बांधकाम कामगारांना 60 वर्षानंतर पेन्शन देण्याचा प्रस्ताव शासनास सादर – हरी चव्हाण

Bandhkam Kamgar Pension Yojana : नमस्कार ज्या कामगारांची नोंदणी ही महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाकडे नोंदणी आहे अशा सर्व बांधकामकारांसाठी एक महत्त्वाची बातमी आली आहे शासनाकडे आता वय वर्ष 60 वर्षानंतर पेन्शन देण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे तो लवकरच मंजूर होणार याबाबत माहिती देण्यात आलेली आहे.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्र मध्ये जे नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत त्यांच्यासाठी विविध योजना आहे जवळपास 30 ते 32 प्रकारच्या या योजना आहेत याच्यामध्ये सामाजिक तसेच आर्थिक तसेच शैक्षणिक व इतर वर्गीकरण करून या योजना जी नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत त्यांना देण्यात येत आहे आता या योजनेमध्ये एक नवीन योजना समाविष्ट होणार आहे.

बांधकाम कामगारांना पेन्शन मिळणार

Bandhkam Kamgar Pension Yojana : नुकतेच बांधकाम कामगार महासंघ प्रदेश अध्यक्ष श्रीहरी चव्हाण यांनी माहिती दिली असे आहे की आम्ही शासनाकडे ज्या नोंदणीकृत बांधकाम कामगारांचे वय 60 वर्षे पूर्ण झालेले आहे त्या सर्व बांधकाम कामगारांना दर महिन्यात 3 हजार रुपये पेन्शन देण्यात यावी असा प्रस्ताव सादर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव श्री विवेक कुंभार यांच्याकडे केलेला आहे.

हेही वाचा :  शासन आपल्या दारी योजना : जत्रा शासकीय योजनांची नवीन उपक्रम Shasan aplya Dari Jatra Shaskiy Yojanachi

बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव श्री विवेक कुंभार यांनी पाठवलेला आहे यासाठी हिरवा कंदील त्यांनी दर्शविलेला आहे. त्यामुळे लवकरच वय वर्ष 60 ज्यांचे पूर्ण होणार आहे त्या सर्वांना पेन्शन लागू होणार आहे

3 ऑक्टोबर 2024 रोजी बांधकाम कामगारांच्या प्रश्नावर एक बैठक आयोजित केली होती या बैठकीमध्ये बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव श्री कुंभार सर तसेच भारतीय मजदूर संघाचे सलग्न असलेले प्रदेश अध्यक्ष एडवोकेट श्री अनिल डुमणे तसेच सहभागी श्रीपाद कुटासकर सर आणि बांधकाम कामगार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष श्री हरीचा मान सर यामध्ये प्रत्येक जिल्ह्याची कामगारांचे अध्यक्ष तसेच इतर सरकारी अधिकारी यामध्ये उपस्थित होते

बांधकाम कामगारांचे प्रलंबित प्रश्न ?

यामध्ये विविध प्रश्नांच्या चर्चा करण्यात आली आणि यावर हिरवा कंदील दाखवण्यात आला ते खालील प्रमाणे

  • या बैठकीमध्ये ग्रामसेवक 90 दिवसाचे प्रमाणपत्र देत नसल्याचे तक्रारी मुद्दा हा उपस्थित करण्यात आला त्यावर चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे सांगण्यात आले ही चर्चा शासन तसेच ग्रामसेवक संघटना आणि बांधकाम कामगार संघटना आणि कामगार यांच्यामध्ये पार पाडलेली आहे.
  • त्यानंतर सन 2019 ते 2020 या दरम्यान जे ऑफलाइन मृत्यूचे क्लेम सादर केले गेले होते ते लवकरात लवकर मार्गी लावावेत या संदर्भात सांगण्यात आले.
  • त्यानंतर बांधकाम कामगारांना कोरोना काळामध्ये ज्यांना आर्थिक मदत रुपये 6500 रुपये तसेच प्रशिक्षण भत्ता 4200 रुपये हे मिळालेली नाही त्यांना ते त्वरित देणार आहे असा निर्णय करण्यात आला.
  • नंतर मंडळाच्या नावाने विविध एंजंटनी तसेच बांधकाम कामगार संघटनांनी आपले दुकानात थाटली आहेत त्याची व्यवस्थित चौकशी करून त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा या ठिकाणी सांगण्यात आले आहे.
  • त्यानंतर बांधकाम कामगाराची तसेच त्यांच्या कुटुंबाची आरोग्य तपासणी च्या नावाखाली ठेकेदार कंपनी आणि इतर यांनी जी बांधकाम कामगार महामंडळाची फसवणूक केली आहे त्याबाबत सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी सुद्धा मागणी करण्यात आले. जर चौकशी केली नाही तर याविरुद्ध तीव्र आंदोलन करण्यात येईल असे या बैठकीत निर्णय घेण्यात आले.
  • जे ऑनलाईन पद्धतीने लाभाचे अर्ज सादर केले जातात ते तातडीने मंजूर केले जावेत असा प्रसाद सुद्धा पारित करण्यात आला.
  • त्यानंतर बांधकाम कामगाराचे जे घरकुल योजनेखाली अर्ज आलेले आहेत ती पद्धत सोपी करण्यात यावी आणि तातडीने मंजूर करावी असे त्या ठिकाणी मांडण्यात आले.
  • त्यानंतर बांधकाम कामगार मंडळाकडे नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत त्यांना जे वस्तुरूपी लाभ मिळत आहेत जसे की पेटी संच योजना तसेच भांडी साहित्य योजना हे जे लाभ आहेत ते घेताना बांधकाम कामगारांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक एजंट करून पिळवणूक होत आहे त्यासाठी हे लाभ घेताना ऑनलाईन पद्धतीने लाभ आणि तारीख देण्यात यावी असा प्रस्ताव देखील या ठिकाणी मांडण्यात आला यावर सुद्धा सकारात्मक असल्याचे शासनाकडून सांगण्यात आले.
  • इतर महत्वाच्या मुद्द्यावर देखील या ठिकाणी सकारात्मक चर्चा करण्यात आली.
मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp aapla Baliraja

Leave a Comment

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now