अतिवृष्टीमुळे ( सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2022 ) झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून 290 कोटी शासनातर्फे मंजूर
2022 Ativrushti Nuksan Bharpai Aali |
माघील वर्षी सप्टेंबरमध्ये आणि ऑक्टोबर मध्ये (2022 यावर्षी ) सतत अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टी शेतमालाचे खूप नुकसान झाले होते. शेतपिकांच्या व शेतजमिनीच्या नुकसान पोटी जिल्ह्याच्या( अहमदनगर ) 871 कोटी रुपये मिळावेत, असा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाला पाठवला होता.
परंतु राज्य शासनाचे फक्त 290 कोटी 91 लाख 33 हजार रुपये एवढा निधी फक्त मंजूर केला आहे.महत्वाचे म्हणजे यावर्षी राज्य शासनाने वाढीव दराने भरपाई मंजूर केला आहे.जिरायत जमीनचा प्रकार यासाठी वाढीव दर प्रति हेक्टरी 13,600 रुपये, आणि बागायत जमिनीसाठी वाढीव दर हा 27,000 रुपये प्रति हेक्टरी मंजूर केला आहे.
आकडेवारी : अहमदनगर
शेतकरी संख्या – 2 लाख 54 हजार 691
बाधित क्षेत्र – 1 लाख 55 हजार 355.46 हेक्टर
मंजूर भरपाई – 290 कोटी 91 लाख 33 हजार
सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2022 अतिवृष्टी :
सप्टेंबर व ऑक्टोबर 2022 या महिन्यात अहमदनगर जिल्ह्याला अतिवृष्टीचा मोठा तडाखा बसला होता. या अतिवृष्टी मध्ये अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी पुरात किंवा पुराच्या पाण्यात वाहून गेल्या आहेत. तर अनेक शेतकऱ्याच्या शेतात पीक असताना पिके ही भुईसपाट झाली आहेत. याचा फटका अहमदनगर जिल्ह्यात लाखो शेतकऱ्यांना बसला आहे. या सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2022 महिन्यात अतिवृष्टी , वादळ आणि वादळी पाऊस तसेच सतत मोठा पाऊस यामुळे जिल्ह्यातील जवळजवळ 5 लाख शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
290 कोटी व 91 लाख हा निधी वाटप कधी होणार आहे ?
राज्य शासनाने सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2022 मध्ये पिकाचे नुकसान पोटी भरपाई रक्कम म्हणून 290 कोटी मंजूर केले आहेत. पण हा निधी कधी वाटणार किंवा या निधीचे कधी वाटप होणार या संदर्भात काहीही माहिती आलेली नाही.त्यामुळे हे पैसे येणार आहे की नाही शेतकरी आता संभ्रमात पडला आहे.
आता दुप्पट भरपाई मिळणार : –
याआधी जर तुम्ही पाहिले असेल तर नैसर्गिक आपत्ती मुळे जर शेतीचे आणि शेतमालाचे नुकसान होत असेल तर सरकार मार्फत भरपाई देताना 2 हेक्टरी मर्यादा ठेवली होती नियमित दर 6800 रुपये प्रति हेक्टरी जीरायतील होता , बागायतील 13500 रु प्रति हेक्टरी हा होता पण आता ही मर्यादा सरकारने वाढवली 2 हेक्टर ऐवजी आता क्षेत्र मर्यादा 3 हेक्टर केली आहे त्यामुळे शेतकऱ्याला वाढीव निधी भेटणार आहे. वाढीव दर ( 2023 पासून आता ) प्रति हेक्टरी 13600 रुपये जीरायतील तसेच 27000 रुपये बागायती जमिनीला नुकसान भरपाई भेटणार आहे.
हे पण पहा :
कोव्हीड-१९ या आजारामुळे मृत पावलेल्या व्यक्तीच्या नजिकच्या नातेवाईकास सानुग्रह सहाय्य मंजूर, आला शासनाचा 11 जानेवारी नवीन जीआर