Sheli Palan Yojana 2024 : नमस्कार शेतकरी बंधूंनो महाराष्ट्र शासनाने एक नवीन योजना काढलेली आहे ‘ शेळी पालन योजना 2024 ‘ . या योजनेसाठी सरकार लाखो रुपये अनुदान शेतकऱ्यांसाठी देत आहे. Sheli Palan Yojana 2024 तसेच जे पशुपालन करणारे असतील त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे, शेती सोबतच शेतीला जोड व्यवसाय म्हणून शेळीपालन याकडे पाहिले जाते. यासाठी शासनाचा अनुदान देण्यासाठी कटिबद्ध झालेले आहे.
आता तुम्ही शेळ्या आणि बोकड्यासाठी तुम्ही लाखो अनुदान घेऊ शकता. चला तर पाहू ही योजना कशी मिळवायची, याला कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे आणि शेळी पालन योजना यासाठी कोणत्या अटी व शर्ती आहेत माहिती पाहू.
Sheli Palan Yojana 2024 : महाराष्ट्र शासनाने 20 जानेवारी 2023 रोजी एक जीआर काढला ‘ शेळीपालन व्यवसाय संदर्भात ‘ या जीआरमध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आणि पशुपालन यासाठी शेळीपालन व्यवसाय करण्यासाठी शासनाचा 10 लाख रुपये पर्यंत अनुदान देणार आहे असे त्यामध्ये सांगितले होते. त्यानुसार दरवर्षी अर्ज शासनामार्फत मागवण्यात येत आहे.
हि माहिती पहा :
- मतदानासाठी जाणार आहे ना ? घर बसल्या मिळवा आता मतदान कार्ड फोटोसह, मतदान केंद्र कोठे आहे याची पण माहिती मिळेल
- संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ पेन्शन योजना ! पेन्शन पुढे चालू ठेवण्यासाठी इथून पुढे हेच कागदपत्रे लागतील
- मुख्यमंत्री वयोश्री योजना मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी, 3 हजार रुपये लाभ मिळणार
- घराचं वीजबिल शून्य येणार पंतप्रधान सूर्योदय योजना काय आहे पहा
- शेतकऱ्यांनो हा व्यवसाय सुरू करा जास्त नफा कमवा
दहा लाख रुपये अनुदान Sheli palan
शेतकरी बंधूंनो महाराष्ट्र शासनाने शेळी पालन तसेच मेंढी पालन व्यवसाय सुरू करण्यासाठी अनुदान देण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. हे अनुदान तुम्हाला शेळी आणि मेंढी खरेदीसाठी दिले जाणार आहे यामध्ये तुम्ही 100 मादी व 5 नर या पटी मध्ये हे अनुदान घेता येणार आहे. आणि हे जे अनुदान आहे ते 50 टक्के असणार आहे.
तसेच जर तुम्हाला 100 मादी आणि 5 नर यासाठी दहा लाख रुपये या योजने दिले जाते. हे अनुदान अनेक पटीने वाढत चालते जर तुम्हाला २०० मादी आणि 5 नर पाहिजे असेल तर अनुदान डबल होते.
शेळी पालन व्यवसाय हा काहीजण शेतीला जोडधंदा म्हणून सुद्धा करतात आणि काही एक मोठा व्यवसाय म्हणून सुद्धा करतात. या योजनेतून जर आपण व्यवस्थित प्लॅनिंग केले आणि पशुपालन व्यवसाय जर आपण केला यामध्ये तुम्ही दरवर्षी लाखो रुपये फायदा घेऊ शकता. त्यामुळे पशुपालन हा व्यवसाय एक मोठा व्यवसाय म्हणून त्याच्याकडे तुम्ही पाहू शकता.
या शेळीपालन व्यवसायासाठी Sheli Palan Yojana 2024 शासन 50 टक्के अनुदानावर शेळ्या आणि मेंढ्या तसेच बोकडे दिले जात आहेत. ज्या शेतकऱ्यांना या व्यवसायामध्ये रुची आहे तसेच ज्यांना हा Sheli Palan Yojana 2024 व्यवसाय करण्याची इच्छा आहे त्या शेतकऱ्याकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ज्यांना खरंच शेती त सोबत पशुपालन हा व्यवसाय करायचा आहे आणि मोठे उत्पन्न वर्षाकाठी मिळवायचे आहे त्यांच्यासाठी हा पर्याय चांगला आहे.
