पी एम किसान योजना : बँकेला आधार लिंक कसे करावे ?
|
पी एम किसान योजना ही एक केंद्र पुरस्कृत मोठी DBT ( Direct Benefit Transfer ) डायरेक्ट हस्तांतरित योजना आहे. मध्ये जो लाभार्थी आहे ( उदा. पी एम किसान योजनेचा लाभार्थी ) त्याच्या बँक खात्यावर direct पैसे पाठवणारी योजना आहे.
भारत एक मोठा देश आहे आणि या योजनेत अनेक लाभार्थी आहेत. या शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळावा यामध्ये कोणाचाही हस्तक्षेप नसावा यासाठी केंद्र सरकार काढून विविध मार्ग ( सुविधा ) काढण्यात येत आहे.यामध्ये आधार लिंक करावे – पी एम किसान योजनेला ( सोप्या शब्दात आधार ई केवायसी ), त्यानंतर आधार आणि बँक लिंक कसे करावे ( सोप्या शब्दात आधार आणि बँक केवायसी ) हे महत्वपूर्ण आहे.
आधार लिंक या योजनेला महत्वपूर्ण आहे या द्वारे शेतकऱ्यांची पडताळणी होते हयात आहे की नाही, तसेच शेतकऱ्यांना संदर्भात सम्पूर्ण माहिती सरकारला मिळते.
त्यानंतर आधार आणि बँक इ केवायसी ( आधार – बँक लिंक ) यामध्ये लाभार्थ्यांच्या कोणत्याही बँकेला आधार लिंक करून घेणे महत्वाचे आहे कारणं या योजनेतून पैसे direct आधार मार्फत येतात यासाठी सरकार DBT या सरकारच्या agency ची मदत मदत घेतात. याचे अनेक फायदे आहेत शेतकऱ्याचे जर एखादे अकाउंट बंद आले तर शेतकऱ्यांने जे नवीन खाते उघडले आहे त्याठिकाणी आधार लिंक आटोमॅटिक होऊन त्या नवीन खात्यात पैसे येतात. जो अकाउंट नंबर बदलण्याचा मनस्ताप होतो तो या DBT च्या ( आधार आणि बँक लिंक ) मुळे होत नाही.
आधार इकेवायसी किंवा पी एम किसान सम्मान निधी केवायसी कसे करणार
आधार इकेवायसी किंवा पी एम किसान इकेवायसी करण्यासाठी तुम्हाला सीएससी केंद्रावर जाऊन किंवा आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी जाऊन इ केवायसी करून मिळेल किंवा तुम्ही मोबाईल अँप्लिकेशन ( पी एम किसान ) Otp द्वारे सुद्धा करू शकता.. पण या ठिकाणी जर तुम्ही थंब ( बाईओमेट्रिक केवायसी ) केवायसी केली तर ती उत्तमच असेल.
आधार आणि बँक लिंक केवायसी ?
याला सोप्या शब्दात बँक – आधार लिंक म्हणतात. यामध्ये तुम्ही तुमचे जे बँक खाते आहे कोणतेही, त्या बँकेत जाऊन तुम्ही ( आधार – बँक लिंक फॉर्म ) भरून देऊन तुम्ही तत्काळ आधार कार्ड बँक लिंक करू शकता, ही एक पद्धत आहे त्यानंतर दुसरी एक पद्धत.
यामध्ये तुम्ही पोस्टात जाऊन ( इंडियन पोस्ट पेमेंट बँक ) एक तर नवीन खाते उघडून त्याठिकाणी Received DBT ला ओके करून ( adhar seeding with bank ) ला ओके करून तुम्ही आधार बँकेला लिंक करू शकता.यासाठी संबंधित पोस्ट ऑफिस ची मदत घेऊ शकता किंवा सी एस सी सेन्टर ची मदत घेऊ शकता.अश्या प्रकारे तुम्ही आधार केवायसी व आधार बँक केवायसी करू शकता.
हे पण पहा :
एक आनंदाची बातमी PM Kisan प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे पैसे वाढणार , ६ हजार वरून आता एवढे येणार