गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना | Galmukt Dharan Galyukt Shivar New Yojana |

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना | Galmukt Dharan Galyukt Shivar New Yojana



                 मित्रानो ‘ गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना ( Galmukt dharan ani galyukt shivar yojana ) महाराष्ट्र सरकार मार्फत ( मृदा व जलसंधारण विभाग मार्फत ) दि. 16 जानेवारी 2023 या संदर्भात नवीन जीआर ( GR ) आला.  (जीआर पहा – GR Link  ) यामध्ये संगीतले आहे की 



‘ ग्राम विकास व जलसंघारण विभाग, शासन निर्णय दिनांक ०६ मे, २०१७ अन्वये “गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” योजना राबविण्यात आली होती. सदर योजनेची मुदत मार्च, २०२१ अखेरिस संपलेली असल्याने सदर योजना आहे त्या स्वरुपात राबविण्याबावतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता असे त्यामध्ये उल्लेख आहे महत्वाचे म्हणजे आता  शासन निर्णय असा आहे की,  मृद व जलसंधारण विभागाच्या अखत्यारित असणाया जलसाठ्यातील गाळ काढणे व शेतात वापरणे याकरिता “गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” योजना पुढील ३ वर्षाकरीता राबविण्यास या शासन निर्णयाव्दारे मान्यता प्रदान करण्यात येत आहे.म्हणजे या गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेला  ( Galmukt dharan ani galyukt shivar yojana ) 3 वर्षाची मुदतवाढ दिली आहे. मार्च 2021 पासून तीन वर्षे 2024 राहील असे गृहीत या ठिकाणी धारूयात .. चला तर या योजने संदर्भात अधिक माहिती पाहू.

 

          शेतकरी बंधूनो महाराष्ट्रात अनेक डोंगरे आणि नदी नाले आहेत.. प्राकृतिक दृष्टया महाराष्ट्र हा धरणासाठी ( कोकण ते पूर्व महाराष्ट्र ) पूर्ण विकसित आहे, त्यादृष्टीने महाराष्ट्र सरकारने अनेक धरणांची निर्मिती सुद्धा केली आहे.या धरणामध्ये अनेक नद्यांमधून पाणी साठा येत असतो तर या पाण्याबरोबर नदी गाळ सुद्धा ( सुपीक मृदा दगड गोटे) वाहून आणत असते, त्यामुळे धरणाची ( नदी -नाले सुद्धा ) जी खोली असते ती दरवर्षी भरत असते. यामुळे या धरणात पाणी साठा खूप कमी बसायला लागला आहे. धरणात असणारी मृदा ही खूप सुपीक असते आणि ही लागवडी साठी आपण वापरू सुद्धा शकतो, म्हणून महाराष्ट्र सरकारने ही योजना आणली याद्वारे धरणातील माती सुद्धा काढली जाईल आणि ही माती शेतीला सुद्धा वापरता येईल… त्यामुळे ही योजना सरकार आणि शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरत आहे.

 



सुरुवातीला ही योजना 6 मे 2017 पासून 4 वर्षासाठी सुरू केली होती त्यानंतर पुन्हा आता नवीन GR नुसार मुदतवाढ दिली आहे.

या योजनेचे फायदे ( गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना ) – Galmukt Dharan Yojana And Galyukt Shivar Yojana



गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेमुळे  धरणातील जलसाठ्या ची  पुनर्स्थापना होणार त्याबरोबर शेतीला हा गाळ वापरण्यात येईल. धरणातील गाळ जर काढला तर जलसाठा वाढेल , शेतीसाठी मुबलक पाणी पुरवठा वाढेल सोबत हा गाळ ( सुपीक मृदा ) शेतीला खूप फायदेशीर आहे. त्यामुळे शेती साठी लागणाऱ्या खताच्या खर्चात सुमारे 50% पर्यंत घट होणार आहे.

 



या योजनेची प्रमुख वैशिष्टये पुढीलप्रमाणे आहेत ( गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार )

 

1.प्रमुख म्हणजे स्थानिक शेतकऱ्यांचा सहभाग :- या योजनेमध्ये स्थानिक शेतकऱ्यांनि त्यांच्या शेतामध्ये ते स्वखर्चनि गाळ वाहून नेण्यास तयार असणे ही प्राथमिक अत्यावश्यक स्वरुपाची अट घातली आहे

2. यामध्ये खाजगी व सार्वजनिक भागिदारी असेल :- गाळ उपसण्याकरिता आवश्यक असलेली यंत्रसामुग्री व इंधनावरील खर्च शासनाकडून तसेच सीएसआर च्या माध्यमातून उपलब्ध होणाया निधीमधुन करण्यात येणार आहे.

3. यात अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर :- या योजनेअंतर्गत करण्यात येणाया कामांचे जीओ टॅगिंग, योजनेची संगणक प्रणालीवर माहिती संकलित करणे इत्यादी स्वरुपाची कार्यवाही करण्यात येईल .

4. संनियंत्रण व मुल्यमापन करणे : – या योजनेअंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांचे स्वतंत्रपणे त्रयस्थ यंत्रणेमार्फत मूल्यमापन करण्यात येणार आहे.



5. यामध्ये २५० हेक्टर पेक्षा कमी लाभक्षेत्र असलेल्या व ५ वर्ष पेक्षा जुन्या तलावांना प्राधान्यक्रम राहील. 

 

6. या मध्ये  केवळ गाळ उपसा करण्यास परवानगी राहील व वाळू उत्खननास पुर्णत: बंदी असेल.



7. या योजनेचे अमलबजावणी अधिकारी याची जबाबदारी उप विभागीय अधिकारी (प्रांत), महसूल विभाग यांचेवर सुपूर्द करण्यात येत आहे.

