महाराष्ट्र कॅबिनेट मीटिंग मध्ये ( फेब्रुवारी २०२४ ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ‘ मुख्यमंत्री वयोश्री योजना ‘ या योजनेस ५ फेब्रूवारी २०२४ रोजी यास मान्यता दिली. या योजनेत पात्र लाभार्थ्यास प्रत्येकी 3 हजार रुपये ते त्यांच्या बँक खात्यावर पाठवणार आहे. तर ‘ मुख्यमंत्री वयोश्री योजना ‘ Mukhyamantri Vayoshri Yojana Maharashtra काय आहे याबद्दल माहिती पाहू.
महाराष्ट्र कॅबिनेट मीटिंग मध्ये या योजनेस मान्यता मिळाली. महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या १.२५ कोटी ते १.५ कोटी लोकसंख्या ही ज्येष्ठ नागरिकांची आहे. त्यामुळे या योजनेस पहिल्या टप्प्यात याला 480 कोटी रुपये खर्च करण्यास महाराष्ट्र सरकारने मान्यता दिली आहे.
📝 बातमी पहा : शेतजमिनीचा नकाशा आता अक्षांश आणि रेखांश सह ऑनलाईन
वार्षिक 2 लाख रुपये मर्यादित आणि 65 वर्षांवरील सर्व नागरिकांना याचा फायदा होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने ज्यांना अपंग आले आहे किंवा अपंग आहेत, मानसिक पीडित आहेत तसच अशक्तपणा येतो याचे उपचारा साठी सरकारं मार्फत प्रत्येकी 3 हजार रुपये Dbt मार्फत दिले जाणार आहे.
या योजनेची अंमलबजावणी साठी ग्रामीण भागात जिल्हाअधिकारी आणि शहरी भागात अंमलबजावणी साठी आयुक्त यांनी पाहणी आणि चाचणी करावी तसेच या मार्फत पात्र लाभार्थी निवडणार आहे. याची लिस्ट तयार करून शासनाला पाठवली जाणार आहे.
📝 बातमी पहा : पुन्हा बांधकाम कामगार यांना भांडी मिळण्यास सुरुवात, या जिल्ह्यात वाटप पुन्हा सुरू
१) २ लाख पर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या तसेच ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना ‘ मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ मिळणार आहे.
२) यामध्ये अपंगत्व, अशक्तपणा तसेच मानसिक संतुलन ठेवण्यासाठी सरकार मार्फत मदत केली जाणार आहे.
३) यासाठी महाराष्ट्र सरकार मनःस्वास्थ्य केंद्रे आणि योगो उपचार या मार्फत प्रबोधन आणि प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच लाभार्थी यांना ३ हजार रुपयाची मदत सुध्दा केली जाणार आहे.
४) ही मदत मिळवण्यासाठी जिल्हाधिकारी आणि आयुक्त या मार्फत ( आरोग्य विभागा मार्फत सर्वेक्षण आणि स्क्रिनिंग करून ) तपासणी करून लिस्ट बनवून सरकार कडे पाठविली जाणार आहे.
📝 बातमी पहा : घराचं वीजबिल शून्य येणार पंतप्रधान सूर्योदय योजना काय आहे पहा
1) रहिवासी दाखला पाहिजे.
2) आधार कार्ड – 65 वर्ष पूर्ण.
3) ओळखपत्र – आधार कार्ड तसेच पॅन कार्ड यापिकी एक.
4) वयाचा दाखला किंवा पुरावा – आधार कार्ड/ पॅन कार्ड किंवा जन्माचा दाखला देऊ शकता.
5) रेशन कार्ड.
6) मोबाईल नंबर.
7) फोटो पासपोर्ट.
8) दिव्यांग असेल तर ते सर्टिफिकेट.
9) उत्पन्नाचा दाखला – 2 लाखा पर्यंत.
10) अशक्तपणा येत असेल डॉक्टर सर्टिफिकेट.
वरील सर्व कागदपत्रे लागणार आहेत.
