संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ पेन्शन योजना ! पेन्शन पुढे चालू ठेवण्यासाठी इथून पुढे हेच कागदपत्रे लागतील ! Sanjay Gandhi Niradhar Yojana And Shravanbal Pension Yojana 2024

Sanjay Gandhi Niradhar Yojana And Shravanbal Pension Yojana 2024 : नमस्कार, महाराष्ट्र शासना च्या सामाजिक न्याय व विशेष सहायता विभागामार्फत ” संजय गांधी निराधार योजना ” ही योजना चालवली जाते. यामध्ये जे विधवा महिला आहेत, अपंग आहेत, परित्यक्ता महिला इत्यादी ! त्यांना ही पेन्शन दिले जात आहे. अर्ज करणारे व्यक्ती ही गरीब कुटुंबातील असायला पाहिजे. तरच या योजनेमध्ये अर्ज भरता येणार आहे, तसेच श्रावण बाळ पेन्शन योजना ही योजना सुद्धा महाराष्ट्र शासनाच्या ‘ सामाजिक न्याय व विशेष सहायता विभागामार्फत ‘ चालली जाते. महाराष्ट्रामध्ये ज्यांचे वय हे 65 वर्षापेक्षा जास्त आहे आणि गरीब आहेत त्यांना या योजनेमध्ये अर्ज भरता येणार आहे.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ पेन्शन योजना Sanjay Gandhi Niradhar Yojana And Shravanbal Pension Yojana

Sanjay Gandhi Niradhar Yojana And Shravanbal Pension Yojana 2024 : नुकतेच महाराष्ट्र शासनाकडून एक महत्त्वाचे अपडेट आली आहे. इथून पुढे संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ पेन्शन योजना! ही पेन्शन पुढे चालवण्यासाठी जास्त कागदपत्रे देण्याची आवश्यकता नाही. काही महत्त्वाचे कागदपत्रे दिल्यानंतर तुमची चालू असणारे पेन्शन किंवा तुमच्या घरामध्ये असणारे पेन्शनधारक यांची पेन्शन पुढे चालू राहणार आहे.

हेही वाचा :  पी एम किसान चा 19 वा हप्ता या दिवशी येणार pm kisan 19th installment date

नुकतेच महाराष्ट्र शासनामार्फत मार्च महिन्यामध्ये एक जीआर येऊन गेलेला आहे. या जीआर मध्ये स्पष्ट सांगितले आहे की. संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ पेन्शन योजना या योजनेच्या लाभार्थ्यांना चालू असणारे ” 1500 रुपये/ महिना ” हे आता डीबीटी मार्फत लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर येणार आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाने महा आयटी सोबत करार केलेला आहे. लाभार्थ्यांना महाराष्ट्र शासनाने सुचित केले आहे की लवकरात लवकर त्यांनी त्यांचे बँक खाते हे आधार कार्डशी जोडावे ( आधार सीडींग Adhar seeding करावे ).

संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ पेन्शन योजना पुढे चालू ठेवण्यासाठी एप्रिल महिन्यात द्यायचे महत्त्वाचे कागदपत्रे Sanjay Gandhi Niradhar Yojana And Shravanbal Pension Yojana submit Document

मित्रांनो, सुरुवातीला तुम्हाला अनेक प्रकारचे कागदपत्रे द्यावे लागत होते. आता सरकारने ते कागदपत्रे कमी करून काही मोजकेच कागदपत्रे देऊन तुम्ही हे महाराष्ट्र शासनाची पेन्शन पुढे चालू ठेवू शकता. कागदपत्रांची माहिती खालील प्रमाणे.

  1. आधार कार्ड.
  2. मोबाईल नंबर ( आधार कार्डशी लिंक असलेला )
  3. बँक पासबुक.
हेही वाचा :  नमो शेततळे अभियान | Namo Shettale Abhiyan हे 11 सूत्री कार्यक्रमाअंतर्गत राबविणेबाबत

ही महत्त्वाची कागदपत्रे देऊन ( तलाठी कार्यालयात ) तुम्ही पेन्शन पुढे चालू ठेवू शकता.

संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ पेन्शन योजना नवीन अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे Sanjay Gandhi Niradhar Yojana And Shravanbal Pension Yojana New Registration Important Document

तुम्हाला जर संजय गांधी निराधार योजनेसाठी किंवा श्रावण बाळ पेन्शन योजनेसाठी नवीन अर्ज करायचा असेल तर तुम्ही अर्ज करू शकता !. नवीन अर्ज करण्यासाठी काय महत्त्वाचे कागदपत्रे आहेत त्यावर अधिकाराच्या सह्या घेऊन तुम्ही या पेन्शन योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात. या पेन्शन योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी काही प्रमुख अटी आणि शर्ती आहेत तर त्या संदर्भात आपण माहिती पाहू.

  • महाराष्ट्राचा रहिवासी पाहिजे.
  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • मतदान कार्ड
  • बँक पासबुक
  • गरीब कुटुंबातील असल्याचे प्रमाणपत्र किंवा उत्पन्नाचा दाखला.
  • तलाठी चौकशी अहवाल.
  • अर्ज करणारे व्यक्तीच्या कुटुंबातील मुलांची आर्थिक परिस्थिती अहवाल ( संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना, इंदिरा गांधी वृद्ध काळ पेन्शन योजना )
  • दाखला ( विधवा असल्याबाबत, घटस्फोटीत असल्याबाबत, अपंग असल्याबाबत, परित्याक्ता असल्याबाबत )
  • रहिवासी स्वयं घोषणापत्र .. इत्यादी.
हेही वाचा :  शासन आपल्या दारी योजना : जत्रा शासकीय योजनांची नवीन उपक्रम Shasan aplya Dari Jatra Shaskiy Yojanachi
Sanjay Gandhi Niradhar Yojana And Shravanbal Pension Yojana 2024
Sanjay Gandhi Niradhar Yojana And Shravanbal Pension Yojana 2024
मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ पेन्शन योजना, इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना या योजनेसाठी अर्ज कोठे करणार Sanjay Gandhi Niradhar Yojana And Shravanbal Pension Yojana Application

संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ पेन्शन योजना आणि इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना तुम्हाला जर या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर खालील काही स्टेप्स आहेत त्या फॉलो करा आणि अर्ज करा.

  1. संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ पेन्शन योजना इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही तुमच्या भागातील जिल्हाधिकारी कार्यालय/तालुका तहसील कार्यालय/किंवा तुमच्या भागातील तलाठी कार्यालय या कार्यालयाला भेट द्या. तेथे अर्जाची मागणी करा.
  2. अर्ज मिळवल्यानंतर त्यामध्ये असणाऱ्या सर्व अटी व शर्ती वाचा, त्यानंतर तो अर्ज भरा. अर्ज भरल्यानंतर ते अर्ज सोबत इतर महत्त्वाचे कागदपत्रे जोडा ( यादीवर दिली आहे ).
  3. अर्ज आणि त्याला जोडलेले सर्व कागदपत्रे घेऊन तुम्ही तुमच्या भागातील तलाठी कार्यालय या ठिकाणी जा. त्यांना हा अर्ज दाखवा. अर्जावर आवश्यक ठिकाणी त्यांच्या सह्या घ्या. अर्जावर सह्या झाल्यानंतर तो अर्ज घेऊन तुम्ही सेतू केंद्रामध्ये जाऊ शकता.
  4. सेतू केंद्रामध्ये गेल्यानंतर हा ऑफलाईन चा अर्ज तुम्ही त्यांच्याकडून ऑनलाइन करून घ्या आणि त्याची रिसीट घ्या. ती रिसीट फॉर्म ला जोडा. जोडल्यानंतर पुन्हा तो फॉर्म घेऊन तुम्ही तलाठी कार्यालयात येऊन त्यांच्याकडे द्या.
  5. तलाठी अधिकारी हा अर्ज संजय गांधी विभाग तहसील यांच्याकडे देतील. त्यानंतर काही दिवसातच तुमचा हा अर्ज मंजूर झाला आहे म्हणून तुम्हाला एक पोस्टा मार्फत लेटर येईल. त्यानंतर तुम्हाला ही पेन्शन लागू होणार आहे.

अशाप्रकारे या विविध स्टेप्स मार्फत तुम्ही नवीन अर्ज करू शकता आणि पेन्शन मिळू शकता.

WhatsApp aapla Baliraja

Leave a Comment