Maharashtra Pithachi girani Yojana application form | महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी
नमस्कार मंडळी महाराष्ट्र सरकार तसेच केंद्र सरकार यांकडून आपल्या सर्वांना विविध योजना येत असतात. अश्या भरपूर योजना आहेत की जे लोकांनपर्यंत पोहचत नाही. यामध्ये शेतकरी योजना असतील, रोजगार योजना असतील, शेत जमीन नसणाऱ्यांच्या योजना असतील किंवा महिलांसाठी प्रामुख्याने योजना असतील. तर हे योजना सहसा लोकांनपर्यंत पोहचत नाही त्यापैकी एक योजना म्हणजे महिलां करिता असणारी महत्वाची मोफत पिठाची ( flour mill ) गिरणी ही योजना होय.
सरकार मार्फत दरवर्षी महिलांकरिता मोफत पिठाची गिरणी योजना निघत असते. यामध्ये प्रामुख्याने उद्देश हा असतो की, ग्रामीण भागातील महिलांना त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मोठ्या प्रमाणावर मदत होत असते.
या पिठाच्या गिरणी घेण्यासाठी लाभार्थी कोण कोण आहेत ?
ही योजना प्रामुख्याने महिलांसाठी आहे. यामध्ये महिला अर्ज करू शकतात, वय मर्यादा 18 ते 60 वर्ष आहे. या संदर्भात अर्ज कोठे करायचा तसेच अर्ज नमुना काय आहे हे सर्व आपण पाहणार आहोत.
आवश्यक कागतपत्रे ( Imp ortant Document for flour mill Maharashtra )
– अर्ज करणारी महिला किंवा मुलगी ही कमीतकमी 12 वी उत्तीर्ण पाहिजे
– सोबत आधार कार्ड पाहिजे
– नमुना 8 अ ( घर नोंदणी )
– अर्ज
– वार्षिक उत्पन्न कुटुंबाचे हे वार्षिक 1 लाख 20 हजार या पेक्षा कमी पाहिजे , दाखला तलाठी किंवा तहसिलदार
– सोबत बँक पासबुक
– वीज बिल
अर्ज कसा करणार ?
हा अर्ज पंचायत समिती मध्ये विहित नमुन्यात भरून जमा करायचा आहे सोबत वरील सर्व कागद पत्रे जोडायचे आहेत.