शेतासाठी विहीर पाहिजे तर शासनाकडून मिळणार 4 लाख रुपये अनुदान, अर्ज कसा करायचा, अटी आणि अनुदान कसे मिळवायचे Vihir Anudan Maharashtra Sarkar

 शेतासाठी विहीर पाहिजे तर शासनाकडून मिळणार 4 लाख रुपये अनुदान, अर्ज कसा करायचा, अटी आणि अनुदान कसे मिळवायचे vihir anudan yojana :

Table of Contents

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
Telegram Group Join Now

 

             नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र सरकारकडून शेतीसाठी किंवा शेतीसाठी जर विहीर खोदायची vihir anudan yojana असेल तर शासन तुम्हाला 4 लाख रुपये पर्यंत अनुदान देते, या संदर्भात आपण माहिती पाहणार आहे.

महाराष्ट्र सरकार शासन निर्णय 04 नोव्हेंबर 2022  ( मध्ये यासंदर्भात पूर्ण माहिती दिली आहे. हे अनुदान तुम्हाला पाहिजे असेल तर हे ‘महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत ( मनरेगा अंतर्गत ) शेतीसाठी सिंचन करण्यासाठी हे अनुदान दिले जाते.

हे 4 लाख रुपये अनुदान मिळवायचं असेल तर यासाठी अटी, पात्रता काय आहे, अर्ज संदर्भात माहिती आणि हा अर्ज कसा आणि कोठे करायचा म्हणजे ऑनलाईन करायचा किंवा ऑफलाईन अर्ज करायचा याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहे.

अलीकडेच नोव्हेंबर 2021 मध्ये MPI ( Multidimensional Poverty Index बहुआयामी गरिबी निर्देशांक ) आला होता त्यामध्ये महाराष्ट्रात 14.9% कुटूंबे हे दारिद्र्य रेषेखाली आहेत असे सांगण्यात आले होते.

हेही वाचा :  दुष्काळ अनुदान किवा इतर अनुदान मिळतच नाही, शेजारील शेतकऱ्याला अनुदान मिळाले तर NPCI Mapping form बँकेत जमा करा |NPCI Mapping form this will get all government subsidy

सरकारने 2021 नंतर अनुदान स्वरूपात बदल केला असून आता अनुदान मधील 60 % खर्च हा वैयक्तिक कामामध्ये खर्च करण्याचे भारत सरकारचे आदेश होते. म्हणून हे कामे आता मनरेगा मार्फत करण्यात येत आहे.

सरकार चे म्हणणे आहे की आता मनरेगा फक्त रोजगार देणारी नसून आता देशाच्या विकासात भर घालणारी होणारी आहे.

 

 

नवीन जीआर नुसार सरकारने प्रत्येक कुटुंब हे लखपती करण्याचे ठरविले आहे. म्हणजे सर्व क्षेत्रात रोजगार वाढून मग ते कोणतेही काम असो सर्व मनरेगा मार्फत टक्केवारीत ( 60 % मनरेगा ) कामे करायची आहे.

यामार्फत रोजगार तर वाढेल सोबत जे काम असणारे आहे त्यामार्फत उत्पन्न सुद्धा वाढणार आहे.( उदा. मनरेगा मार्फत विहीरीचे काम झाले तर रोजगार वाढेल आणि विहीर पूर्ण झाल्यानंतर पाणी उपलब्धतेमुळे शेती ( ठिबक आणि तुषार सिंचन लावून ) उत्पन्न वाढेल असे सरकार ला वाटत आहे

 

लाभार्त्यांची निवड या पद्धतीने होणार  :

मनरेगा अधिनियम अंतर्गत परिशिष्ट्ये कलम 1 ( 4 ) मधील तरतुदी नुसार प्राधान्यक्रम असणार आहे, यामध्ये 

 

– अनुसूचित जाती त्यानंतर

– अनुसूचित जमाती

– भटक्या जमाती

– विमुक्त जाती

– दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती

– स्त्री कर्ता असणारी कुटुंबे

– विकलांग कर्ता असणारी कुटुंबे यानंतर

– जमीन सुधारणा लाभार्थी 

– इंदिरा आवास योजनेतील असणारे लाभार्थी

-अनुसूचित जमाती व अन्य परंपरागत ( 2006 नुसार तसेच (2007 मधील 2 ) लाभार्थी

– सीमांत शेतकरी यामध्ये क्षेत्र 2.5 एकर पर्यंत

– अल्प भूधारक असणारे शेतकरी ( यामध्ये 5 एकर पर्यंत असणारे शेतकरी

 

 

 

हेही वाचा :  गॅस सबसिडी मिळवण्यासाठी काय करावे | Subsidy in gas Cylinder how to get ?

 

यामध्ये निवड कशी होणार ( लाभार्थी पात्रता ) vihir anudan yojana :

1)पहिले म्हणजे ज्यांना या विहिरी साठी अर्ज करायचा आहे त्यांच्याकडे किमान 0.40 हेक्टर क्षेत्र ( 1 एकर ) क्षेत्र सलग असावे.

 

2) महाराष्ट्र भूजल अधिनियम 1993 कलम 3 नुसार पेयजल असणाऱ्या विहिरी किंवा साठा यापासून 500 मिटर पेक्षा लांब पाहिजे

 

3) त्यानंतर दोन विहिरी मधील अंतर ( पेयजल साठा नसलेल्या विहिरी /इतर  ) 150 मीटर पेक्षा जास्त असावे तसेच पण ही अट मात्र अनुसूचित जाती – जमातीसाठी नाही

 

4) ज्यांना विहिर अनुदान साठी अर्ज करायचा आहे त्यांच्या 7/12 वर आधीच विहिरींची नोंद असू नये.

