प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्लीतील कर्तव्यपथ वर झालेल्या पथ संचलनात ‘ महाराष्ट्राने साडे तीन शक्ती पीठे आणि नारी शक्ती ‘ या नवीन संकल्पनेवर आधारित नवीन चित्ररथ यावर्षी ( 2023 प्रजासत्ताक दिना निमित्त ) सहभागी झाला होता. काल म्हणजे 30 जानेवारी 2023 रोजी संरक्षण मंत्रालयाच्या वतीने महाराष्ट्राच्या या ‘( साडे तीन पीठे व नारीशक्ती ) चित्ररथा ला सर्वोत्तम चित्ररथामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक जाहीर केले आहे. ( News Link ) या चित्र रथ महाराष्ट्रातील समस्थ महिला शक्तीला समर्पित होता. आता दुसऱ्या क्रमांकाचे पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे महाराष्ट्रातील सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अभिनंदन केले आहे.
यावर्षी सहभागी झालेल्या चित्ररथामध्ये उत्तराखंड च्या चित्र रथाला पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक, तर दुसरे महाराष्ट्राचे आणि तिसरे उत्तर प्रदेश च्या चित्ररथाला पारितोषिक मिळाले. आज या ( 31 जानेवारी 2023 ) रोजी नवी दिल्ली येथे भारताचे संरक्षक राज्यमंत्री अजय भट्ट यांच्या हस्ते या परितोषिकांचे वितरण होणार आहे. महाराष्ट्रातील सांस्कृतिक संचालक हे आज पारितोषिक स्वीकारतील.
दरवर्षी दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिना निमित्त पथ संचलनात विविध राज्याच्या संस्कृतीचे प्रदर्शन करणारे चित्ररथ या पथ संचलनात संचलित ( प्रदर्शित ) होत असतात. यावर्षी महाराष्ट्राने नारीशक्ती या अशयाखाली “महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठे व नारीशक्ती ” हा विषय निवडून यामध्ये लोककला आणि मंदिर शैलीचा वारसा दाखविण्याचाही या संकल्पनेतून प्रयत्न करण्यात आला होता. अतिशय दिमाखदार व आकर्षक पद्धतीने हा चित्ररथ पुन्हा यावर्षी सुद्धा प्रदर्शित करण्यात आला.
या साडे तीन शक्तिपीठे व नारीशक्ती संकल्पनेत ‘तुळजापूरची आईभवानी, कोल्हापूरची लक्ष्मीमाता, माहूरची रेणुका माता आणि वणीची शप्तशृंगी माता यांच्या विलोभनीय प्रतिकृती यावर्षी चित्ररथावर सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. संबळ वाजवणारा गोंधळी हा देवीशी निगडित असल्याने हा लोककलाकार भव्य स्वरूपात दर्शविण्यात आला होता. या चित्ररथासाठी प्रसिद्ध कवयित्री, लेखिका व निवेदिका प्राची गडकरी यांनी चार कडव्यांचे गीत लिहिलेले आहे आणि कौशल्य इनामदार यांनी यापैकी तीन कडवी घेऊन सुंदर गीत तयार केले होते.
यावर्षी ( 2023) या चिरारथाचे शुभ आर्ट या नागपूर येथील संस्थेने चित्ररथाचे शिल्पाचे काम साकार केले होते. महाराष्ट्राला आतापर्यंत 1971 ( पासून सुरुवात झाली तेव्हापासून ) पासून 2023 पर्यंत 14 वेला उत्कृष्ट चित्ररथ, 7 वेळा पाहिले पारितोषिक, 4 वेळा दुसरे पारितोषिक आणि 2 वेळेस तिसरे पसरितोषिक मिळाले आहे. एक महत्वाचे सलग तिन वर्षी ( हॅटट्रिक ) महाराष्ट्र राज्याच्या नावावर जमा आहे.
– सन 1983 मध्ये बैलपोळा या चित्ररथास प्रथम पारितोषिक मिळाले.
– 1988 मध्ये लोकमान्य टिळकांच्या ऐतिहासिक खटला,
– 1993 मध्ये टिळकांच्या शताब्दी वर्ष ( सार्वजनिक गणेश उत्सव ) यास प्रथम पारितोषिक मिळाले,
– 1994 हापूस आंबा यास ससंकल्पनेला प्रथम पारितोषिक,
– 1995 मध्ये बापू स्मृती या चित्ररथास प्रथम पारितोषिक मिळाले,
– 2018 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा यास प्रथम
2007 – जेजुरीच्या खंडेराया,
2009- धनगर चित्ररथास
2023 – महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठे आणि नारीशक्ती या चित्ररथा ला दुसरे पारितोषिक मिळाले.
नमस्कार, महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतेच वृद्ध कलाकारांना आर्थिक मदत देण्यासाठी ' कलाकार मानधन योजना '2025…
नमस्कार, आपण घरकुल योजने साठी फॉर्म भरतो आणि घरकुल योजनेचा फॉर्म मंजूर होतो, पण घर…
नमस्कार "पिंक ई-रिक्षा योजना" हि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले…
"ड" अक्षराने सुरू होणाऱ्या 100 गावांची नावे खालीलप्रमाणे: d varun gavachi naave ड वरून गावांची…
गाव नमुना 14 (Form 14) हा एक सरकारी दस्तऐवज आहे जो मुख्यत: महाराष्ट्र राज्यातील कृषी…
महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने कामगारांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवल्या जातात. कामगारांची नोंदणी, नूतनीकरण, आणि लाभ…
This website uses cookies.