शेतामध्ये फळबाग करायची आहे का ? ही योजना आहे शेतकऱ्यासाठी खास !’ भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना ‘ अर्ज पात्रता अटी व शर्ती पहा

Bhausaheb fundkar falbag yojana : शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्र सरकार नेहमी शेतकऱ्यांसाठी विविध योजना आणत असते. शेत अवजारा संदर्भात असेल किंवा बियाणे तसेच फळबाग संदर्भात असेल या सर्वांसाठी महाराष्ट्र शासनाने योजना काढलेल्या आहेत. पण या योजना आपल्या बळीराजापर्यंत पोहोचत नाही त्यामुळे या योजनेचा फायदा आवश्यक असणाऱ्या शेतकऱ्यांना मिळतच नाही. शेतकरी बंधूंनो फळबागासाठी महाराष्ट्र शासनाने एक योजना काढलेली आहे या योजनेचे नाव आहे भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना bhausaheb fundkar falbag yojana .

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना Bhausaheb fundkar falbag yojana

Table of Contents

शेतकरी बंधूंनो काही शेतकरी असे आहेत की जे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबागेसाठी बसत नाहीत किंवा लागवडीसाठी पात्र ठरत नाहीत तर अशा शेतकऱ्यांसाठी ही भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना आहे. या योजनेची सुरुवात ही 06 जुलै 2018 या तारखेला झालेली आहे. शेतीच्या उत्पन्नासोबतच शेतकऱ्यांना फळबागेचा सुद्धा नफा मिळावा यासाठी ही योजना आहे. केंद्र सरकारने सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये 2025 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न हे दुप्पट करायचे ठरवले होते.

Bhausaheb fundkar falbag yojana : या भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना उद्दिष्ट असे आहे की शेतकऱ्यांचे उत्पन्न हे दुप्पट करणे तसेच शेतकऱ्यांना एक शाश्वत उत्पन्नाचा सोर्स तयार करणे.

या योजनेमध्ये तुम्ही आंबा, काजू, पेरू, चिंच, सिताफळ, आवळा, कोकम, लिंबू, जांभूळ, फणस, अंजीर, संत्रा, नारळ, मोसंबी आणि चिकू या फळबागेसाठी तुम्ही या योजनेला अर्ज करू शकता.

Bhausaheb fundkar falbag yojana
Bhausaheb fundkar falbag yojana
मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

हि माहिती पहा :

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना Highlight

योजनेचे नाव भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना
राज्य महाराष्ट्र शासनाने
योजना सुरू06 जुलै 2018 जीआर
लाभार्थी महाराष्ट्रातील शेतकरी
उद्दिष्टे शेतकऱ्यांची उत्पन्न दुप्पट करणे आणि शेतकऱ्यांना एक शाश्वत उत्पन्नाचा सोर्स तयार करणे.
अर्ज पद्धत ऑनलाइन
अर्ज करण्याची लिंक[ https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login ]
Bhausaheb fundkar falbag yojana Highlight information

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना निकष

 1. ही योजना फक्त वैयक्तिक शेतकऱ्यांनाच घेता येईल
 2. ज्याला या योजनेमध्ये फॉर्म भरायचा आहे त्याच्या नावाने 7/12 उतारा पाहिजे. जर सातबारावर इतर नावे असतील तर इतर शेतकऱ्यांचे संमती पत्र लागेल.
 3. जमीन कुळ कायद्यानुसार जर एखाद्याचे नाव असेल तर त्या कुळाचे संमतीपत्र लागेल.
 4. ज्या शेतकऱ्यांचे शेतीवरच उपजीविका आहे त्यांना प्राधान्य क्रमाने पसंती दिली जाईल
 5. यामध्ये विविध प्राधान्यक्रम आहेत ते खाली प्रमाणे.
 1. एसटी आणि एसटी
 2. महिला
 3. अपंग
 4. अनाथ

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना शासनाची मदत किंवा आर्थिक भार

 1. शासन शंभर टक्के काय देणार
 • शासन खड्डे खोदून देणार
 • शासन कलमे लागवड करून देणार
 • आणि त्या पिकाचे संरक्षण करणार हे जबाबदारी शंभर टक्के शासन घेणार.

2. शेतकरी स्वखर्चाने काय करणार

 • जमीन तयार करणे हे शेतकऱ्याचे काम आहे
 • माती व शेण खत मिश्रणाने खड्डे भरणे
 • तसेच रासायनिक खत वापरून खड्डे भरणे
 • आणि वेळोवेळी अंतर मशागत करणे हे शेतकऱ्याचे काम राहणार आहे.
 • ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे.
 • नांग्या भरणे हे कामे करावे लागतील.