योजनेचे नाव | मुख्यमंत्री वयोश्री योजना 2024 महाराष्ट्र, Mukhyamantri Vayoshri Yojana Maharashtra |
योजनेची सुरवात | फेब्रूवारी 2024 |
योजना कोणासाठी | महाराष्ट्र राज्यातील 65 वयापेक्षा जास्त असणारे जेष्ठ नागरिक महिला किवा पुरुष |
लाभ | ३,००० लाभ मिळणार |
अर्ज कसा करणार | अर्ज ऑनलाईन किवा ऑफलाईन |
Official website | Offcial Website Mukhyamantri Vayoshri Yojana Maharashtra |
1) महाराष्ट्र राज्याचा रहिवासी पाहिजे
2) अर्ज करणार्याचे वय किमान 65 वर्ष पूर्ण पाहिजे.
3) अर्ज करणार्याचे किवा जो लाभार्थी असणार असणार आहे त्याचे माघील वर्षीचे उत्पन्न हे २ लाखां पेक्षा कमी पाहिजे.
4) अर्जदार हा दिव्यांग किवा अशक्तपणा तसेच मानसिक संतुलन संदर्भात रुग्ण पाहिजे ( Not Compulsary ).
मुख्यमंत्री वयोश्री योजना ही नुकतीच महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे. ही योजना मुख्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी असल्यामुळे आणि राज्यात ही लोकसंख्या १.५ कोटी पर्यंत असल्यामुळे महत्वाची ठरणार आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांमध्ये सुध्दा दिव्याग, मानसिक आजार यांना पहिल्यांदा दिले जाणार आहे.
मुख्यमंत्री वयोश्री योजना साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ या ठिकाणी क्लिक करून तुम्ही या ठिकाणी माहिती भरू शकता.
या ठिकाणी समजून घ्या की राज्यात १.५ कोटी संख्या ही ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे आणि ग्रामीण भाग असल्यामुळे फॉर्म भरणे ही प्रक्रिया ऑनलाइन सोबत ही ऑफलाईन सुध्दा आहे.
ग्रामीण भागात जर तुम्ही असाल तर तुम्ही जवळच्या ग्रामीण सरकारी दवाखाण्यात किंवा तलाठी भाऊसाहेब यानाकडे ऑफलाईन अर्जाची विनंती करू शकता. ते तुमचा अर्ज घेऊन तहसील मध्ये ऑनलाईन करू देतील.
तसेच ज्यांना ऑनलाईन अर्ज करायचा आहे त्यांनी अधिकृत वेबसाईट वर जाऊन हा अर्ज व्यवस्थित भरायचा आहे. ज्यांना अर्ज अचूक जाणार आहे त्यांना सरकार कडून लवकरच 3 हजार रुपये बँक खात्यावर मिळणार आहे.
मुख्यमंत्री वयोश्री योजना ही महाराष्ट्र राज्यात असणाऱ्या 65 वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे.
मुख्यमंत्री वयोश्री योजना ही राज्य शासनाची एक महत्वाची आहे. या योजने मार्फत महाराष्ट्र सरकार कढून 65 वर्षा पेक्षा जास्त वय असणाऱ्यांना प्रत्येकी 3,000 रुपये बँक खात्यावर डीबीटी मार्फत मिळणार आहे.
नमस्कार, महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतेच वृद्ध कलाकारांना आर्थिक मदत देण्यासाठी ' कलाकार मानधन योजना '2025…
नमस्कार, आपण घरकुल योजने साठी फॉर्म भरतो आणि घरकुल योजनेचा फॉर्म मंजूर होतो, पण घर…
नमस्कार "पिंक ई-रिक्षा योजना" हि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले…
"ड" अक्षराने सुरू होणाऱ्या 100 गावांची नावे खालीलप्रमाणे: d varun gavachi naave ड वरून गावांची…
गाव नमुना 14 (Form 14) हा एक सरकारी दस्तऐवज आहे जो मुख्यत: महाराष्ट्र राज्यातील कृषी…
महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने कामगारांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवल्या जातात. कामगारांची नोंदणी, नूतनीकरण, आणि लाभ…
This website uses cookies.