शौचालय अनुदान योजना 2023 महाराष्ट्र, अर्ज असा करा 12 हजार रुपये मिळवा | Shauchalay Anudan Maharashtra 2023
नमस्कार मंडळी केंद्र सरकार मार्फत अनेक योजना आहेत त्या मार्फत तुम्हाला सरकारची सबसिडी किंवा त्या योजनेसाठी अनुदान भेटते.स्वच्छता संदर्भात केंद्र सरकारने अनेक पावले उचलली आहेत त्यासाठी पूर्ण देशात स्वच्छ भारत अभियान सुद्धा राबविले आहे. मंडळीनो आज आपण स्वच्छ भारत अभियान या अंतर्गत येणारी ‘वैयक्तिक शौचालय अनुदान योजना ‘ याबद्दल माहिती पाहणार आहोत.
वैयक्तिक शौचालय अनुदान योजना !
मित्रानो सर्वांना ग्रामीण तसेच शहरी भागात जे वास्तव्य करतात त्या ठिकाणी शौचालय बांधण्यासाठी केंद्र सरकार मार्फत अनुदान देते. नुकताच 2022 मध्ये शौचालय बांधण्यासाठी या अनुदान चा दुसरा टप्पा ( 2.0 ) चालू झाला आहे. नुकतेच महाराष्ट्रात ‘ महाराष्ट्र पाणी पुरवठा तसेच स्वच्छता विभागद्वारे अर्ज स्वीकारले जातात त्याद्वारे हे अनुदान तुमच्या बँक खात्यावर जमा केले जातात
शौचालय अनुदान मिळवण्यासाठी कोण लाभार्थी आहेत !
– शेतमजूर
– भूमिहीन मजूर
– दारिद्र्य रेषेखालील सर्व कुटुंब
– अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जाती सर्व कुटुंबे
– कुटुंब प्रमुख असणाऱ्या महिला
– दिव्यांग असणारे व्यक्ती
– इतर
शौचालय साठी किती अनुदान मिळते ?
स्वच्छ भारत मिशन 2.0 अंतर्गत प्रत्येक लाभार्थ्यांला जवळजवळ 12,000 रुपये एवढे अनुदान मिळते. जर कुटुंबात कोणी एकाने या योजनेचा फायदा घेतला असेल तर त्या कुटूंबातील इतर व्यक्ती या योजनेसाठी लाभार्थी असणार नाही. फक्त कुटुंबातून एकालाच या योजनेचा फायदा घेत येतो.
शौचालय अनुदान 2.0 मिळवण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे आणि अटी ?
यामध्ये प्रामुख्याने
1. आधार कार्ड लागणार आहे तसेच
2.इमेल आयडी
3. बँक पासबुक
4.मोबाईल नंबर ( Mobile )
5. रहिवासी पत्ता
6. रेशन कार्ड लागणारे आहे
7.पासपोर्ट साईज फोटो
शौचालय अनुदान मिळवण्यासाठी अर्ज कोठे आणि कसा करायचा पद्धत !
मंडळींनो हे शौचालय अनुदान मिळवण्यासाठी 2.0 अंतर्गत अर्ज हा फक्त ऑनलाईन पद्धतीने च करायचा आहे या संदर्भात पुढे त्याची लिंक दिली आहे. ( अनुदान मिळवण्यासाठी येथे क्लीक करा ) या ठिकाणी क्लीक केल्यानंतर सर्व माहिती व्यवस्थित भरा तसेच आधार आणि बँक पासबुक या ठिकाणी अपलोड करा . अश्या प्रकारे अर्ज करून तुम्ही 12 हजार एवढे शौचालय अनुदान मिळवू शकता.
( अनुदान मिळवण्यासाठी येथे क्लीक करा )
- शौचालय अनुदान घेण्यासाठी ऑनलाईन फॉर्म कोठे भरायचा ?