Galmukt Dharan Ani Galyukt Shivar Yojana :

 

इलेकट्रॉनिक्स माध्यमांद्वारे सनियंत्रण ( Process कशी असणार या योजनेसाठी ?

 

1. मागणीपत्र ऑनलाईन (onne) सादर करणे:- जलसंचारण विभागाने एक ऑनलाईन (onirne) यंत्रणा संकेतस्थळाद्वारे (website) तयार करुन कोणत्याही गांवातून त्यांचे मागणीपत्र

शेतकऱ्यांच्या थेट ऑनलाईन भरता येईल अशी सुविधा निर्माण करावी त्थासाठी मागणी पत्राचा विहित नमुना प्रसिद्ध करावा.

2. जीओ टॅगिंग :- जे धरण गाळ काढण्यासाठी अंतिम केले आहे, त्याचे जलयुक्त शिवार अभियान मध्ये अवलंबिण्यात आलेल्या पद्धतीनूसार जिओ टॅगिंग करण्यात यावे.



3.  युनिक जीओ आयडी :- प्रत्येक धरणाला एक एकमेव असा आय.डी. (ओळख क्रमांक) असावा जो अक्षांक्ष व रेखांशवर आधारीत असावा ज्या अन्वये त्याच त्याच धरणाच्या कामाची मंजुरीची व कार्यान्वयनाची पुनरावृत्ती टाळता येईल.

4. मोबाईल अप्लिकेशन आधारित सुविधा :- कोणीही सर्वसामान्य मनुष्य हे डाऊनलोड करुन घेऊन कोणत्याही धरणाची माहिती उपलब्ध करुन घेऊ शकेल एवढी पारदर्शकता यात असावी.

5.  काम सुरु करण्यापुर्वी, चालू असतांना व काम पुर्ण झाल्यानंतरचे डिजीटल छायाचित्र अपलोड करावे, जेणेकरुन अंतर्गत व्यवस्थेत प्रभावी अंमलबजावणी करता येईल.



या योजने संदर्भात शासन निर्णय येथे पहा ( प्रमुख ) :

 

पाहील GR ( शासन निर्णय ) : – येथे क्लीक करा ( 6 मे 2017 ) 

दुसरा GR ( शासन निर्णय ) :- येथे क्लीक करा. ( 16 जानेवारी 2023 )

 

या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा : https://wcdmh.mahaonline.gov.in/Login/Login

 

FAQ Questions :



1. गाळमुक्त धारण आणि गाळयुक्त शिवार योजना ( Galmukt dharan and galyukt shivar yojana scheme ) काय आहे ?

 ही योजना महाराष्ट्र सरकारच्या जलसंधारण विभागाची आहे. या मध्ये स्वतः किंवा लोकसहभागातून धरणातील किंवा तलावातील गाळ काडून शेतीला स्वखर्चाने उपलब्ध केला जातो.

 

2. गाळमुक्त धारण आणि गाळयुक्त शिवार योजना ( Galmukt dharan and galyukt shivar yojana ) अर्ज कसा करावा ?

 गाळमुक्त धारण आणि गाळयुक्त शिवार योजना ( Galmukt dharan and galyukt shivar yojana) योजनेसाठी अर्ज करण्यासाठी https://wcdmh.mahaonline.gov.in/Login/Login या वेबसाईट येऊन अर्ज करावा ( स्वतः किंवा एकत्र अर्ज करू शकतो)



3. गाळमुक्त धारण आणि गाळयुक्त शिवार योजना ( Galmukt dharan and galyukt shivar yojana) अर्ज करण्याची मुदत वाढवली आहे का ?

 गाळमुक्त धारण आणि गाळयुक्त शिवार योजना ( Galmukt dharan and galyukt shivar yojana) या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली आहे. मार्च 2021 नंतर आता 3 वर्ष मुदत वाढवली आहे.



Aapla Baliraja

Recent Posts

Kalakar Mandhan Yojana 2025 :कलाकारांसाठी खुशखबर ! सरकार देणार दरमहा ₹3150 मदत – लगेच अर्ज करा!

नमस्कार, महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतेच वृद्ध कलाकारांना आर्थिक मदत देण्यासाठी ' कलाकार मानधन योजना '2025…

2 months ago

जमीन नसलेल्या बेघरांना घरकुलाचा लाभ सर्वात आधी मिळणार शासन निर्देश Jamin Nasalelyana Gharkul Yojana Maharashtra

नमस्कार, आपण घरकुल योजने साठी फॉर्म भरतो आणि घरकुल योजनेचा फॉर्म मंजूर होतो, पण घर…

3 months ago

महिलांसाठी सरकारची पिंक ई-रिक्षा योजना काय आहे ? या योजनेसाठी अर्ज आणि अनुदान तसेच अर्ज कसा करायचा ते पहा ? Pink E-Rickshaw Scheme

नमस्कार "पिंक ई-रिक्षा योजना" हि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले…

3 months ago

ड वरून गावांची नावे पहा ?

"ड" अक्षराने सुरू होणाऱ्या 100 गावांची नावे खालीलप्रमाणे: d varun gavachi naave ड वरून गावांची…

3 months ago

गाव नमुना 14 म्हणजे काय ? gav namuna 14 online

गाव नमुना 14 (Form 14) हा एक सरकारी दस्तऐवज आहे जो मुख्यत: महाराष्ट्र राज्यातील कृषी…

3 months ago

बांधकाम कामगार नोंदणी साठी तालुका सुविधा केंद्र bandhkam Kamgar Taluka Suvidha Kendra

महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने कामगारांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवल्या जातात. कामगारांची नोंदणी, नूतनीकरण, आणि लाभ…

3 months ago

This website uses cookies.