा क्रमांक कायम राहील, त्यामुळे व्यवहारांसाठी अडचण येणार नाही.

3. नवीन पॅन कार्डमध्ये कोणती वैशिष्ट्ये असतील ?

उत्तर: नवीन पॅन कार्डमध्ये QR कोड, डेटा सुरक्षा प्रणाली, आणि डिजिटल तक्रार निवारण प्रणालीचा समावेश असेल, ज्यामुळे कार्ड अधिक सुरक्षित व उपयुक्त बनेल.

4. नवीन पॅन कार्डसाठी मला पैसे भरावे लागतील का ?

उत्तर : नाही, नवीन पॅन कार्डसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. सरकार ही सेवा मोफत उपलब्ध करून देणार आहे.

5. नवीन पॅन कार्डमधील डेटा सुरक्षित असेल का ?

उत्तर : होय, सरकारने डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी विशेष पॅन डेटा व्हॉल्ट प्रणाली विकसित केली आहे, ज्यामुळे माहिती लीक होण्याचा धोका कमी होईल.

6. पॅन 2.0 प्रकल्पाचा उद्देश काय आहे ?

उत्तर : या प्रकल्पाचा उद्देश म्हणजे पेपरलेस व तंत्रज्ञानाधारित सुविधा पुरवणे, करदात्यांचे काम सोपे करणे, आणि तक्रार निवारण प्रक्रियेत सुधारणा करणे.

7. जर एखाद्याने पॅन कार्ड हरवले, तर त्याला नवीन कार्ड मिळेल का ?

उत्तर: होय, पॅन कार्ड हरवल्यास तुम्ही त्यासाठी तक्रार नोंदवून नवीन कार्ड प्राप्त करू शकता.

8. नवीन पॅन कार्ड वापरण्यास सुरुवात कधीपासून होईल ?

उत्तर : केंद्र सरकारने यासाठी अद्याप नेमकी तारीख जाहीर केलेली नाही. मात्र, लवकरच या प्रकल्पाची अंमलबजावणी होईल.

9. नवीन पॅन कार्ड केवळ डिजिटल असेल का ?

उत्तर : पॅन कार्ड क्यूआर कोडसह प्लास्टिक स्वरूपात उपलब्ध असेल, परंतु डिजिटल पद्धतीने त्याचा वापर करणे अधिक सोयीस्कर ठरेल.

10. पॅन 2.0 प्रकल्पामुळे सामान्य जनतेला काय फायदा होईल ?

उत्तर : नवीन प्रणालीमुळे प्रक्रिया जलद होईल, कागदी काम कमी होईल, आणि तक्रारी जलदगतीने सोडवल्या जातील. शिवाय, डेटा अधिक सुरक्षित असेल, आणि ही सेवा मोफत उपलब्ध असेल.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp aapla Baliraja

Leave a Comment

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now