फार्मर आयडी नसल्यास शेतकऱ्यांचा मोठा तोटा! ‘या’ लिंकवर क्लिक करून लगेच बनवा ! farmer id

नमस्कार, शेती करणाऱ्या बांधवांसाठी सध्या एक महत्त्वाचा विषय म्हणजे फार्मर आयडी काढणे. कारण, महाराष्ट्र आणि केंद्र सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आता हा farmer id आयडी अनिवार्य करण्यात आला आहे. विशेषतः फळपीक विमा योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, कर्ज माफी योजना आणि इतर अनुदानित सर्व योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर फार्मर आयडी असणे बंधनकारक आहे.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

हे लक्षात घेणं गरजेचं आहे की, जर एखाद्या शेतकऱ्याच्या नावावर जमीन असेल, आणि त्याला या सर्व योजनांचा फायदा घ्यायचा असेल, तर केवळ जमीन असणे पुरेसे नाही, तर farmer id फार्मर आयडी असणे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि बंधन कारक देखील आहे.

जर हा फार्मर आयडी नसेल, तर कोणतीही योजना असो – मग ती विमा योजना असो किंवा कृषी यंत्र खरेदीसाठी असलेली अनुदान योजना – असो या सर्व योजनांना शेतकऱ्यांना अर्ज करता येणार नाही ,

पिक विमा भरता येणार नाही आणी वेळो वेळी दिली जाणारी नुकसान भरपाई फार्मर आयडी नसल्यामुळे मिळणार नाही.

हेही वाचा :  मुख्यमंत्री कृषी सोलर पंप योजना 2023 ( Maharashtra Mukhyamantri Solar Pump Yojana 2023 | Maharashtra Saur Krushi Pamp Yojana 2023|

सध्या राज्यात मृग बहारातील फळपिकांसाठी विमा योजनांचे अर्ज सुरू आहेत. लवकरच खरीप पिक सुरु होणार आहे आणि वेगवेगळ्या पिकांसाठी वेगवेगळ्या अंतिम तारखा जाहीर झालेल्या आहेत.

या योजनांची अंमलबजावणी नामांकित विमा कंपन्यांमार्फत केली जाते – जसे की भारतीय कृषी विमा कंपनी, बजाज अलायन्झ, फ्युचर जनरली आणि युनिव्हर्सल सोम्पो.

परंतु यंदा सरकार मार्फत एक स्पष्ट आणि ठोस निर्णय घेण्यात आला आहे – केवळ फार्मर आयडी असलेल्या शेतकऱ्यांनाच या योजनांचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे आता वेळ वाया घालवण्याऐवजी, ही नोंदणी लवकरात लवकर पूर्ण करणे शेतकऱ्याला आवश्यक आहे.

पण फार्मर आयडी farmer id नेमका असतो तरी काय?

फार्मर आयडी म्हणजे काय ? तर फार्मर आयडी एक १६ अंकी खास ओळख क्रमांक जो ७/१२ उताऱ्यावर आधारित असून, तो प्रत्येक शेतकऱ्याला दिला जातो.

हेही वाचा :  Budget 2024 : शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी, पी एम किसान योजनेचे पैसे वाढवण्यासाठी मोदी सरकार तयारीत Pm Kisan Yojana 2024

हाच१६ अंकी फार्मर आयडी क्रमांक शेतकऱ्याच्या ओळखीचं डिजिटल रूप ठरतो. हे आयडी प्रमाणपत्र ‘अॅग्रिस्टॅक’ या पोर्टलद्वारे दिले जात आहे. जे शेतीविषयक संपूर्ण माहिती एका ठिकाणी संकलित करतं.

या पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे पिकपद्धती तसेच सिंचन व्यवस्था, जमीनधारणा आणि यंत्रसामग्री अशा सर्व बाबींचा नोंद घेतला जातो. त्यामुळे सरकारला तात्काळ योग्य शेतकऱ्यापर्यंत मदत पोहोचवता येते.

फार्मर आयडी मिळवण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची गरज भासते?

शेतकऱ्यांना त्यांच्या गावातील महा-ई-सेवा केंद्र, कृषी सहाय्यक, तलाठी किंवा ग्रामसेवक यांच्याकडे जावे लागते. यासाठी लागणारी कागदपत्रे म्हणजे –

  • आधार कार्ड,
  • ७/१२ उतारा,
  • बँक पासबुक (IFSC कोडसह),
  • मोबाईल क्रमांक
  • आणि जर मोबाईल रजिस्टर असेल,

तर त्या नंबरवर येणारा OTP देखील आवश्यक ठरतो.