 

5) एकूण क्षेत्राचा दाखला असावा 

 

6) जे या योजनेचा लाभ घेणार आहे त्यांच्याकडे जॉब कार्ड पाहिजे.

 

7) सामुदायिक विहीर पाहिजे असेल तर सलग  0.40 हेक्टर  जमीन पाहिजे आणि त्याचा पंचनामा सादर करावा लागेल.

 

अर्जासोबत जोडायचे कागदपत्रे vihir anudan yojana  :

 

1) 7/12 डिजिटल उतारा

2) 8 अ डिजिटल उतारा 

3) जॉब कार्ड ची प्रत

4) सामुदायिक विहिरी साठी पंचनामा 

5) सामुदायिक विहीर असल्यास पाणी वापरसंदर्भात सर्व लाभार्थ्यांचे करारपत्र

 

 

अर्ज कोठे जमा करायचा आणि भरायचा vihir anudan yojana ?

सर्व अर्ज ग्रामपंचायतीने जमा करायचे आणि जमा झालेले सर्व अर्ज ग्रामपंचायत डाटा एन्ट्री ऑपरेटर किंवा ग्राम रोजगार सेवक याच्या मार्फत भरायचे.  यामध्ये अर्ज भरण्याची संपूर्ण जबाबदारी ही ग्राम पंचायतीची असणार आहे.

 

वरील सर्व अर्ज ऑनलाईन पद्धतीने ग्रामसेवकास किंवा ग्रामपंचायतीस उपलब्ध होतील.

 

 

ग्रामपंचायत / ग्रामसभा मंजुरी vihir anudan yojana :

मनरेगा अंतर्गत कोणाला किती लाभ देता येईल याबाबत निर्णय ग्रामसभा ने घेणे आवश्यक आहे. ग्रामसभेत मंजूर अर्ज योग्य प्रचार आणि प्रसिद्धी नंतर सर्व लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल.

हेही वाचा :  सोलर पंप साठी 35 जिल्ह्यासाठी अर्ज सुरू , नवीन कोटा उपलब्ध , अर्ज असा ऑनलाईन करा Solar Pump Online Application

 

 

ग्रामसभा किंवा ग्राम पंचायतींने मंजूर केल्यानंतर यास प्रशासकीय मान्यता देण्याची जबाबदारी ही गट विकास अधिकारी यांची राहील.

त्यानंतर प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर याला तांत्रिक मान्यता देण्याची जबाबदारी ही तांत्रिक सहाय्यक यांची राहील.

 

 

 

महत्वाचे म्हणजे  vihir anudan yojana :

 

 

विहिरींसाठी लाभधारक निवड करताना गावपातळीवर एक आर्थिक वर्षात मजुरी व साहित्याचे प्रमाण हे 60:40 राखण्यात यावे.

 

– अधिक विहिरीची मागणी वाढल्यास सुरू असलेल्या विहिरी पूर्ण करून नवीन विहिरीना मान्यता द्यावी.

 

 

विहीर कोठे खोदायची  vihir anudan yojana ?

 

1) दोन नाल्यांच्या मधील क्षेत्रात किंवा त्यांच्या संगमा जवळ

2) नदी व नाल्याच्या जिथे उथळ भाग आहे तेथे उथळ गाळाच्या प्रदेशात

3) जेथे मातीचा थर हा 30cm पर्यंत आहे तसेच किमान मुरूम हा 5 m पर्यंत खोल आहे.

4) घनंदाट व गर्द पानांच्या तसेच झाडांच्या प्रदेशात

5) अचानक दमट वाटणाऱ्या जागेत

6 ) नाल्याच्या तीरावर जेथे उंचवटा आहे परंतु तेथे चिकन माती नसावी

 

 

अर्ज कोठे मिळेल 

अर्ज पाहिजे असेल तर या ठिकाणी क्लिक करा 

 


विहीर कोठे खोदु नये ?

 

1) भूपृष्ठ खडकावर

2) डोंगराचा कडा व त्याच्या 150 m अंतरात

3) मातीचा थर जर 30cm पेक्षा कमी असणाऱ्या भागात

4) मुरूमाची खोली 5m पेक्षा कमी असणाऱ्या भूभागात

 

 

विहीर कामाच्या पूर्णत्वाची कालावधी किती आहे ?

 

 

विहिरींना प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर काम शक्य तितक्या लवकर पूर्ण करणे तसेच त्याला गती देऊन 4 महिन्याच्या आत काम पूर्ण करणे गरजेचे आहे. ( अपवाद जर पावसाळा किंवा ऋतू बदल कारणाने ) 

 

अर्ज कोठे मिळेल 

अर्ज पाहिजे असेल तर या ठिकाणी क्लिक करा 

 

vihir anudan yojana

vihir anudan yojana maharashtra 2023

vihir anudan yojana maharashtra 2023 online apply

vihir anudan yojana maharashtra

विहीर अनुदान योजना

मागेल त्याला विहीर योजना

विहीर अनुदान योजना महाराष्ट्र 

Magel tyala vihir online application

अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना

विहीर असल्याचे प्रमाणपत्र

ग्रामपंचायत विहीर योजना अर्ज  

 

 

 

 

WhatsApp aapla Baliraja

Leave a Comment