अतिवृष्टी अनुदान फक्त कागदावरच, शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर प्रत्यक्ष पैसेच आले नाही : Ativrushti Anudan Today News
शेतकरी बंधुनो मागच्या वर्षी म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2022 मध्ये झालेल्या मोठया प्रमाणावर अतिवृष्टी मध्ये आपल्या बळीराजाचे खूप नुकसान झाले आहे. बळीराजाच्या हाता तोंडाशी आलेला घास या अतिवृष्टीने हिरावून घेतला होता. त्यावेळी या सरकारने या झालेल्या पावसाने नुकसान भरपाई म्हणून सरसकट 13 हजार रुपये एवढे अनुदान आपल्या बळीराजाला देण्याचे जाहीर केले होते. पण हे अनुदान फक्त कागदावर च दिले गेले ( कागदोपत्री दिल्याचे आहे ) प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्याच्या बँक खात्यावर पैसे आलेच नाही.
पाथर्डी ( अहमदनगर ) येथे अनुदान दिल्याचे सांगितले जात आहे
पाथर्डी ( अहमदनगर ) येथील शेतकऱ्यांबाबत प्रकार घडला. तेथील तहसीलदारांकडे या अनुदान संदर्भात विचारणा केली असता, हे अतिवृष्टी अनुदान जमा झाल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात मात्र हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेच नाही.याआधी तुम्हाला माहित असेल की हे अनुदान तहसील मधून संबंधित गावाच्या बँकांना पाठवून तेथील शेतकऱ्याच्या यादी सोबत तसेच अनुदान किती आहे ही सर्व माहिती पाठवली जायची व अनुदान त्या प्रमाणे जमा होत असे. आता या जुन्या प्रणालीत बदल झाला असून हे अनुदान संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयातून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ लागले. त्यामुळे हे अनुदान कोणाच्याही खात्यात व कोठेही जमा होऊ लागले. अनेक शेतकरी या अतिवृष्टी अनुदानापासून वंचित राहु लागले.
बळीराज्याची अपेक्षा !
शेतकऱ्यांची एकच मागणी आहे की हे अनुदान जिल्हाधिकारी यामार्फत देण्याऐवजी ते पूर्वी प्रमाणे म्हणजे जुन्या पद्धतीने दिले जावे. तसेच सर्व बाधित शेतकऱ्यांना हे अनुदान दिले जावे.
- अतिवृष्टी अनुदान अंदाजे कधी जमा होतील ?
– शासन माहिती प्रमाणे अतिवृष्टी अनुदान साधारण हे ऑगस्ट 2023 पासून आधार लिंक खात्यावर जमा होणार असल्याचे सांगितले जात आहे, त्यासाठी आवश्यक ती Ekyc केली जाणार आहे असे सांगितले जात आहे.
Kadhi jama honar