Agristack नोंदणी पूर्ण झाल्यानंतर एक डिजिटल प्रमाणपत्र दिलं जातं, ज्यावर शेतकऱ्याचा फार्मर आयडी नमूद केलेला असतो. हे प्रमाणपत्र भविष्यात कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ घेताना अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

हेही वाचा :  10 वी पास वर भारतीय पोस्टात भरती 2023 | Post Office Bharti 2023 | Online Form, Notification Pdf |

हे ओळखपत्र केवळ विमा योजनेसाठीच मर्यादित नाही, याचा उपयोग अनेक योजनांसाठी होतो. उदाहरणार्थ – ठिबक सिंचन योजना, नैसर्गिक शेती योजना, बियाण्यांवर अनुदान, कृषी यंत्रे खरेदी, पशुपालन योजना, सौर पंप योजना आणि अशाच इतर योजना त्यामुळे एकदाच आयडी घेतल्यावर शेतकऱ्याला अनेक योजनांचा दरवाजा खुला होतो.

आजही अनेक शेतकरी या नोंदणीकडे दुर्लक्ष करत आहेत, जे भविष्यात त्यांच्यासाठी मोठं आर्थिक नुकसान ठरू शकतं. कारण, सरकारी आकडेवारीनुसार सुमारे १ कोटीहून अधिक शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे, तरीही अजून लाखो शेतकरी या प्रक्रियेत सहभागी अद्याप तरी झालेले नाही.

वास्तविक पाहता, सरकारची कोणतीही आर्थिक मदत योग्य वेळी मिळावी, विमा भरपाई वेळेवर मिळावी आणि अनुदान थेट खात्यात जमा व्हावे, हे सर्व काही फार्मर आयडी वरच अवलंबून आहे. म्हणूनच, वेळ न दवडता, आपल्या शेजारील सेवा केंद्रात जाऊन ही नोंदणी पूर्ण करणे हे प्रत्येक शेतकऱ्याच्या फायद्याचं आहे.

शेतकरी कार्ड काढण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

Farmer id FAQs

क्रमांक प्रश्नउत्तर
1Farmer ID म्हणजे काय?हा १६ अंकी क्रमांक आहे, जो ७/१२ उताऱ्यावर आधारित प्रत्येक शेतकऱ्याला दिला जातो.
2Farmer ID का आवश्यक आहे?कारण आता सर्व सरकारी योजना, अनुदान व पीक विमा यासाठी Farmer ID अनिवार्य आहे.
3Farmer ID कसा मिळवावा?गावातील महा-ई-सेवा केंद्र, कृषी सहाय्यक, तलाठी किंवा ग्रामसेवक यांच्याकडे अर्ज करून मिळवता येतो.
4Farmer ID साठी कोणती कागदपत्रे लागतात?आधार कार्ड, ७/१२ उतारा, बँक पासबुक (IFSC कोडसह), मोबाईल नंबर.
5Farmer ID नसल्यास योजना अर्ज करता येईल का?नाही. कोणतीही योजना, विमा, अनुदान यासाठी आता Farmer ID आवश्यक आहे.
6Farmer ID मिळवायला किती वेळ लागतो?सर्व माहिती बरोबर असल्यास काही दिवसांत डिजिटल प्रमाणपत्र मिळते.
7AgriStack पोर्टल म्हणजे काय?हे शेतकऱ्यांची माहिती साठवणारे सरकारचे डिजिटल पोर्टल आहे – जसे जमीन, पिके, सिंचन, इत्यादी.
8Farmer ID कुठे पाहू शकतो?डिजिटल प्रमाणपत्र महा-ई-सेवा केंद्रात मिळते. काही वेळेस SMS द्वारे माहिती येते.
9फळपीक विमा योजनेसाठी ID लागतो का?होय. आता फळपीक विमा व प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी ID अनिवार्य आहे.
10ID नसेल तर काय नुकसान होईल?विमा भरपाई मिळणार नाही, अनुदान थेट खात्यात जमा होणार नाही, आणि योजनेसाठी अपात्र ठरू शकता. त्यामुळे ID अत्यावश्यक आहे.
मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp aapla Baliraja

Leave a Comment