योजना | शेळीपालन योजना 2024 |
लाभार्थी | महाराष्ट्रातील सर्व शेतकरी |
योजना सुरू | 2023 मध्ये |
फायदा | 50 टक्के अनुदानावर शेळ्या, मेंढ्या तसेच बोकडे दिले जात आहेत |
अर्ज | ऑनलाईन |
लिंक | येथे क्लिक करा – > https://ah.mahabms.com/ |
शेळीपालन योजना कागदपत्रे sheli palan Document
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- बँक पासबुक
- जात प्रमाणपत्र
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र
- सातबारा व आठ अ / जागेचा उतारा
- जिओ टॅगिंग जागेचा फोटो
शेळीपालन योजना पात्रता sheli palan yojana
- अर्ज करणारा व्यक्ती हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- लाभार्थी शेतकरी असावा किंवा पशुपालन करणारा असावा.
- महिला , तसेच अनाथ किंवा अपंग यांना प्राधान्य प्रथम दिले जाईल
- अनुसूचित जाती- जमाती या वर्गातील असाल तर यामध्ये प्राधान्य दिले जाईल यासाठी जातीचे प्रमाणपत्र पाहिजे.
शेळी पालन ऑनलाईन अर्ज
शेतकरी बंधूंनो शेळीपालन व्यवसाय जर तुम्हाला करायचा असेल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागेल. सरकारमार्फत शेळीपालन साठी दरवर्षी अर्ज मागविण्यात येत आहेत अर्ज कोठे भरणार बद्दल आपण माहिती पाहू.
- सर्वप्रथम तुम्हाला अर्ज करण्यासाठी https://ah.mahabms.com/ या वेबसाईटवर यावे लागेल. ही वेबसाईट जेव्हा शासनामार्फत अर्ज मागविण्यात येतात त्यावेळी ती चालू राहते.
- वेबसाईट वर आल्यानंतर तुम्हाला समोर ‘ शेळीपालन व्यवसायासाठी अर्ज करा ‘ हा पर्याय दिसेल यावर क्लिक करायचे आहे.
- क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे नाव, तुमचा पत्ता, शेती संदर्भात माहिती, व्यवसाय संदर्भात अनुभव, अनुदान किती पाहिजे ती माहिती, कुटुंबाची माहिती तसेच तुमचा फोटो व सही आणि बँकेची माहिती यामध्ये टाकावी लागेल.
- त्यानंतर आवश्यक असणार सर्व कागदपत्रे sheli palan yojana अपलोड करावा लागतील.
- अपलोड केल्यानंतर तुम्हाला सबमिट Submit यावर बटणावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमचा अर्ज शासनाकडे जाणार आहे.
- शासनाकडे अर्ज केल्यानंतर काही दिवसांमध्ये याची सोडत निघते. आणि तुम्हाला मोबाईलवर शेळीपालन व्यवसायासाठी तुमचा अर्ज Sheli Palan Yojana 2024 मंजूर झाला आहे असा मेसेज येतो साधारण यासाठी पंधरा ते वीस दिवस लागतात किंवा त्याच्या आधीच हा अर्ज मंजूर होतो.
- त्यानंतर आवश्यक असणारे कागदपत्रे ऑनलाईन पद्धतीने सादर करा त्यानंतर तुमच्या भागातील पशु विभागामार्फत sheli palan yojana ते तुम्हाला संपर्क करतील. पुढची माहिती ते व्यवस्थित देतील.
- अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून शेळीपालन योजना लाभ घेऊ शकता.
शेळीपालन योजना व्यवसायाचे फायदे
शेळीपालन हा व्यवसाय करण्यासाठी एकदम सोपा आहे यासाठी तुम्हाला जागेची, तसेच त्यांना हवा असणारा चारा आणि पाण्याची सोय करता आली पाहिजे. एवढे जर केली तुम्ही तर कमी खर्चात आणि कमी रिक्स मध्ये तुम्ही या व्यवसाय मधून लाखो रुपये कमवू शकता. शेळी पालन व्यवसायासाठी जास्त लक्ष देण्याची सुद्धा गरज नाही.
- शेळी पालन व्यवसाय मधून तुम्ही एक रोजगार मिळू शकता
- शेळीपालन व्यवसाय मधून तुम्हाला लाख रुपये वर्षाला निघणार आहे.
- व्यवसाय मधून तुम्ही दूध, मांस तसेच लोकर मधून पैसे कमवू शकता.
- शेळीपालन व्यवसायामुळे अनेक शेतकऱ्यांना लाख रुपयाचा फायदा झाला आहे. ही बाब शासनाने लक्षात घेऊन शेळी पालन व्यवसाय अधिक अधिक असा करता येईल आणि रोजगार कसा तयार करता येईल याकडे शासनाने लक्ष दिले आहे.
अशा प्रकारे तुम्ही शेळीपालन योजना याचा लाभ घेऊन वर्षा काठी लाखो रुपये कमवू शकता आणि प्रगतशील शेतकरी सुद्धा होऊ शकतात कारण पशुपालन व्यवसाय हा शेतीशी संदर्भात आहे.