मुख्यमंत्री वयोश्री योजना मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी, 3 हजार रुपये लाभ मिळणार Mukhyamantri Vayoshri Yojana Maharashtra 2024

महाराष्ट्र कॅबिनेट मीटिंग मध्ये ( फेब्रुवारी २०२४ ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ‘ मुख्यमंत्री वयोश्री योजना ‘ या योजनेस ५ फेब्रूवारी २०२४ रोजी यास मान्यता दिली. या योजनेत पात्र लाभार्थ्यास प्रत्येकी 3 हजार रुपये ते त्यांच्या बँक खात्यावर पाठवणार आहे. तर ‘ मुख्यमंत्री वयोश्री योजना ‘ Mukhyamantri Vayoshri Yojana Maharashtra काय आहे याबद्दल माहिती पाहू.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र Mukhyamantri Vayoshri Yojana Maharashtra

महाराष्ट्र कॅबिनेट मीटिंग मध्ये या योजनेस मान्यता मिळाली. महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या १.२५ कोटी ते १.५ कोटी लोकसंख्या ही ज्येष्ठ नागरिकांची आहे. त्यामुळे या योजनेस पहिल्या टप्प्यात याला 480 कोटी रुपये खर्च करण्यास महाराष्ट्र सरकारने मान्यता दिली आहे.

हेही वाचा :  अहमदनगर जिल्ह्याचा विभाजन व नामांतराचा प्रश्न सध्या राजकीय चर्चेत !

वार्षिक 2 लाख रुपये मर्यादित आणि 65 वर्षांवरील सर्व नागरिकांना याचा फायदा होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने ज्यांना अपंग आले आहे किंवा अपंग आहेत, मानसिक पीडित आहेत तसच अशक्तपणा येतो याचे उपचारा साठी सरकारं मार्फत प्रत्येकी 3 हजार रुपये Dbt मार्फत दिले जाणार आहे.

Mukhyamantri Vayoshri Yojana Maharashtra 2024 aaplication
मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

या योजनेची अंमलबजावणी साठी ग्रामीण भागात जिल्हाअधिकारी आणि शहरी भागात अंमलबजावणी साठी आयुक्त यांनी पाहणी आणि चाचणी करावी तसेच या मार्फत पात्र लाभार्थी निवडणार आहे. याची लिस्ट तयार करून शासनाला पाठवली जाणार आहे.

मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय : मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र Mukhyamantri Vayoshri Yojana Maharashtra Cabinet Decision

१) २ लाख पर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या तसेच ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना ‘ मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ मिळणार आहे.

२) यामध्ये अपंगत्व, अशक्तपणा तसेच मानसिक संतुलन ठेवण्यासाठी सरकार मार्फत मदत केली जाणार आहे.

३) यासाठी महाराष्ट्र सरकार मनःस्वास्थ्य केंद्रे आणि योगो उपचार या मार्फत प्रबोधन आणि प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच लाभार्थी यांना ३ हजार रुपयाची मदत सुध्दा केली जाणार आहे.

हेही वाचा :  Sheli Palan Yojana 2024 शेळ्या पालना साठी आता मिळणार 10 लाख रुपये अनुदान 500 शेळ्या आणि 25 बोकड ; येथे अर्ज करा

४) ही मदत मिळवण्यासाठी जिल्हाधिकारी आणि आयुक्त या मार्फत ( आरोग्य विभागा मार्फत सर्वेक्षण आणि स्क्रिनिंग करून ) तपासणी करून लिस्ट बनवून सरकार कडे पाठविली जाणार आहे.

मुख्यमंत्री वयोश्री योजना 2024 साठी आवश्यक कागदपत्रे Important Dcoument Mukhyamantri Vayoshri Yojana

1) रहिवासी दाखला पाहिजे.

2) आधार कार्ड – 65 वर्ष पूर्ण.

3) ओळखपत्र – आधार कार्ड तसेच पॅन कार्ड यापिकी एक.

4) वयाचा दाखला किंवा पुरावा – आधार कार्ड/ पॅन कार्ड किंवा जन्माचा दाखला देऊ शकता.