अर्ज प्रक्रिया

 1. तुम्हाला जर भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेसाठी अर्ज करायचा असेल bhausaheb fundkar yojana online form तर अर्ज करण्यासाठी या https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login डीबीटी पोर्टल वर यायचा आहे.
 2. आधी तुमची प्रोफाईल बनवावी लागेल यासाठी तुम्ही स्वतः बनवू शकता किंवा सीएससी सेंटर ची मदत घेऊ शकता.
 3. प्रोफाइल बनवताना तुमच्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक पाहिजे तसेच तुमच्याकडे सरकारी बँकेचे अकाउंट पाहिजे, सातबारा आठ पाहिजे.
 4. प्रोफाइल बनवल्यानंतर तुम्ही अर्ज करा ऑप्शन निवडून त्याखाली ‘ भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना ‘ bhausaheb fundkar falbag yojana असे दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे.
 5. क्लिक केल्यानंतर तुम्ही कोणत्या पिकासाठी फळबाग लागवडीसाठी अर्ज करणार आहेत ते संपूर्ण माहिती भरून तसेच अर्ज करण्याची शासन फीभरून तो अर्ज कृषी विभागाकडे पाठवायचा आहे.
 6. त्यानंतर काही दिवसाच्या आत कृषी सहाय्यक तुम्हाला या योजने संदर्भात माहिती देतील. bhausaheb fundkar yojana online form अशा प्रकारे तुम्ही भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये सहभागी होऊ शकता.

योजना कागदपत्रे Document

 1. आधार कार्ड
 2. एस सी किंवा एसटी जातीचे असेल तर जातीचे प्रमाणपत्र
 3. 7/12 उतारा
 4. 8 अ
 5. स्वयंघोषणापत्र
 6. बँकेला आधार लिंक

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना लाभाची ची रक्कम किती आहे ?

आंबा67,005 रुपये
आंबा129306 रुपये
काजू67027 रुपये
पेरू227517 रुपये
डाळिंब120777 रुपये
कागदी लिंबू72907 रुपये
सफरचंद88275 रुपये
चिंच57464 रुपये
जामुन57465 रुपये
जॅक फ्रुट54940 रुपये
अंजीर113936 रुपये
आवळा60064 रुपये
कोकम57489 रुपये
नारळ178/- रुपये
सपोटा64455 रुपये
मोसंबी88275 रुपये
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना लाभाची ची रक्कम

FAQ Bhausaheb fundkar falbag yojana ( Frequently Asked Questions )

1. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना या योजनेमध्ये कोणत्या पिकांचा समावेश आहे.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये आंबा, काजू, पेरू, चिंच, सिताफळ, आवळा, कोकम, लिंबू, जांभूळ, फणस, अंजीर, संत्रा, नारळ, मोसंबी आणि चिकू या पिकांचा समावेश आहे. एकूण 16 वार्षिक आहेत.

2. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी सामायिक क्षेत्रातून एकापेक्षा जास्त शेतकरी अर्ज करू शकतात का ?

याचे उत्तर आहे नाही. सामायिक क्षेत्रामधून एकालाच या योजनेसाठी अर्ज करता येईल. आणि तो अर्ज करताना इतर शेतकऱ्यांचे सामायिक पत्रा वर सहमती लागेल.

3. एका पेक्षा जास्त पिकासाठी अर्ज करता येईल का ?

याचे उत्तर आहे हो ! एका शेतकऱ्याला एकापेक्षा जास्त पिकासाठी अर्ज करता येणार आहे.

4. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी अर्ज करू शकतो का ?

हो, तुम्ही अर्ज करण्यासाठी https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login या वेबसाईटचा वापर करा किंवा आपले सरकार सेवा केंद्र यांच्याशी संपर्क करा.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
aapla Baliraja

Leave a Comment

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Sonu Nigam breaks down in tears after performing at the Ayodhya Ram Mandir! “I have nothing more to say; my tears will speak for me.” Jaggery Tea Benefits: ग्रीन टीपेक्षाही फायदेशीर आहे गुळाचा चहा; हिवाळ्यात नक्की सेवन करा Tulsi Vivah 2023 : का करतात तुळशी विवाह यावर्षी कोणत्या तारखेला आहे पहा ?