5) रेशन कार्ड.

6) मोबाईल नंबर.

7) फोटो पासपोर्ट.

8) दिव्यांग असेल तर ते सर्टिफिकेट.

9) उत्पन्नाचा दाखला – 2 लाखा पर्यंत.

10) अशक्तपणा येत असेल डॉक्टर सर्टिफिकेट.

वरील सर्व कागदपत्रे लागणार आहेत.

योजनेचे नाव मुख्यमंत्री वयोश्री योजना 2024 महाराष्ट्र, Mukhyamantri Vayoshri Yojana Maharashtra
योजनेची सुरवात फेब्रूवारी 2024
योजना कोणासाठी महाराष्ट्र राज्यातील 65 वयापेक्षा जास्त असणारे जेष्ठ नागरिक महिला किवा पुरुष
लाभ ३,००० लाभ मिळणार
अर्ज कसा करणार अर्ज ऑनलाईन किवा ऑफलाईन
Official website Offcial Website Mukhyamantri Vayoshri Yojana Maharashtra
Mukhyamantri vayoshri yojana maharashtra

मुख्यमंत्री वयोश्री योजना पात्रता अटी Mukhyamantri Vayoshri Yojana Elegibility Criteria

1) महाराष्ट्र राज्याचा रहिवासी पाहिजे

हेही वाचा :  येथे नुकसान भरपाई अनुदान बँकेत जमा झाले कि नाही पहा | nuksan bharpai Jama mh disaster management mahait org Payment Status

2) अर्ज करणार्याचे वय किमान 65 वर्ष पूर्ण पाहिजे.

3) अर्ज करणार्याचे किवा जो लाभार्थी असणार असणार आहे त्याचे माघील वर्षीचे उत्पन्न हे २ लाखां पेक्षा कमी पाहिजे.

4) अर्जदार हा दिव्यांग किवा अशक्तपणा तसेच मानसिक संतुलन संदर्भात रुग्ण पाहिजे ( Not Compulsary ).

Mukhyamantri Vayoshri Yojana Online Application मुख्यमंत्री वयोश्री योजना ऑनलाईन अर्ज

मुख्यमंत्री वयोश्री योजना ही नुकतीच महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे. ही योजना मुख्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी असल्यामुळे आणि राज्यात ही लोकसंख्या १.५ कोटी पर्यंत असल्यामुळे महत्वाची ठरणार आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांमध्ये सुध्दा दिव्याग, मानसिक आजार यांना पहिल्यांदा दिले जाणार आहे.

मुख्यमंत्री वयोश्री योजना साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ या ठिकाणी क्लिक करून तुम्ही या ठिकाणी माहिती भरू शकता.

या ठिकाणी समजून घ्या की राज्यात १.५ कोटी संख्या ही ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे आणि ग्रामीण भाग असल्यामुळे फॉर्म भरणे ही प्रक्रिया ऑनलाइन सोबत ही ऑफलाईन सुध्दा आहे.

ग्रामीण भागात जर तुम्ही असाल तर तुम्ही जवळच्या ग्रामीण सरकारी दवाखाण्यात किंवा तलाठी भाऊसाहेब यानाकडे ऑफलाईन अर्जाची विनंती करू शकता. ते तुमचा अर्ज घेऊन तहसील मध्ये ऑनलाईन करू देतील.

FAQ. Mukhyamantri Vayoshri Yojana

1) मुख्यमंत्री वयोश्री योजना कोणासाठी आहे ?

मुख्यमंत्री वयोश्री योजना ही महाराष्ट्र राज्यात असणाऱ्या 65 वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे.

2) मुख्यमंत्री वयोश्री योजना यामधून लाभ काय मिळणार आहे ?


मुख्यमंत्री वयोश्री योजना ही राज्य शासनाची एक महत्वाची आहे. या योजने मार्फत महाराष्ट्र सरकार कढून 65 वर्षा पेक्षा जास्त वय असणाऱ्यांना प्रत्येकी 3,000 रुपये बँक खात्यावर डीबीटी मार्फत मिळणार आहे.

WhatsApp aapla Baliraja

Leave a Comment